Ready possession Home
Reading Time: 3 minutes

Ready possession Home

आजच्या लेखात आपण बांधकाम सुरू असलेलं घर घ्यावं की तयार असलेलं ‘रेडी पझेशन’ घर (Ready possession Home) या महत्वपूर्ण विषयावर माहिती घेऊया. कोणत्याही व्यक्तीसाठी ‘स्वतःचं घर’ म्हणजे फक्त एक वास्तू नसून ते एक स्वप्न असतं. नवीन घर घेताना विशेषतः पहिलं घर घेतांना प्रत्येकजण खूप सतर्क असतो. मध्यमवर्गीय मराठी माणसाला तर अशावेळेस बांधकाम सुरू असलेलं घर घ्यावं की तयार असलेलं ‘रेडी पझेशन’ की वापरलेलं ‘रिसेल’ घर घ्यावं, असे बेसिक प्रश्न पडत असतात. योग्य उत्तरं फार कमी लोकांकडे असतात. इतका मोठा निर्णय घेताना होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्यासाठी आम्ही या विषयाबद्दल माहिती देत आहोत. 

आर्थिक सल्लागारांचं मत जाणून घेतलं तर हे लक्षात येतं की, बांधकाम होऊ घातलेलं घर विकत घेण्यापेक्षा ‘रेडी पझेशन’ घर घेणं हे कधीही चांगलं असतं. काय असतील यामागची कारणं? जाणून घेऊयात.

हे नक्की वाचा: घरभाडे भत्ता व गृहकर्ज- एकाचवेळी दोन्हींसाठी करसवलत घेता येईल का? 

१. त्वरित घराचा ताबा : 

  • बांधकाम सुरू असलेल्या घरात गोष्टी घडणार असतात, ‘रेडी पझेशन’ घरात त्या घडलेल्या असतात. 
  • घर विकतांना प्रत्येक बिल्डरची एक भाषा असते आणि घराची किल्ली देताना ही भाषा बदललेली असते, हे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवलं असेल. 
  • घराचं बुकिंग केल्यानंतर जर कोणत्या कारणामुळे तुम्हाला घर विकावं लागलं तर तयार घराची किंमत ही कधीही जास्त येऊ शकते. कारण, तिथे तुम्ही सांगितलेली घराची माहिती आणि प्रत्यक्ष घर यामध्ये कोणतीही तफावत नसते. 

२. प्रकल्प लांबणीवर पडण्याची भीती नाही: 

  • घर बुक केल्यानंतर बऱ्याच वेळेस बिल्डरच्या सरकार सोबतच्या एखाद्या अपूर्ण व्यवहारामुळे तो प्रकल्प लांबणीवर पडू शकतो, पर्यायाने तुम्हाला मिळणारा घराचा ताबा हा काही महिन्यांनी लांबणीवर पडत असतो. 
  • १० पैकी जवळपास ४ ठिकाणी हे आपण ऐकत असतो. जर घर वेळेवर मिळालं तर लिफ्ट, गार्डन सारख्या गोष्टी मिळण्यात बराच वेळ वाट बघावी लागत असते. ‘रेडी पझेशन’ घरात हा सगळा त्रास आपण वाचवू शकतो.

३.  फसवणुकीचा धोका कमी होतो:

  • बांधकाम सुरू असलेल्या जागेच्या जमिनीचा वाद हा कधीही उफाळून येऊ शकतो. अशा घटना आपण अनेकदा वर्तमानपत्रात  वाचत असतो. 
  • जमिनीच्या मालकाने जर घर तयार होत असताना त्या प्रकल्पावर, किंवा बिल्डरवर कोर्टात केस टाकली तर पूर्ण प्रकल्प रखडू शकतो. 
  • गृहसंस्थेचा प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय तुमचं घर हे तुम्हाला हस्तांतरित केलं जात नाही. हा त्रास होण्याची शक्यता तयार घरांमध्ये नक्कीच कमी असते. 

विशेष लेख: घर: विकत घ्यावे की भाड्याने राहावे?

४. घरभाड्यातून उत्पन्न:

  • सर्वात शेवटचा पण सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही बुक केलेलं घर ताब्यात मिळेपर्यंत तुम्हाला तुमच्या राहत्या घराचं भाडं सुद्धा भरावं लागतं. 
  • सोबतच, तुमच्या गृहकर्जाचे हफ्ते सुद्धा सुरू झालेले असतात. अशा परिस्थितीत तुमची आर्थिक कोंडी होऊ शकते. 
  • याउलट, तुम्ही जर कमी भाडं असलेल्या घरात राहत आहात आणि तुम्ही विकत घेतलेलं तयार घर हे जास्त प्रगत भागात असेल तर तुम्ही ते घर भाड्याने देऊन एक कमाईचा मार्ग वाढवू शकता. 

५. कर बचत: 

  • घर बुक केल्यानंतर, ते मिळेपर्यंत गृहकर्जावर असलेला व्याजाचा दर यामध्ये फरक पडू शकतो. 
  • तुम्ही ज्या भागात घर घेत आहात त्या भागाचा विकास बघून सुद्धा काही स्थानिक स्वराज्य संस्था मधल्या काळात आपले कर वाढवू शकतात. तयार असलेल्या घरात ही शक्यता नसते.

६. जीएसटी चार्जेस: 

  • भारतातील कित्येक बिल्डर लोकांनी सध्या तयार घर जीएसटी शिवाय मिळेल अशी योजना सुरू केली आहे. 
  • याचा अर्थ असा की, बिल्डर हे तुमच्या वतीने जीएसटीची रक्कम सरकारला भरतील आणि तुमची 1% किंवा 5% रक्कम वाचेल. 

७. केवळ ईएमआय भरा, डाऊनपेमेंटची गरज नाही: 

  • ‘रेडी पझेशन’ घर घेतल्यावर अजून एक फायदा म्हणजे तुम्हाला कोणतंही डाऊनपेमेंट करावं लागत नाही. 
  • ज्या व्यक्तीचं घर तुम्ही विकत घेत असतात त्याचं गृहकर्ज हे सरळ तुमच्या नावावर ट्रान्सफर केलं जातं आणि पहिल्या महिन्यापासून तुमच्या घराचा हफ्ता सुरू होतो. 
  • बांधकाम सुरू असलेल्या घरासाठी तुम्हाला एक मोठी रक्कम आधी डाऊन पेमेंट म्हणून भरावी लागते. 
  • ही रक्कम तुमच्याकडे असेल तर ठीक, नाही तर तुम्हाला या रोख रकमेची सोय करावी लागते. यासाठी बँकांच्या नियमानुसार तुम्ही कर्ज सुद्धा काढू शकत नाहीत.

महत्वाचे लेख: Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी 

८. आजूबाजूचा परिसर प्रत्यक्ष अनुभवता येतो: 

  • घर तयार होत असतांना बऱ्याच वेळेस आजूबाजूच्या परिसराबद्दल, तिथल्या रस्त्यांबद्दल, तिथे येऊ घातलेल्या शाळा, हॉस्पिटल किंवा एअरपोर्ट सारख्या प्रकल्पाचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं केलं जातं. पण, प्रत्यक्षात या गोष्टी फक्त चर्चेत असतात किंवा वादाच्या भोवऱ्यात असतात.
  • घर घेतल्यावर तुम्ही ते लगेच विकत नाही. त्यामुळे, तयार असलेलं घर आणि आजूबाजूचा परिसर बघून आपला निर्णय घेणे हे कधीही इष्ट समजलं जातं. 

घर विकत घेणे हा नेहमीच एक मोठा निर्णय असणार आहे. घरांच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन आपण आपला अभ्यास वाढवणे आवश्यक झाले आहे. सर्व पर्यायांची सखोल माहिती घ्या आणि मग आपल्या स्वतःच्या घरात रहायला जा. तो आनंद कोणत्याही शब्दात व्यक्त करण्यापलीकडचा आहे.

टीम अर्थसाक्षरतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Ready possession in Marathi, Ready possession Home Marathi Mahiti, Under construction Home V Ready possession Home Marathi Mahiti, Under construction Home V Ready possession Home in Marathi, 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.