Reading Time: 4 minutes

आजकाल अगदी रस्त्याच्या कडेला फुलांची विक्री करणाऱ्या हातगाडी विक्रेत्याकडे सुद्धा मोबाइल आणि आणि यूपीआयची सोय असते. भारतात अतिशय अल्प दरात मोबाइलसेवा आणि इंटरनेटसेवा उपलब्ध झाल्यामुळे संपर्क क्षेत्रात क्रांती झाली आहे. अगदी तसच यूनिफाईड पेमेंट इंटरफेसने (UPI) खळबळ माजवून आर्थिक क्षेत्रांत क्रांती घडवून आणली आहे. ‘अगर यूपीआय हे साथमे, तो दुनिया मेरे हाथोमें’ असं म्हंटलं तर हे तंतोतंत बरोबर आहे. 

यूपीआयमुळे एकापेक्षा अधिक बँक खात्यांना, एकाच मोबाईल ॲप्लीकेशनमधे आणून, पैशांचे व्यवहार करता येतात. तसेच यूपीआयमुळे व्यापारी पेमेंट करता येतं, पेमेंटसाठी संकलन विनंती करता येते, ही विनंती वेळेप्रमाणे निश्चित करून आवश्यकतेनुसार आणि सोयीनुसार पेमेंट करता येतं.

  • 11 एप्रिल 2016 रोजी नॅशनल पेमेंट क्लिअरिंग कॉर्पोरेशनने रिझर्व बँकेचे तत्कालीन गव्हर्नर डॉ.रघुराम राजन यांच्या हस्ते या सेवेचे प्रायोगिक तत्वावर उद्घाटन केलं गेलं. आणि 21 सदस्य बँकांच्या साहाय्यानं ही प्रणाली सुरू केली.
  •  बँकांनी 25 ऑगस्ट 2016 पासून प्ले स्टोर आणि ॲप स्टोअर्सवर चालणारी अँड्रॉईड सक्षम यूपीआय ॲप्स आणि आयओएसवर चालणारी यूपीआय सक्षम ॲप्स उपलब्ध करून दिली.

यूपीआय प्रणालीची वैशिष्ट्ये

  • यूपीआयमुळे आर्थिक व्यवहार आणि पैशाची देवाण-घेवाण तात्काळ होते. 
  • तुमचं बचत खातं कुठल्याही बँकेमध्ये असलं, तरी यूपीआयच्या वापरासाठी एकच ॲपची आवश्यकता असते. 
  • यूपीआय ॲपच्या मदतीने पेमेंट करताना तुमच्या कोणत्याही वैयक्तिक माहितीची गरज नसते. यात फक्त आभासी पत्याद्वारे व्यवहार पूर्ण केले जातात.

उदाहरणार्थ – abc@***** अश्या यूपीआय आयडीचा वापर केला जातो.

  • यूपीआयमुळे स्मार्ट फोनमधले ॲप वापरुन वेगवेगळ्या व्यापारी वर्गाशी पैशाचे व्यवहार करता येतात. 
  • वीज, गॅस, लाईट, मोबाईल रिचार्ज, गुंतवणूक, डीटीएच केबल बिल, फास्टट्रॅक रिचार्ज, क्रेडिट कार्ड यासारख्या सेवा वापरल्यामुळे येणारी बिलं यूपीआय ॲपचा वापर करून भरता येऊ शकतात.
  • बँकेने दिलेली क्रेडिट लाईन सुविधा तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्डचे व्यवहार सुद्धा यूपीआयद्वारे  करता येणे शक्य आहे.
  • यूपीआय ॲपमधे तुम्ही बँक खात्याची शिल्लक रक्कमसुद्धा माहीत करून घेऊ शकता.
  • यूपीआय ॲपमधे ओटीसी काउंटर पेमेंट, क्यू आर कोड म्हणजे स्कॅन अँड पे वापरुन व्यवहार करता येतात.ओटीसी काउंटर पेमेंट म्हणजे एखाद्या सेवेच्या बदल्यात थेट विक्रेत्याला पैसे देणं.

उदाहरणार्थ – हॉटेलमधे जेवण झाल्यानंतर बिल भरताना पैसे थेट हॉटेल मालकाच्या सर्व्हरला देणं किंवा पेट्रोल भरल्यानंतर  कॅशियरला पैसे देणं.

  • यूपीआय ॲपमधे देणगी देणं, संकलन म्हणजे पेमेंट घेणं आणि वितरण म्हणजे एकाच वेळी एका व्यक्तीला किंवा अनेक व्यक्तींना पेमेंट करणं शक्य आहे.

माहितीपर:लिपस्टिक इंडेक्स आणि अर्थव्यवस्था 

यूपीआय मधील सहभागी घटक

  • पैसे देणारा आणि पैसे घेणारा
  • पैसे पाठवणारी बँक आणि लाभार्थी बँक
  • एनपीसीआय (पैसे समायोजन करणारी संस्था) 
  • व्यापारी

कोविड महामारीमुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्यानं यूपीआय ही पद्धत अतिशय उपयोगी ठरली. आणि त्यातील सोयी पाहून बहुतेक लोकांनी ही पद्धत सहज स्वीकारली.आता सर्वाधिक व्यवहार हे यूपीआयच्या माध्यमातून केले जातात.

  • जुलै 2024 रोजी 206 लाख कोटीहून अधिक रकमेचे आणि 144 लाख कोटींहून अधिक व्यवहार यूपीआयद्वारे केले गेले आहेत. एकूण व्यवहाराच्या 60% हून अधिक व्यवहार यूपीआयद्वारे केले गेले आहेत. 
  • पारंपरिक रोख व्यवहारापासून दूर जाण्याचा ग्राहकांचा कल, ॲपमधील मूल्यवर्धित सोयी, तृतीय पक्षी ॲपची वाढती संख्या हे सगळं लक्षात घेतलं, तर येत्या पाच वर्षात यूपीआयच्या वापराचे प्रमाण 90% पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. भविष्यात रोज 100 कोटींहून अधिक व्यवहार यूपीआयद्वारे होतील असं म्हंटलं जातंय.

यूपीआयवर आधारित लोकप्रिय ॲप्स आणि त्यांची वैशिष्ट्ये-

फोन पे : 

  • सन 2015 रोजी सुरू झालेले हे ॲप पूर्वी डिजिटल वॉलेट होते. आता यूपीआय ॲपचे सर्व कार्य करीत आहे.
  • फोन पे हे सर्वाधिक लोकप्रिय ॲप आहे.
  • फोन पेचा बाजारातला एकूण सहभाग 50% आहे.
  • फोन पे एकूण अकरा भाषांत उपलब्ध आहे.

भीम ॲप :

  •  कागद विरहित अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून सरकारद्वारा उपलब्ध करून देण्यात आलेलं एन सी पी आय- (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया )द्वारे विकसित करण्यात आलेलं हे ॲप आहे.
  • भीम ॲप एकूण वीस भाषांत उपलब्ध आहे.

पेटीएम : 

  • पेटीएम हे छोट्या व्यापाऱ्यांत अतिशय लोकप्रिय ॲप आहे. मात्र अलीकडे याचा बाजार हिस्सा कमी झाला आहे. पेटीएम जलद व्यवहारासाठी ओळखलं जाते.

गुगल पे : 

  • गुगलद्वारे बाजारात आलेलं दुसरं सर्वाधिक लोकप्रिय, विश्वसनीय आणि विश्वासार्ह ॲप म्हणजे गुगल पे आहे.
  • गुगल पे ॲपसुद्धा झटपट व्यवहारासाठी लोकप्रिय आहे.
  • या ॲपमधे ग्राहकानं पेमेंट करून व्यवहार पूर्ण केल्यानंतर त्याला आकर्षक बक्षिस दिलं जातं. 
  • या ॲपमधे ग्राहकांसाठी कायम विशेष ऑफर्सची रेलचेल असते. 

अक्ष पे आणि फ्री चार्ज :  

  • अक्ष पे आणि फ्री चार्ज ही दोन्ही ॲप्स अँक्सिस बॅंकेनं ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.तसेच यासाठी सदर बँकेत बचत खातं असण्याची आवश्यकता नाही.

क्रेड : 

  • क्रेड या ॲपमधे बिलाची विभागणी करून बिल भरता येतं.
  • या ॲपमधे 100% कॅशबॅक मिळण्याची आणि विविध बक्षिसे जिंकण्याची शक्यता असते. 

आय मोबाईल

  • आय मोबाईल हे ॲप आयसीआयसीआय बॅंकेनं ग्राहकांना उपलब्ध करून दिलं आहे.
  • या ॲपसाठी आयसीआयसीआय बँकेत खाते असण्याची आवश्यकता नाही.
  • या ॲपमधे 400 पेक्षा अधिक सुविधा उपलब्ध आहे.

पे झॅप

  • पे झॅप हे ॲप एचडीएफसी बॅंकेनं ग्राहकांना उपलब्ध करून दिलं आहे.
  • हे ॲप व्हर्चुअल व्हिसा डेबिट कार्डासह उपलब्ध आहे. 

पॉकेट :

  • पॉकेट हे ॲप आयसीआयसीआय बॅंकेनं ग्राहकांना उपलब्ध करून दिलं आहे.
  • ग्राहकांना हे ॲप एक डिजिटल वॉलेट म्हणून सुद्धा वापरता येते.
  • पॉकेट हे ॲप फिजिकल कार्डासोबत तसेच व्हर्चुअल डेबिट कार्डासोबतही वापरता येतं. फिजिकल कार्ड पाहिजे असल्यास बॅंकेकडून मिळवता येतं.
  • या ॲपचा वापर आपण ऑडीओच्या मदतीने करू शकतो म्हणजेच संपर्करहित वापर करता येतो.

थोडक्यात महत्वाचे : स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुदत ठेवीचे पर्याय

 यूपीआयवर आधारित ॲप्स ही ग्राहकस्नेही असून ती डाउनलोड करणं,कार्यान्वित करणं अगदीच सोपं आहे. यूपीआयला सरकारी पाठबळ असल्यामुळे याचा वापर करणं सुरक्षित आहे. तसेच ॲपबद्दल काही समस्या असल्या तर त्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून सोडवता येतात. 

  • ॲप वापरताना काही किरकोळ गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत, त्यावर मात करण्याचे उपायही आहेत. हे उपाय वापरल्यास आपल्याला उपयोगच होतो आणि त्यासाठी आपल्याकडून कोणतेही शुल्क सध्यातरी घेतले जात नाही. 
  • शुल्क मुळातच खुप नगण्य असून ते व्यावसायिकांकडून घेतले जाते. त्यांचा व्यवसाय वाढत असल्याने सर्वच व्यावसायिकांनी या सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. 
  • ग्राहकांच्या मागणीनुसार यातून मिळणाऱ्या सेवांमध्ये सातत्याने वाढ होत असते. काही अ‍ॅप्सवर आपण तोंडी सूचना देऊ शकतो. 
  • आज खरेदी करा उद्या पैसे द्या किंवा हप्त्याने पैसे द्या, कर्ज मिळणं, नवीन खातं उघडणं, आपल्या घरातील अतिवृद्ध व्यक्ती बँक खात्याशी संलग्न न होता मर्यादित रक्कम खर्च करू शकतील अशी सुविधा पुरवणं, मुलांच्या पॉकेटमनीसाठी याचा वापर करता येईल, अन्य स्मार्ट उपकरणात ही सेवा वापरता येईल अशा सुधारणा ॲपमधे होत आहेत किंवा अपेक्षित आहेत. तेव्हा ॲपचा वापर करणं  आपण टाळू शकणार नाही.त्यामुळे  “दुनिया मेरी हाथोमें”…. .ही टॅगलाईन सर्वांनाच लागू पडते.

यूपीआय पेमेंट अँप्स विषयीचे सर्वसामान्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे-

  • प्रश्न- सर्वोत्तम यूपीआय ॲप कोणते?

उत्तर: फोन पे, गुगल पे, भीम, पेटीएम हे विश्वासार्ह असल्याने त्यांचा वापर सर्वाधिक केला जातो.

  • प्रश्न- यूपीआयसाठी सर्वोत्तम बँक कोणती?

उत्तर: एचडीएफसी बँक ही त्याच्या डेबिट रिव्हर्सल दरतल्या यशामुळे लोकप्रिय आहे.

  • प्रश्न- आपण एकाहून अधिक यूपीआय ॲप वापरू शकतो का?

उत्तर: हो प्रत्येक ॲपचे कमी अधिक वैशिष्ट्य असल्याने आपण सोईनुसार एकाहून अधिक ॲप वापरू शकतो.

  • प्रश्न – रुपे ची मालकी कोणाकडे आहे.

उत्तर: ही नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची निर्मिती असून पूर्णपणे स्वदेशी आहे.

  • प्रश्न-यूपीआय व्यवहार मर्यादा किती आहे?

उत्तर: रोज एक लाख इतकी मर्यादा आहे मात्र अलीकडे काही सेवा जसे की हॉस्पिटल, कर भरणा, शैक्षणिक संस्थाना पेमेंट करण्यासाठी ही मर्यादा अलीकडेच पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

  • प्रश्न- विशिष्ट यूपीआय ॲपची मक्तेदारी भविष्यात होऊ शकते का?

उत्तर: सध्या फोनपे, गुगलपे आणि काही प्रमाणात पेटीएम यांनी मोठी बाजारपेठ काबीज केली आहे. अनेक ग्राहकांना उपयुक्त अशी ॲप्स बाजारात येत असून कोणत्याही एका ॲपने 30% पेक्षा अधिक बाजारपेठ काबीज करू नये, असे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे धोरण असून त्याची टप्याटप्याने अंबलबजावणी करण्यात येत आहे.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखातील मते वैयक्तिक असून तो कोणत्याही यूपीआय अँपची शिफारस करीत नाही.)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.