Credit Score: क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर त्याचा खरंच फायदा होतो का?

Reading Time: 2 minutes कर्जदायी संस्था कर्ज देताना एकाच गोष्टीची पुन्हा पुन्हा खात्री करून घेतात, ती म्हणजे अर्जदाराची आर्थिक विश्वासार्हता. कर्ज मान्य केल्यावर त्याची पूर्ण परतफेड होणार आहे का, आणि ती ठराविक वेळेत होणार आहे का ह्या दोन प्रश्नांची खात्रीशीर सकारात्मक उत्तरं मिळाल्याशिवाय कोणतीही संस्था ग्राहकाला कर्ज मान्य करताना दिसत नाही. आता ही उत्तरं बँकांना किंवा कर्जदायी संस्थांना कशी मिळतात?  अर्थातच सिबिल कडून.