कच्चे खनिज तेल खरेदी केल्याबद्दल खरेदीदाराला पैसे?

Reading Time: 2 minutesकोविड-१९ या महासंकटामुळे अनेक देश लॉकडाऊन झाल्याने वाहतूक मंदावली त्यामुळे मागणीत खूप मोठी घट झाली साहजिकच याचा परिणाम कच्या तेलाच्या (Crude Oil)  मागणीवर होऊन जगाच्या इतिहासात प्रथमच कच्या तेलाची वायद्यातील किंमत प्रति बॅरल शून्य डॉलरच्या खाली गेली. याचा अर्थ आता पेट्रोलियम पदार्थ फुकट मिळतील असा नसून जगभरात मंदीमुळे  मागणीत मोठी घट झाल्याने कच्चे तेल साठवून ठेवण्याची क्षमता संपली असून, आता हे उत्पादक ग्राहकांना कच्चे तेल नेण्याबद्धल पैसे देऊ करीत आहेत.