एसआयपी (SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय

Reading Time: 3 minutesस्मार्टफोनच्या जमान्यात गुंतवणूकदारही गुंतवणुकीच्या स्मार्ट पर्यायांना पसंती देत आहेत. पारंपरिक गुंतवणुकीतून मिळणारे लाभ व कालावधी याचा विचार करता उत्तम परतावा व वेळेची लवचिकता देणाऱ्या गुंतवणूकीच्या आधुनिक पर्यायांची लोकप्रियता सध्या वाढू लागली आहे. शेअर्स, बॉण्ड्स, स्टॉक अशा अनेक पर्यायांना मागे टाकत गुंतवणूकदार म्युच्युअल फंड गुंतवणुकीला जास्त पसंती देत आहेत.