Reading Time: 2 minutes

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसची (UPI) निर्मिती केली. जी त्वरित पेमेंट प्रणाली म्हणून ओळखली जाते. NPCI च्या मते, “UPI हे IMPS पायाभूत सुविधांवर तयार केले आहे. याद्वारे  तुम्हाला कोणत्याही दोन वेगवेगळ्या शाखेच्या बँक खात्यांमध्ये त्वरित पैसे हस्तांतरित करण्याची परवानगी देण्यात येते.आणि याच गोष्टीचा फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.पण या प्रणालीचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसत आहेत. त्यामुळे वेळोवेळी सतर्क राहणे गरजेचे आहे. हे दुष्परिणाम कसे रोखावे याबद्दलची माहिती खालील लेखात देण्यात आली आहे. 

 तुम्हाला माहीत आहे का? फसवणूक करणारे दिवसेंदिवस चतुर होत आहेत. UPI, वेगवेगळ्या बँक खात्यांमधून निधी हस्तांतरित करण्याचा जलद आणि सोपा मार्ग आहे. तुमची फसवणूक करण्यासाठी UPI चा गैरवापर केला जाऊ शकतो. यासाठी आपल्याला सतर्क राहणे खूप गरजेचे आहे.अशा फसवणुकीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी 

५ मार्ग आहेत ज्यामुळे आपण आपले आर्थिक नुकसान टाळू शकतो.  

चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते ५ मार्ग

१)अनोळखी व्यक्तीच्या जाळ्यात अडकू नका – 

  •  तुम्हाला एखाद्या अनोळखी मोबाईल नंबर वरून कॉल आला आणि समोरील व्यक्तीची ओळख पटत नसेल तर त्यांना वैयक्तिक माहिती देऊ नका.
  • खुल्या वेबसाईटवरून मिळणारे फोन नंबर काळजीपूर्वक तपासायला हवेत. सोबतच एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची बँक तुम्हाला कधीही कॉल किंवा मेसेजवर कोणतीही गोपनीय माहिती विचारत नाही.

२)पेमेंट विनंती आणि स्पॅम चेतावणी पासून दक्षता घ्या

  • तुम्हाला एखाद्या अनोळखी अकाऊंटवरून रिक्वेस्ट आली की त्या युपीआय अँपकडून स्पॅम संदर्भात सूचना दिली जाते.दरवेळी पेमेंट करताना काळजी घेणे आवश्यक आहे. 
  • तुम्ही जर Pay या पर्यायावर क्लिक केले तर फसवणूक करणाऱ्याच्या खात्यात पैसे पाठवले जातात. त्यामुळे तुम्ही आर्थिक नुकसानीला बळी पडू शकता. 

नक्की वाचा : आर्थिक व्यवहारांसाठी युपीआय वापरता? थांबा आधी हे वाचा. 

   

)बनावट अँप पासून सावध रहा-

  • अनेक वेबसाइटवरून फसवणुकीची दाट शक्यता असते. या बनावट वेबसाईटडाउनलोड करण्यासाठी सहज उपलब्ध होतात. 
  •  जर तुम्ही हे अँप डाउनलोड करून इन्स्टॉल केले तर तुमचा संवेदनशील डाटा फसवणूक करणाऱ्यांना सहज उपलब्ध होतो आणि तुमच्या खात्यातील पैसे चोरले जातात. 

४)सुरक्षित पद्धतींचे अनुसरण करा-

  • आपला युपीआय पिन गोपनीय ठेवावा, इतर व्यक्तीसमोर उघड करू नये.. 
  • तुम्ही बँकेसोबत केलेल्या व्यवहारांचा तपशील जपून ठेवा आणि त्याच बरोबर खात्यावरील संशयास्पद कृत्यांवर लक्ष असुद्यावे.  जर काही संशयास्पद कृत्य आढळली तर लगेच बँकेशी संपर्क साधावा.  

५. खालील सूचनांचे पालन करा 

  • तुमच्या मोबाईल मध्ये अँटीव्हायरस आणि बायोमेट्रिक पासवर्डचा उपयोग करा. 
  • अनोळखी ठिकाणावरून आलेले मेल उघडू नका. 
  • तुमच्या बँकेचे वेळोवेळी तपशील अपडेट करा. 
  • सुरक्षित वायफायचा उपयोग करा. 
  • तुमच्या बँकेचे स्टेटमेंट, व्यवहाराची माहिती जतन करून ठेवा. 

नक्की वाचा : सायबर सुरक्षेसाठी महत्वाच्या टिप्स 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…