Cashback
Reading Time: 3 minutes

कॅशबॅक (Cashback)

कॅशबॅक (Cashback) म्हणजे पैसे परत मिळणे. आपण एखादी वस्तु खरेदी केल्यानंतर आपल्याला त्याच्या बदल्यात काही रक्कम मिळते. भारतात अनेक शॉपिंग वेबसाइट अशा प्रकारचे कॅशबॅक ग्राहकांना देतात. या प्रकारात ग्राहकांनी एटीएम / डेबिट /क्रेडिट कार्डचा किंवा  फोन पे (Phone Pay), पेटिएम (PayTM), अमॅझोन अशा पेमेंट वॉलेटचा वापर करून खरेदी केल्यास त्याचे बक्षीस स्वरुपात काही पॉइंट अर्थात गुण देण्यात येतात. एखादी वस्तू या कॅशबॅकमुळे आपल्याला स्वस्तात मिळू शकते, आहे की नाही कॅशबॅकचा फायदा?

हे नक्की वाचा: क्रेडिट कार्ड कॅशबॅक – एक भुलभुलैया

कॅशबॅक (Cashback)

  • आपण एखाद्या दुकानात खरेदीसाठी जातो आणि ५०% डिस्काउंट अशा ऑफर पाहतो तेव्हा आपल्या खिशाला स्वस्त पर्याय मिळतो आणि आपण ती खरेदी करतो. यावेळी आधी आपण वस्तूची किंमत कमी करून मगच पैसे देतो. कॅशबॅकमध्ये मात्र आधी त्या वस्तूचे पूर्ण पैसे भरून त्या वस्तूवर आधारित टक्केवारीत कॅशबॅक मिळतो.
  • सध्या अनेक मोठ्या शॉपिंग कंपन्या जसे की अमॅझोन, फ्लिप कार्ट अशा शॉपिंग वेबसाईट्स कॅशबॅक ऑफर देत आहेत. यामध्ये काही मर्यादेपर्यंत असणार्‍या रक्कमेची खरेदी केल्यास त्या बदल्यात काही टक्केवारीमध्ये कॅशबॅक ग्राहकाला मिळतो. 
  • पेपाल(PayPal), पेटीएम, फोन पे अशा प्रकारची ॲप्स किंवा अमॅझोन पे बॅलन्स, एअरटेल मनी अशा प्रकारचे पेमेंट गेटवे कॅशबॅक मिळवून देतात. दरवेळी ऑनलाइन खरेदी करणार्‍या लोकांना कॅशबॅक मिळतोच असे नाही. या  ॲप्सवर आपण अगदी मोफत स्वतःचे खाते उघडू शकतो आणि आपली ऑनलाइन खरेदी करून कॅशबॅक मिळवू शकतो. 
  • कॅशबॅक डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून केलेल्या खरेदीवरही मिळू शकतो. अर्थात शॉपिंग साईटच्या नियमांनुसारच कॅशबॅक मिळतो. 
  • अमॅझोनवर जर तुम्ही खरेदी करत असाल तर त्यांच्या नियमांचे पालन करावे लागेल. उदा. विशेष सवलतीच्या दरात अमॅझोनवर खरेदी करता येते. यामध्ये एखाद्या वस्तूची खरेदी केल्यास अमॅझोन पे बॅलेन्स नुसार कॅशबॅक मिळतो. यासाठी त्या त्या वस्तूसाठी असणारी कॅशबॅकची रक्कम वेगवेगळी असते. 
  • अनेकदा गिफ्ट कार्डच्या माध्यमातून कॅशबॅक जमा होतो. काही वेबसाईटवर कॅशबॅक फक्त ‘प्रीपेड ऑर्डर’वरच मिळतो. म्हणजेच ऑफरमध्ये असणार्‍या वस्तूंची रक्कम आधी नेटबँकिंग किंवा क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे भरावी लागते तरच कॅशबॅक मिळू शकतो.
  • अनेक कंपन्यांची कॅशबॅक देण्याची पद्धत आणि टक्केवारी वेगळी असते.

विशेष लेख: हे ३० पासवर्ड चुकूनही वापरू नका

Cashback FAQ: कॅशबॅक संदर्भातील काही महत्वाचे प्रश्न 

१. कॅशबॅक कधी जमा होतो? 

  • जेव्हा एखादी वस्तु कॅशबॅक ऑफरमधून खरेदी केली असेल आणि त्याची रक्कमी ऑफरमध्ये नमूद केलेला पर्याय वापरून भरल्यास, ऑफरमध्ये नमूद केलेल्या नियमांनुसार ‘कॅशबॅक’ची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा होते. 
  • तसेच, जर एकाच वेळी वेगवेगळ्या किमतीच्या वस्तू खरेदी केल्यास त्यांचा कॅशबॅक त्या त्या वस्तूवर आधारित वेगवेगळा मिळतो. 

२. कॅशबॅक  मिळाला आहे, हे कोठे पाहू शकतो? 

  • संबंधित ऑनलाइन शॉपिंगच्या वेबसाईटवर अथवा ऑफरमध्ये नमूद केलेल्या  लिंकवर जाऊनकॅश बॅक तपासू शकता. 

३. कॅशबॅक किती वेळा मिळवू शकतो? त्याची मर्यादा आहे का? 

  • कॅशबॅक आपण कितीही वेळा मिळवू शकतो. त्यावर मर्यादा नाहीत. मात्र बहुतांश वेळा कॅशबॅक पैशाच्या स्वरुपात परत मिळू शकत नाहीत. 
  • यासंदर्भात संबंधित ऑफरमध्ये काही मर्यादा घातलेल्या असल्यास त्यानुसारच कॅशबॅक मिळू शकतो. 
  • खरेदी करण्यापूर्वीच कॅशबॅक ऑफर्स संदर्भात नियम व अटींची पूर्ण माहिती करून घ्या. 

४. जर कॅशबॅक ऑफरची वस्तु रद्द केली किंवा परत (Return) केली तर काय होईल?

  • जर आपण एखादी वस्तू कॅशबॅक ऑफरमध्ये खरेदी केली आणि ती वस्तू आपल्याला मिळायच्या आत जर आपण ती रद्द केली तर त्या वस्तूची आपण भरलेली मूळ किंमत आपल्याला परत मिळते. 
  • समजा एखादी वस्तू जर आपण १०००० रुपयांना खरेदी केली आणि त्यावर १०% म्हणजेच १००० रुपये कॅशबॅकच्या स्वरूपात मिळाले.  म्हणजेच ती वस्तू आपल्याला ९००० रुपयांना मिळाली. पण जर ती आपण रद्द केली तर आपण भरलेले ९००० रुपये आपल्याला परत मिळतात. 

कॅशबॅक ऑफर ही नक्कीच फायदेशीर आहे. त्यामुळेच ऑनलाइन शॉपिंगच्या मोहाला आवर घालता येत नाही. खरंतर हाच या ऑफर्समागचा मूळ मुद्दा आहे. फायदेशीर ठरणारी ही कॅशबॅकची दुनिया आगामी सणासुदीच्या काळात बहरास येणार आहे. पण कॅशबॅक निवडताना त्या त्या कंपन्यांच्या नियम आणि अटी वाचायला मात्र विसरू नका. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: What is Cashback Marathi Mahiti, Cashback in Marathi, Cashback  Marathi, Cashback  mhanje kay

Share this article on :
You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.