खरंच का मी अर्थसाक्षर?

Reading Time: 3 minutesगुंतवणूक क्षेत्रात अनेक क्लिष्ट संज्ञा वापरल्या जातात, त्यांचा अर्थ बऱ्याचशा लोकांच्या डोक्यावरून जातो, त्या सोप्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न फारसा होत नाही, परिणामी गुंतवणूकदाराच्या मनात नेहेमीच काहीशी धाकधूक असते, गुंतवणूक प्रक्रियेवर आपले नियंत्रण नाहीये, समोरच्याचं म्हणणं, त्याचा युक्तिवाद आपल्याला ऐकून घ्यावा लागतोय अशी भावना निर्माण होत असते. आर्थिक साक्षरतेचा आणि अनुभवाचा अभाव ही जरी त्याची लगेच जाणवणारी कारणे असली, तरी ती दूर करण्याबाबतची अनास्था ही अनेकदा गुंतवणूक क्षेत्राविषयीच्या अविश्वासामुळे निर्माण होत असते.