Money Transfer alert: चुकीच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाल्यास करा हे उपाय

Reading Time: 2 minutes ऑनलाईन व्यवहार करताना चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर होऊ शकतात. चुकीचा क्रमांक टाईप केला जाऊ शकतो. यामुळे बँकेचे व्यवहार, मनी ट्रान्सजॅक्शन  घाईत करू नयेत.  परंतु चुकून चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे पाठवले असल्यास पाठवणाऱ्या व्यक्तीला प्रचंड ताण येतो. त्याच्यासाठी ते संकटापेक्षा कमी नसतं. व्यक्तीला वाटतं की आपले  पैसे कायमस्वरूपी गेले. तीच व्यक्ती कोणत्या कंपनीत किंवा कार्यालयात नोकरी करत असेल आणि त्याच्याकडून दुसऱ्या व्यक्तीचे, त्याच्या कार्यालयाचे किंवा कंपनीचे पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यात गेले असतील तर त्याच्यासाठी ते मोठं संकट असू शकतं. पण घाबरण्याचं कारण नाही, कारण यावर उपाय आहेत. रिझर्व्ह बँकेने याबद्दल काही तरतुदी केल्या आहेत.