प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वाचावा रु. २,६७,२८० रुपये

Reading Time: 2 minutes घर! सर्वसामान्य माणसाचं आयुष्यातलं एक महत्वाचं स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणूस जीवापाड प्रयत्न करत असतो. पण घरांच्या गगनाला भिडलेल्या किंमती, महागाई, आर्थिक मंदी अशा आवासून उभ्या राहिलेल्या समस्यांमुळे स्वतःच घर विकत घेण्याचं स्वप्न स्वप्नच राहील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. स्वतःचं घर हे केवळ स्वप्न नाही, तर ती एक मूलभूत गरज आहे, हे ओळखून सरकारने मध्यमवर्गीयांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावणारी एक योजना सुरू केली. ती योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री आवास योजना’.

‘विशेष’ मुलांच्या भविष्याची तरतूद

Reading Time: 3 minutes आयकर कायद्यानुसार विशेष  व्यक्तींना व्यक्तिगत, तर ते ज्यांच्यावर अवलंबित आहेत त्यांना आयकरात काही सूट देण्यात आली आहे. अनेक राज्य सरकारांनी व्यवसाय करातून त्यांना वगळले आहे. त्यांच्या कल्याणासाठी काही सोई सवलती देण्यात आल्या आहेत जसे नोकरी, शिक्षण यात राखीव जागा, परीक्षेसाठी लेखनिक घेण्याची परवानगी, काही विषयात सूट, परीक्षेसाठी जास्त वेळ, कर्ज मिळण्यात प्राधान्य, व्याजात सवलत, प्रवासखर्चात सवलत इत्यादी. या सर्व कल्याणकारी योजना असून यासर्वाचा अशा व्यक्तिंना लाभ घेता येऊ शकतो. अशा विशेष मुलांचे बरेच प्रकार आहेत त्यानुसार प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत.