गृह विम्याच्या या पाच गोष्टी माहीती असायलाच हव्यात
Reading Time: 3 minutesनैसर्गिक आपत्ती कधीच कोणाला सांगून येत नाहीत. भूकंप,महापूर, वादळे, आग लागणे अशा नैसर्गिक आपत्तींच्या काळात स्वतःचा जीव सहीसलामत वाचणे हे महत्वाचे आहेच. सध्या महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यात महापूराने थैमान घातले आहे. धुवांधार पाऊस आणि नद्यांची वाढलेली पाणी पातळी यामुळे गावाच्या गाव महापूराच्या पाण्यात बुडाली आहेत. यामध्ये सर्वात जास्त आणि मोठे नुकसान झाले आहे ते राहत्या घरांचे. घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. ही घरे पुन्हा नव्याने उभी करणे हे तर आव्हान आहेच पण अशा काळात घराचा उतरवणे ही सुद्धा काळाची गरज बनली आहे.