Reading Time: 3 minutes

 यापूर्वी आपण आरोग्य विमा घेताना कोणती काळजी घ्यावी हे मी लिहिलेल्या लेखांमध्ये वाचले असेलच. त्याची थोडी उजळणी करतो-

       

आरोग्यावर करायला लागणाऱ्या खर्चात कोविड 19 नंतरच्या काळात सातत्याने, सर्वसाधारण महागाईच्या दोन ते तीन पटवाढ होत असल्याने नेमक्या किती रकमेचा आरोग्यविमा घ्यावा हा प्रश्न पडू शकतो. आता घरातील प्रत्येकाचा वैयक्तिक विमा घेणे परवडणारे नसल्याने अनेकजण संपूर्ण कुटुंबासाठी एकत्रित (Family floater policy) घेतात.

आरोग्य विमा  घेताना या गोष्टी लक्षात घ्या-

1.करारातील नियम अटी

2. दावे मंजूर करण्याचे प्रमाण

3. प्रीमियम रक्कम इतर कंपन्यांचा तुलनात्मक प्रीमियम

 

4. मिळणाऱ्या विविध सोई सुविधा जसे

  • ओपीडी खर्च, 
  • विविध तपासण्या, 
  • रुग्णालयात भरतीचा कालावधी, 
  • डे केअर सुविधा, 
  • राहण्याचा खर्च, 
  • रुग्णवाहिकेचा खर्च, 
  • कोणते आजार समाविष्ट आहेत/ नाहीत, *आजारावरील खर्चाची मर्यादा, मोतीबिंदू सारख्या विशिष्ट आजाराची पात्रता,
  • घरातून केलेल्या उपचार खर्चाची भरपाई,
  • विशेष उपचारांची सोय,
  • पर्यायी उपचार पद्धतीची सोय, 
  • आधुनिक तंत्रज्ञान वापरायची सोय, 
  • वर्षभरात दावा दाखल न झाल्यास पात्र बोनस किती,
  • दुसऱ्या तज्ञांचे मत घेण्याची सुविधा, 
  • रुग्णालयात भरती होण्यापूर्वी व सोडल्यावर किती दिवसापर्यतच्या खर्चास मंजुरी
  • नाकारले जाणारे खर्च
  • जवळपास कॅशलेस हॉस्पिटलची सोय.
  • कॅशलेस सुविधा 100% कॅशलेस नसते, हॉस्पिटलच्या नियमाप्रमाणे काही डिपॉझिट तेथे ठेवावे लागते (साधारण 20%) 
  • खर्च मर्यादा, को पेमेंटची गरज.

 

5. शक्यतो सर्व कुटूंबाची एकच पॉलिसी घेऊन बरोबर रायडर घेणे अधिक फायद्याचे, जरूर तर विशेष योजना वेगळी घ्यावी

6.आजाराचा पूर्वेतिहास असल्यास त्याची भरपाई पात्रता कधी ते माहिती करून घ्यावे. हा कालावधी थोडी अधिक रक्कम भरून कमी करता येतो.

7. आरोग्य तपासणीची सुविधा

8. गरजेनुसार सुरक्षा कवच वाढवण्याची सोय

9. पॉलिसी पोर्ट करण्याची म्हणजेच इन्शुरंस देणारी विमाकंपनी बदलण्याची सोय

10. तक्रार निवारण यंत्रणा.

 

हे ही वाचा – आरोग्य विमा पॉलिसी कूलिंग-ऑफ कालावधी म्हणजे काय रे भाऊ ?

हे सर्व गोष्टी तपशीलवार पुन्हा देण्याचे कारण यामुळे असा आकस्मित खर्च उद्भवला तर त्याचा अतिरिक्त भार आपल्यावर पडत नाही.

आरोग्यविमा घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने-

  1. नियामकांच्या संकेतस्थळावरील ग्राहक शिक्षण विभागात दिलेली माहिती वाचावी  
  2. आरोग्य विमा पुस्तिका डाउनलोड करावी. 
  3. अर्ज स्वतः भरावा आणि सही करावी
  4. ऑनलाईन पॉलिसी खरेदी करणाऱ्यांनी तसेच जर योग्य वाटत असलेल्या सर्वानीच इन्शुरंस रेपोजेटरी खाते उघडून आपल्या सर्व पॉलिसी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात घ्याव्यात आपल्या मृत्यूनंतर खात्यावरील पॉलिसीचे दावे दाखल करण्यासाठी अधिकृत प्रतिनिधी नेमावा, यासाठी वारसाची नेमणूकही करता येते. ही विनामूल्य सुविधा आहे.
  5. आपल्या विमा कंपनीचा तसेच IRDA च्या कॉल सेंटरचा टोल फ्री क्रमांक आणि मेल लिहून ठेवावा.
  6. कंपनीकडून आलेले सदस्यता पत्र, पॉलिसी कागदी स्वरूपात असल्यास ते करारपत्र याशिवाय सहज मिळेल अशा ठिकाणी आपली ओळख पटवून देणारे कागदपत्र वेळेवर व सहज मिळतील अशा ठिकाणी ठेवावेत म्हणजे मनस्ताप होणार नाही. पॉलीसी डिजीलॉकर या सरकारी अँपमध्ये साठवून ठेवता येते. पोर्ट केलेल्या पॉलिसीचे पुरावे जपून ठेवावेत.
  7. रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास लवकरात लवकर 24 तासात कंपनीस माहिती द्यावी जर पूर्वनियोजित शस्त्रक्रिया असेल तर नियोजित तारखेपूर्वी कंपनीस माहिती द्यावी.
  8. आवश्यकता असणाऱ्यानीच बाळंतपणाच्या खर्चाची भरपाई देणाऱ्या योजना विचारात घ्याव्यात.
  9. भरपाई दावे त्वरित सादर करावेत मुदत निघून गेल्यास योग्य ते स्पष्टीकरण करणारे टिपण सोबत जोडावे. रुग्णालयातून सोडल्यावर 30 दिवसांत सादर केलेल्या मागणीस काही अडचण शक्यतो येत नाही.
  10. विमा नविनीकरण करण्याच्या कालावधीत काही उपचार घ्यावे लागल्यास त्याचा खर्च आपल्याला करावा लागतो. यासाठी मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण न विसरता करावे. यासाठी मोबाईलमध्ये रिमाईंडर लावता येईल.

          

आकस्मित संकट सोडून जर काही पूर्वनियोजित उपचार करायचे असतील तर ते कॅशलेस पद्धतीनेच घ्यावेत, जर ही योजना नसती तर हॉस्पिटलमध्ये आपण कोणता क्लास स्वीकारला असता?  याचा विचार करावा आपल्याला मिळणारा खर्च ही वसुली नाही कारण औषधांच्या किमती सोडून इतर सर्व खर्च हे तुमच्या क्लासशी निगडित असतात. आपण अधिक वरचा क्लास स्वीकारला तर खर्च वाढतो, त्यामुळे आपण अडचणीत  येऊ शकतो.

       

आता अनेक प्रकारच्या कल्पक पोलिसीज बाजारात आल्या असून त्यात विमाधारकांच्या उपयोगी पडतील अधिक गोष्टी समाविष्ट केलेल्या असतात. थोडा अधिक प्रीमियम देवून मिळू शकणाऱ्या सुविधा अनेकांना माहिती नसल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत यातील एक सुविधा म्हणजे विमा कालावधीत आजारामुळे मूळ विमा रक्कम पूर्ण वापरून झाल्यास तेवढ्याच रकमेची पुनर्स्थापना (Restoration benifit) करण्यात येते. जे लोक आपल्या आणि कुटुंबातील सदस्यांसाठी एकत्रित पॉलिसी त्याच्यासाठी अशी सुविधा अत्यंत उपयुक्त आहे. काही कारणांमुळे कुटुंबातील सदस्यांना वारंवार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची वेळ आल्यास एक किंवा दोन वेळेतच पूर्ण रक्कम संपून जाण्याची शक्यता असते त्यामुळेच पुरेश्या रकमेची पॉलिसी नसल्याने पॉलिसी असूनही आर्थिक संकटाशी सामना करावा लागतो. 

            

आरोग्यविमा आपोआप पुनर्स्थापित करणारी ही योजना विमा रक्कम संपल्यावर पुन्हा पुन्हा जादू झाल्याप्रमाणे स्थापित होत असल्याने विमाधारकास कायमचे सुरक्षाकवच प्राप्त होत असते. 

ही योजना दोन प्रकारात आहे. –

    

एका प्रकारात पॉलिसी रक्कम पूर्ण वापरून झाल्यावर पुनर्स्थापित होते. तर दुसऱ्या प्रकारात रक्कम अर्धवट वापरून झाल्यास लगेच पुनर्स्थापित केली जाते. म्हणजेच 5 लाखाचे सुरक्षाकवच असणाऱ्या एका कुटुंबातील दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे 4 लाख आणि 3 लाख रकमेचे दोन दावे असतील तर पहिल्या प्रकारात 7 लाखांऐवजी प्रथम 5 लाख रुपयांच्या कवचाबद्धल 5 लाख मंजूर होईल आणि पुन्हा 5 लाख रुपयांचे सुरक्षा कवच पुनर्स्थापित होईल जे यानंतर काही संकट आल्यास उपयोगी पडेल तर दुसऱ्या प्रकारात 4 लाख मंजूर झाल्यावर शिल्लख राहिलेले 1 लाखाचे कव्हर 5 लाख होईल त्यातून 3 लाख मंजूर होऊन राहिलेल्या 2 लाखाचे कव्हर पुन्हा 5 लाख होईल आणि ते पुन्हा काही प्रसंग आल्यास उपयोगी पडेल.

या योजनेत-

1) वर्षभरात कोणताच दावा दाखल न झाल्यास त्याचा पुढील वर्षी काही फायदा होईल अशी तरतूद नसते.

2) पहिला दावा दाखल करताना मर्यादेहून अधिक रकमेचा असेल तर तो मूळ प्रमाणात मंजूर होऊन नंतर पुनर्स्थापित होईल. म्हणजेच पॉलिसी कव्हर 5 लाख आणि पहिलेच बिल 8 लाख असल्यास फक्त 5 लाखच मंजूर होतील.

3) सुरक्षा कवचाची पुनर्स्थापना वेगवेगळ्या आजारांनुसारही होऊ शकते. काही पॉलिसीत एकाच प्रकाराचा आजार एकास व्यक्तीस झाल्यास सुरक्षा कवच पुनर्स्थापित होणार नाही अशी अट असते मात्र असा आजार अन्य व्यक्तीस झाल्यास सुरक्षा कवच पुन्हा पॉलिसी रकमेएवढे होते काही तर पॉलिसीत अशी अट नसते.

4) जे लोक संपूर्ण कुटुंबासाठी एकत्रित पॉलिसी घेतात ते लोक आपण कुठे राहतो त्यासाठी तेथे एका आजारास किती खर्च येऊ शकतो याचा अंदाज घेऊन पुरेशा रकमेची विमा पॉलिसी घेऊ शकतात.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.