Ready possession Home: बांधकाम सुरू असलेलं घर घ्यावं की तयार असलेलं ‘रेडी पझेशन’ घर घ्यावं? 

Reading Time: 3 minutes कोणत्याही व्यक्तीसाठी ‘स्वतःचं घर’ हे फक्त एक वास्तू नसून ते एक स्वप्न असतं. नवीन घर घेतांना आणि विशेषतः पहिलं घर घेतांना प्रत्येक जण हा खूप सतर्क असतो. मध्यमवर्गीय मराठी माणसाला तर अशावेळेस बांधकाम सुरू असलेलं घर घ्यावं की तयार असलेलं ‘रेडी पझेशन’ घर घ्यावं? वापरलेलं ‘रिसेल’ घर घ्यावं? असे बेसिक प्रश्न पडत असतात. योग्य उत्तरं फार कमी लोकांकडे असतात. इतका मोठा निर्णय घेताना होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्यासाठी आम्ही या विषयाबद्दल माहिती देत आहोत.