Reading Time: 2 minutes

तुमच्या मासिक पगारातून येणारा पैसा योग्य प्रकारे व्यवस्थापित करण्यास सक्षम असणे म्हणजे योग्यप्रकारे त्याचे आर्थिक नियोजन (Financial planning) करणे होय. तुम्ही तुमचा पगार कसा वाचवायचा किंवा कसा व कुठे गुंतवायचा याबद्दल सल्ला शोधत असाल तर तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. तुमच्या कष्टाने कमावलेल्या पगारातून तुमची बचत आणि संपत्ती निर्माण करण्यास मदत करण्यासाठी हा लेख तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. 

 

तुमच्या पगाराचे योग्य आर्थिक व्यवस्थापन कसे कराल –

  • बजेटिंग तुम्हाला तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवण्यास व खर्चाचा मागोवा घेण्यास मदत करते. 
  • मासिक खर्चाचा मागोवा घेतल्यानंतर तुमचे पैसे कोठे खर्च केले गेले, याचा अंदाज बांधता येतो. यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वास्तववादी अंदाजपत्रक ठरवा व यासाठी बिले किंवा ईएमआय यांसारख्या निश्चित खर्चांना प्रथम प्राधान्य द्या.
  • ‘५०-३०-२०’ नियम हा देखील एक उत्तम मार्ग आहे, जो तुम्ही तुमच्या बचतीचे प्रभावीपणे बजेट करण्यासाठी वापरू शकता. तुमच्या उत्पन्नातील ५०% तुमच्या आवश्यक बिलांवर, ३०% तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर आणि २०% जीवनशैली संबंधित खर्चावर खर्च करा.

 

  • तुमचा पैसा गुंतवण्याऐवजी तुम्हाला जे साध्य करायचे आहे त्यासाठी एक फ्रेमवर्क तयार करा. 
  • तुम्ही तुमची उद्दिष्टे स्टॉक्स, इक्विटी किंवा म्युच्युअल फंड यांसारख्या दीर्घकालीन गुंतवणूक पर्यायांमध्ये आणि लिक्विड फंडासारख्या अल्पकालीन उद्दिष्टांमध्ये विभाजित करू शकता आणि त्यानुसार तुमचे उत्पन्न वाचवू शकता.
  • याने तुम्हाला प्रत्येक ध्येयासाठी अजून किती काळासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे, हे निर्धारित करण्यास सोपे जाईल.

 

  • उपलब्ध असलेले सर्व गुंतवणूक पर्याय व योजना पाहून भारावून जाऊ नका. 
  • गुंतवणूक संदर्भातील आर्थिक नियोजनाची सुरुवात करण्यासाठी पहिली पायरी म्हणजे विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे.
  • तुमची गुंतवणूक ही नेहमी तुमच्या भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांशी सुसंगत असावी. तुमच्या उद्दष्टांमध्ये काय उत्तम बसते याचे संशोधन करणे महत्त्वाचे आहे.

 

हेही वाचा – आर्थिक व्यवस्थापनातील तांत्रिक गोष्टी: पैसा कसा वापरायचा?

  • नवनवीन मालमत्ता,भेटवस्तू आणि इच्छा यावर खर्च करत राहणे सोपे असते. परंतु हे खर्च शेवटी कितीतरी मोठ्या पटीने मोठे वाटतात.
  • तुम्ही भेटवस्तू किंवा एखाद्या मालमत्तेवर खर्च केलेल्या प्रत्येक १००० रुपयांसाठी, १० रुपये वाचवा. ही छोटी रक्कम दीर्घकाळात तुमच्या बचतीमध्ये भर पडेल! 

 

  • तुमच्या कर्जावरील उच्च व्याज दर व क्रेडिट कार्डे तुमच्या वैयक्तिक आर्थिक स्थितीवर एक मोठा भार असू शकतात. 
  • एकदा तुम्ही स्थिर कमाई करण्यास सुरुवात केल्यानंतर तुम्ही शक्य तितक्या लवकर त्यातून बाहेर पडले पाहिजे.

 

  • सर्वात मोठी व महत्त्वाची संपत्ती म्हणजे तुमचे आरोग्य. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल सदृढ असणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विमा गरजेचा आहे. 
  • तसेच, तरुण वयामध्ये आरोग्य व जीवन विमा असणे, हा तुमच्या यशाचा एक  महत्त्वाचा घटक आहे.
  • हेल्थ इंश्युरन्स हा एक सेफ्टी किट सारखा असतो, जो तुम्ही नेहमी तुमच्यासोबत ठेऊ शकता.  आरोग्य विमा योजना विविध प्रकारच्या असून तुम्ही त्या योग्य प्रकारे निवडा. 

 

  • ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात बर्‍याच ऑफर्स असतात. त्या प्रमोशनल ऑफर्सचा वापर करा व तिथे काहीप्रमाणात पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. 
  • खर्च वाचवण्यासाठी अनावश्यक खरेदीतून जास्त बचत करावी. खरेदीसाठी उच्च ऑफर, किंवा कमी किंमतीच्या कुपनांचा वापर करा. 

 

  • तुमची मेहनत ही तुम्हालाच फलदायी जीवन देते. पैशांची पूर्तता करताना तुमच्या गरजांना, तुमच्या आवडीनिवडींना आळा बसता कामा नये. 
  • तुमची आवड छंद जोपासा, विकेंडला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा. यांवर मात्र तुमच्या आर्थिक बचतीचे कुंपण घाला.    

 

  • तुमचे भविष्य हे अनिश्चित आहे, त्यामुळे आधीपासून बचत करणे गरजेचे आहे. 
  • जेव्हा तुम्हाला आपत्कालीन परिस्थितींमध्ये पैशांची निकड असते, अशा परिस्थितींमध्ये आपत्कालीन निधी तुम्हाला सुसज्ज ठेवतो.     

 

तुमचे भविष्य सुखी व सोपे करण्यासाठी आणि तुमच्यावरील जबाबदाऱ्या, ताणतणाव कमी करण्यासाठी आर्थिक व्यावास्थापन हे आवश्यक आहे. आर्थिक व्यवस्थापनामुळे तुम्ही जीवन आत्मविश्वासाने जगू शकता व अधिक मनःशांतीचा आनंद घेऊ शकता. 

तुम्हाला तुमच्या पुढील आनंदमयी आर्थिक जीवनासाठी खूप शुभेच्छा ! 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…