Cashback FAQ : कॅशबॅक संदर्भात काही महत्वाची प्रश्नोत्तरे

Reading Time: 3 minutesकॅशबॅक म्हणजे पैसे परत मिळणे. आपण एखादी वस्तु खरेदी केल्यानंतर आपल्याला त्याच्या बदल्यात काही रक्कम मिळते. भारतात अनेक शॉपिंग वेबसाइट अशा प्रकारचे कॅशबॅक ग्राहकांना देतात. या प्रकारात ग्राहकांनी एटीएम / डेबिट /क्रेडिट कार्डचा किंवा  फोन पे (Phone Pay), पेटिएम (PayTM), अमॅझोन अशा पेमेंट वॉलेटचा वापर करून खरेदी केल्यास त्याचे बक्षीस स्वरुपात काही पॉइंट अर्थात गुण देण्यात येतात. एखादी वस्तू या कॅशबॅकमुळे आपल्याला स्वस्तात मिळू शकते, आहे की नाही कॅशबॅकचा फायदा?