पैशाचे व्यवस्थापन
https://bit.ly/3j9veRW
Reading Time: 3 minutes

गुगल की फ्रुगल ?…

पैशाचे व्यवस्थापन

समजा तुम्हाला १०,००० रुपये बोनस किंवा दिवाळी भेट म्हणून मिळाले, तर तुमच्या मनात पहिला विचार कोणता येईल? खर्च करू की गुंतवणूक? पहिला विचार मनात आला तर ‘गुगल’ आहेच तुमच्या सोबतीला. दुसरा विचार आला तर मनातल्या मनात आकडेमोड सुरु होईल. बहुतेक लोक खर्च करण्यास पसंती देतील. कारण एक तर सहज मिळालेले पैसे आहेत आणि खूप दिवस झाले खर्चच केला नाहीये. अशी मानसिकता जेव्हा तयार होते तेव्हा पैसा हाताळतांना चुका होण्याची शक्यता जास्त असते. याला आर्थिक वर्तन शास्त्रात ‘मेंटल अकाउंटींग’वर अवलंबून असते.

हे नक्की वाचा: नवरात्र विशेष: आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय? 

पैसा एक निर्जीव व दुधारी हत्यार:

 • पैसा हे एक निर्जीव व दुधारी हत्यार आहे. ज्याला स्वतःची अशी अंगभूत शक्ती किंवा गुणधर्म नाही.
 • तो चांगलाही नाही आणि वाईटही नाही. कारण त्याला निश्चित असा स्वभाव नाही. परंतु तो अशक्यप्राय शक्यतांसाठी नक्कीच “विवेकशील शस्त्र” आहे. कारण हा पैसा जर तुम्ही कष्टाने कमविला असेल तर त्याचा सदुपयोग होईल अशाच ठिकाणी त्याचा उपयोग कराल.
 • जर तो लॉटरीत मिळाला असेल किंवा सापडला असेल वा कोणाकडून भेट म्हणून मिळाला असेल, तर तुमच्या मौजमस्तीसाठी वापरण्याचा विचार कराल.
 • हाच पैसा जर तुम्हाला एखादी गुंतवणूक नुकसानीत विकून मिळाला असेल, तर तुमचा तो पैसाच टाळण्याकडे किंवा त्याचे नियंत्रण दुसऱ्याकडे देण्याचा कल असतो.
 • आपल्याकडे जेव्हाही असा अचानक पैसा येतो तेव्हा आपण त्याला नियोजनात घेण्याचा विचार न करता त्याला अतिरिक्त (एक्स्ट्रा) हे लेबल लावून टाकतो.
 • अचानक येणारा पैसा विविध मार्गांनी येत असतो. जसे की बोनस, कर परतावा, भेट, वारसा हक्काने मिळणे, मुदतपूर्तीची तारीख माहित नसलेली मुदत ठेव, आवर्ती ठेव किंवा विमा योजनेतून पैसे मिळणे अशा असंख्य वाटेने पैसे येत असतात.
 • हे पैसे ज्या वाटेने येतात त्याच वाटेने परत निघून जातात आणि असे करताना आपण आपल्या नियोजनातील कर्ज परतफेड असेल, निवृत्तीकोष निधी असेल किंवा इतर आर्थिक जबाबदाऱ्या विसरतो.
 • खरंतर अशी एखादी संधी आपल्याला आर्थिक स्वावलंबी बनविण्यास मदत करू शकते याचा आपण विचारच करत नाही.

नवरात्र विशेष लेख क्र. २: आर्थिक नुकसानाचा ‘फोबिया’

भावना, निर्णयक्षमता आणि पैशाचे व्यवस्थापन:

 • कोरोनामुळे खूप चांगल्या चांगल्या लोकांना जीव गमवावा लागला.
 • वडील गेल्यानंतर त्यांच्या मुदत ठेवीतून वारसहक्काने साधारण १६ लाख रुपये मिळालेली व्यक्ती मला भेटायला आली होती.
 • वडीलांचे पैसे आहेत मी कसे वापरू? या मानसिकतेत ते होते.
 • वडील गेल्याचे दुखः त्यांना निर्णय घेण्यास परावृत्त करत होतं.
 • खरंतरं त्यांच्यावर असलेल्या कर्जाची परतफेड करून ते आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकत होते. पण लोक काय म्हणतील? या भितीपोटी निर्णय घेण्यास कचरत होते.
 • खूप समुपदेशन केल्यानंतर त्यांनी निम्म कर्ज परतफेडीचा निर्णय घेतला.

नवरात्र विशेष लेख क्र. ३:  आर्थिक शिस्त लावणारी “काह-केह-बोह…..” 

मन वढाय वढाय:

 • माणसाच्या मेंदूत खालून वर जाणाऱ्या लहरी सतत वाहत असतात. त्यामुळेच मनात सतत विचार येत असतात.
 • तुम्ही कुठलीही कृती करतांना पुढील त्रिसूत्री वापरल्यास निर्णय घेणे सुलभ होईल.
  • पहिले सूत्र आलेल्या विचाराचा ‘हेतू’ काय आहे?
  • दुसरे हेतू स्पष्ट झाल्यानंतर त्याकडे डोळसपणे ‘लक्ष’ देणे.
  • तिसरे म्हणजेच शेवटी स्थितप्रज्ञ होऊन ‘स्विकार’ करणे.
 • ही त्रिसूत्री तुम्हाला ध्येय निश्चितीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
 • आर्थिक नियोजन करण्यापूर्वी खूप जणांना गोल प्लानिंग करायला अडचण येते. अशाप्रकारे विचार केल्यास कमी वेळात कृती आराखडा तयार होऊ शकेल.

नवरात्र विशेष लेख क्र. ४: मी श्रीमंत कसा होऊ? 

घरात नवीन पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागण्यापूर्वीच त्याचे खर्च सुरु होतात. खरंय ना? मग आर्थिक ध्येय (गोल) ठरविण्यासाठी अजून कुठल्या वेगळ्या हेतूची गरज आहे का? चाहूल लागण्यापासून ते आगमनापर्यंतचे सर्व टप्पे ‘गुगल’ केल्यास सहज माहिती उप्लब्ध होईल. माझे गुरु नेहमी म्हणतात एक मूल जन्माला घालणे म्हणजे त्याच्या पदवीपर्यंत किमान १ कोटी रुपयांचे नियोजन करणे. मी सहज म्हणून याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आलेली गोष्ट म्हणजे लहान मुलांचे ‘डायपर’. नवजात शिशूचे डायपर ८ रुपयांना मिळते. याच डायपरची किंमत बाळाच्या वजनानुसार वाढत जाते. बाळ ४ वर्षांचे किंवा १५ किलोंचे होईपर्यंत डायपरचा दर दुप्पट झालेला असतो. डायपर रोज किती लागतात याचा हिशेब निराळा. म्हणजेच लहान मुलांचे पालन पोषण महागाई दराला सुद्धा मागे ढकलत असतं. यावरून पैशाचे व्यवस्थापन किती महत्वाचे आहे हे लक्षात येईल. 

‘गुगल’ तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती देऊ शकते. पण ‘फ्रुगल’ राहायचं की नाही, हे ठरवायचं तुम्हालाच आहे.

– अतुल प्रकाश कोतकर

94231 87598

[email protected]

(लेखक म्युच्युअल फंड व विमा वितरक आहेत.)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
2 comments
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.