Shiv Nadar
Reading Time: 3 minutes

Shiv Nadar

शिव नाडार (Shiv Nadar) हे नाव गेल्या काही दिवसात चर्चेत येण्याचं मुख्य कारण म्हणजे नाडार यांनी दिलेला राजीनामा. काही दिवसांपूर्वीच त्यांना भारतातील तिसरे श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आलं होतं. भारतात मागच्या काही वर्षात झालेली ‘आयटी क्रांती’ ही खरोखरच कौतुकास्पद आहे. यामध्ये ग्राहकांना माफक दरात लॅपटॉप पुरवण्यात ‘हिंदुस्थान कम्प्युटर लिमिटेड (HCL)’ या भारतीय कंपनीचा सिंहाचा वाटा आहे. 

इतर लेख: HDFC बँकेचे आदित्य पुरी: सर्वात जास्त कालावधीचे बँक सीईओ

Shiv Nadar: शिव नाडार यांचा यशाचा प्रवास 

  • १९४५ मध्ये तामिळनाडू मधील एका छोट्या गावात जन्म झालेल्या ‘शिव नाडार’ यांनी हा प्रवास कसा साध्य केला ? आपल्या भारतीय एचसीएलने अमेरिकेच्या ‘HP’, ‘Dell’, चीन च्या ‘Lenovo’ ला कशी टक्कर दिली ? हे जाणून घेऊयात. 
  • शिव नाडार यांनी आपलं इलेक्ट्रीकल इंजिनियरिंगचं शिक्षण हे कोईंबतूरच्या पीएसजी कॉलेज मधून पूर्ण केलं आणि ‘कूपर इंजियनिरिंग कंपनी’ मध्ये काम करायला सुरुवात केली. 
  • १९६७ मध्ये शिव नाडार यांनी ‘दिल्ली क्लॉथ मिल्स’ ही कंपनी जॉईन केली. ही कंपनी त्या काळात भारतातील चौथी सर्वात मोठी कंपनी होती. 
  • काही वर्ष काम केल्यानंतर शिव नाडार यांना ९ ते ६ नोकरीचा कंटाळा यायला लागला होता. ‘काही तरी वेगळं’ करावं अशी त्यांचीही इच्छा होती. त्यावेळी त्यांची भेट ‘अर्जुन मल्होत्रा’ या कलीग सोबत झाली. दोघांमध्ये घनिष्ट मैत्री झाली. 
  • भारतीय बाजाराचा या दोघांनी अभ्यास केला आणि येणाऱ्या काळाची पावलं ओळखत त्यांनी ‘पर्सनल कम्प्युटर’ चा व्यवसाय भागीदारीमध्ये सुरू करायचं ठरवलं.

सुरुवात कशी झाली ?

  • १९७५ मध्ये शिव नाडार यांनी डिजिटल कॅल्क्युलेटर तयार करणाऱ्या ‘मायक्रोकॉम्प’ या कंपनीची स्थापना केली. 
  • काही वर्ष ‘मायक्रोकॉम्प’ द्वारे एक ओळख निर्माण केल्यानंतर कम्प्युटर तयार करण्याची इच्छा त्यांच्या मनात पुन्हा निर्माण झाली. त्यादरम्यान, उत्तर प्रदेश सरकार हे भारतीय आयटी कंपन्यांना त्यांच्या ‘इलेक्ट्रॉनिक बोर्ड’ सोबत काम करण्यासाठी आवाहन करत होतं. 
  • शिव नाडार यांना ही व्यवसायिक संधी हातून जाऊ द्यायची नव्हती. ११ ऑगस्ट १९७६ रोजी त्यांनी ‘एचसीएल टेक्नॉलॉजी लिमिटेड’ ची स्थापना केली. 
  • उत्तर प्रदेश इलेक्ट्रॉनिक बोर्ड हे या कंपनीत शिव नाडार, अर्जुन मल्होत्रार यांचे भागीदार होते. 

‘एचसीएल कंपनीची प्रगती 

  • पहिल्या वर्षी एचसीएल कंपनीने १० लाख रुपयांचा व्यवसाय केला. 
  • HCL 8C या नावाने तयार केलेला मायक्रोकम्प्युटर हा भारताचा पहिला मायक्रोकम्प्युटर ठरला. त्यासोबतच कम्प्युटर हार्डवेअर च्या व्यवसायात  एचसीएलने आपलं नशीब आजमवायचं ठरवलं.
  • आपला व्यवसाय भारतापूरता मर्यादित न ठेवता एचसीएलने नेहमीच ‘ग्लोबल’ विचार केला आणि कोरिया च्या नोकिया, अमेरिकेच्या एचपी (HP) आणि जपानच्या तोशिबा (Toshiba) सोबत व्यवसायिक भागीदारी केली. 
  • १९७८ मध्ये एचसीएलने भारताचा पहिला ‘पर्सनल कम्प्युटर’ तयार केला याचबरोबर ‘भारतीय स्टॉक एक्सचेंज’चा चेहरामोहरा बदलण्यात महत्वपूर्ण योगदान दिलं. 
  • कॉम्प्युटर हार्डवेअर सप्लायर म्हणून कामाला सुरुवात केलेली एचसीएल कंपनीच्या आज ५० देशांमध्ये शाखा आहेत व कंपनीमध्ये एकूण १,५३,०० कर्मचारी कार्यरत आहेत.
  • एचसीएल ही आज कम्प्युटर तयार करणारी भारतातील चौथी कंपनी आहे. माहिती आणि तंत्रज्ञानात कंपनीने केलेल्या प्रगतीचा अभ्यास सध्या  जगभरातील कंपन्या करत आहेत. 
  • कंपनीचा टर्नओव्हर मागच्या दोन वर्षात २०,००० करोड पर्यंत जाऊन पोहोचला आहे, तर आजच्या घडीला  शिव नाडार यांची वैयक्तिक संपत्ती ही २४ बिलियन यूएस डॉलर्स इतकी आहे.

समानतेचा दृष्टिकोन –

  • जुलै २०२० मध्ये यांनी एचसीएल ची धुरा आपली मुलगी रोशनी नाडार हिच्यावर सोपवली. हे करतांना सुद्धा शिव नाडार यांनी एक आदर्श प्रस्थापित केला. कारण, रोशनी नाडार या भारतीय आयटी कंपनीच्या अध्यक्षपदी नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला आहेत. 
  • जुलै २०२१ मध्ये शिव नाडार यांनी ‘मॅनेजिंग डायरेक्टर’ या पदाचा सुद्धा राजीनामा दिला आणि कंपनीत सीईओ म्हणून कार्यरत असलेल्या सी. विजय कुमार यांना पुढील ५ वर्षांसाठी मॅनेजिंग डायरेक्टर पदाची जबाबदारी सांभाळण्याची संधी दिली. 

विशेष लेख: राकेश झुनझुनवाला – भारतीय शेअर बाजारातील बादशाह

सामाजिक योगदान : 

  • एक व्यवसायिक म्हणून शिव नाडार यांनी आपल्या कारकिर्दीत सर्व योग्य गोष्टी योग्य केल्याच, पण एक व्यक्ती म्हणून देखील त्यांनी भारतासाठी आपलं सामाजिक योगदान दिलं. 
  • आपल्या वैयक्तिक कमाई चा १०% रक्कम शिव नाडार हे समाजसेवेसाठी दर महिन्यात अर्पण करत असतात. शिव नादर यांनी देशात कित्येक शाळा आणि तामिळनाडू मध्ये ‘एसएसएन इंजिनियरिंग कॉलेज’ ची स्थापना केली. 
  • गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी ‘विद्याज्ञान’ या संस्थेची उत्तर प्रदेश मध्ये स्थापना केली. २०११ मध्ये शिव नाडार यांनी नोएडा येथे ‘शिव नादर विद्यापीठाची’ स्थापना केली आहे. 

कार्याचा गौरव : 

  • १९९५ मध्ये ‘आयटी मॅन ऑफ द इयर’ हा पुरस्कार.
  • २००५ मध्ये ‘सीएनबीसी बिजनेस एक्सलेन्स अवॉर्ड’
  • २००७ मध्ये मद्रास विद्यापीठाकडून ‘डॉक्टरेट’पदवी
  • २००८ मध्ये शिव नाडार यांना भारतीय आयटी क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘पद्मभूषण’ या तिसऱ्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 
  • २०११ मध्ये शिव नाडार यांचा ‘फोर्ब्स’ च्या आशिया खंडातील ४८ सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींमध्ये समावेश होता. 

नवीन पिढीला व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करतांना शिव नाडार हे नेहमीच सांगत असतात की, ” मोठी स्वप्नं बघा, धोका पत्करतांना घाबरू नका आणि सुरुवातीला नुकसान झालं तरी डगमगून जाऊ नका.” शिव नाडार यांच्या कार्याला अर्थसाक्षर समूहाचा कडक सॅल्युट आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Shiv Nadar in Marathi, Shiv Nadar Marathi Mahiti, Shiv Nadar Marathi, Who is Shiv Nadar? Marathi, Shiv Nadar kon ahet, Shiv Nadar yanchi Mahiti, Shiv Nadar info Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.