The rule of 72
गुंतवणूक केव्हा दुप्पट होणार हे लक्षात येण्यासाठी एक नियम अर्थशास्त्रात सांगण्यात आला आहे त्या नियमाला “72 चा नियम (The rule of 72)” असे म्हणतात.
- प्रत्येक गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीची इच्छा असते की त्याने केलेल्या गुंतवणुकीतून दुप्पट परतावा मिळावा. गुंतवणूक दुप्पट कधी होणार हे व्याजाच्या दरावरती अवलंबून असते.
- आपल्यापैकी बरेच जण तर पैसे व्यर्थ खर्च होऊ नयेत म्हणून गुंतवणूक करतात. पण त्यातून देखील आपल्याला आर्थिक फायदा हा झालाच पाहिजे.
- 72 चा नियम म्हणजे काही जादूची काडी नाही. अगदी तुम्ही-आम्ही देखील या नियमाचा वापर करून आपली गुंतवणूक दुप्पट केव्हा होईल हे जाणून घेऊ शकतो.
- यातील आकडेमोड देखील अगदी सोपी आहे त्यासाठी कुठल्याही तज्ज्ञाकडे जाण्याची आवश्यकता नाही.
हे नक्की वाचा: महिन्याला केवळ ५००० रुपयांची गुंतवणूक करून करोडपती व्हा
The rule of 72: काय आहे 72 चा नियम?
- “72 चा नियम” असे सांगतो की, गुंतवणुकीच्या व्याजदराने तुम्ही 72 ला भागले तर तुमची गुंतवणूक दुप्पट केव्हा होईल याचे उत्तर तुम्हाला सापडेल.
- बघा, एखादी बँक त्यांच्या फिक्स डिपॉझिट वर पाच टक्के वार्षिक व्याज देत असेल तर तुम्ही या नियमाच्या सहाय्याने तुमची गुंतवणूक दुप्पट केव्हा होईल याचे उत्तर अगदी सहज देऊ शकता.
- 72/5 =14.4 वर्ष म्हणजेच 5 टक्के व्याजदराने तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी अंदाजे 14 वर्ष लागतील.
The rule of 72: उदाहरण
- 72 चा नियम कुठल्याही अशा व्याजदराला लागू पडतो ज्याची वाढ चक्रवाढ पद्धतीने होते उदा. जनसंख्या, macroeconomics numbers, कर्ज.
- म्हणजे समजा जीडीपी (GDP) ची वार्षिक वाढ 4% असेल तर लक्षात घ्या जीडीपी दुप्पट व्हायला किती वर्ष लागतील?
जीडीपी (GDP) ची वार्षिक वाढ 4% 72 च्या नियमानुसार 72 /4 = 18 |
|
- याचाच अर्थ 4% वार्षिक वाढ जर राहिली तर GDP दुप्पट व्हायला तब्बल १८ वर्ष लागतील.
- 72 चा नियम या पद्धतीने तुम्ही कुठल्याही चक्रवाढ दराने वाढणाऱ्या व्याजदरासाठी वापरू शकता.
महत्वाचा लेख: तरुणपणीच गुंतवणूक करण्याचे महत्त्व
गुंतवणुक लवकर दुप्पट होण्यासाठी किती व्याजदर आवश्यक आहे?
- आता आपल्यापैकी प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की कमी काळात गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी किती व्याजदर आवश्यक आहे. याच नियमाच्या आधारे आपल्याला तो व्याजदर देखील काढता येईल.
- जर तुम्हाला तुमची गुंतवणूक अगदी तीनच वर्षात दुप्पट करून हवी असेल, तर तुम्हाला किमान 21 ते 24% व्याजदर आवश्यक आहे.
- जर तुम्हाला तुमची गुंतवणूक पाच वर्षांमध्ये दुप्पट करून हवी असेल, तर त्यासाठी 14.4% एवढं व्याजदर आवश्यक आहे.
- जर तुम्हाला येत्या दहा वर्षांमध्ये तुमची गुंतवणूक दुप्पट करून हवी असेल, तर त्यासाठी किमान 7% एवढा व्याजदर आवश्यक आहे.
- मित्रांनो अनेक अशा योजना आहेत ज्या तुम्हाला इतर गुंतवणुकीत पेक्षा कमी काळात तुमची गुंतवणूक दुप्पट करून देऊ शकते.
- पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, KVP, NSC,NPS इत्यादी सरकारी योजनांमधील गुंतवणूक कमी काळात दुप्पट होऊ शकते.
- त्याचसोबत लवकरात लवकर जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी म्युचअल फंड हा देखील एक चांगला पर्याय आहे.
- हा नियम तुम्ही सर्व प्रकारच्या गुंतवणुकीसाठी निर्धास्तपणे वापरू शकता.
गुंतवणूक तज्ज्ञ वॉरन बफेट यांनी गुंतवणुकीवर भाष्य करताना असे म्हटले आहे की एकविसाव्या शतकात चांगल्या व्याजदराने दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक तुम्हाला आणि तुमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेला भरपूर फायदा देऊन जाईल.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: The rule of 72 Marathi, The rule of 72 in Marathi, The rule of 72 Marathi Mahiti, The rule of compounding in Marathi, The rule of compounding Marathi Mahiti