युपीआय फसवणुकीचे प्रकार
https://bit.ly/2X9arWn
Reading Time: 3 minutes

UPI : आर्थिक व्यवहारांसाठी युपीआय वापरताय? 

युपीआय माध्यमातून आर्थिक व्यवहार करणे कितीही सुरक्षित असले तरी याबाबत फसवणुकीचे अनेक प्रकार रोज खूप मोठया प्रमाणावर समोर येत आहेत. यावर एकच पर्याय आहे ते म्हणजे आपण व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे. जून २०२० मध्ये एकूण ‘युपीआय’ (UPI) या माध्यमातून १.३४ बिलियन एवढे व्यवहार केले गेले आहेत. या एकूण व्यवहारांचे मूल्य आहे २.६१ ट्रिलियन म्हणजे २,६१,८३५ कोटी रुपये! 

प्रत्येक कार्यपद्धतीमधून खोट काढणारे, त्याचा विविध प्रकारे दुरुपयोग करणारे असतातच तसे यातही आहेत, पण आपण थोडी सावधानता बाळगली, तर मात्र आपण अगदी सुरक्षितपणे व्यवहार करूच शकतो. आजच्या लेखामधून आपण कोणत्या कोणत्या प्रकारे आपली फसवणूक होऊ शकते आणि त्याबाबतीत कशी दक्षता घ्यायची याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का?

युपीआय माध्यमातून होणारे फसवणुकीचे प्रकार कसे ओळखाल ? 

१. पैशांच्या देवाण-घेवाणीचा येणाऱ्या सूचनांबाबत जागरूक रहा: 

 • युपीआय (UPI) च्या माध्यमातून व्यवहार करताना ‘request money’ म्हणजेच ‘पैशांची मागणी’ करण्याचा एक पर्याय उपलब्ध असतो अनेकदा त्याचाच गैरवापर या फसवणूक करणाऱ्या व्यक्तींकडून करण्यात येतो. 
 • तुम्हाला एखादा व्यवहार करायचा असल्यास फसवेगिरी करणारी व्यक्ती तुम्हाला त्यांच्या बोलण्यात गुंतवतात आणि ‘युपीआय’च्या माध्यमातून तुम्हाला पैसे किंवा ॲडव्हान्स रक्कम पाठविण्यास सांगून  ‘request money’ च्या मध्यातून पैसे देण्याऐवजी पैसे ‘घेण्या’साठीची रिक्वेस्ट पाठवून ती स्वीकारायला सांगतात.
 • तुमच्या हे लक्षात नाही आलं आणि तुम्ही ती रिक्वेस्ट स्वीकारली तर तुमच्या खात्यातून ते पैसे वजा होऊन त्यांच्या खात्यात जातात. पण तुम्ही सावधानता बाळगून जर ती रिक्वेस्ट ‘रिजेक्ट’ केली करणे आवश्यक आहे. 

२. स्पॅम

 • गुगल पे वरून आर्थिक व्यवहार करताना फसवेगिरी केलेल्या एखाद्या क्रमांकाला कोणी जर ‘स्पॅम’ म्हणून तक्रार केली असेल, तर त्या क्रमांकासोबत व्यवहार करताना तसा सावधानीचा इशारा गुगल पे कडून दिला जातो.
 • असा इशारा मिळाल्यास त्वरित तो व्यवहार जागीच थांबवावा आणि पुनर्तपासणीशिवाय व्यवहार पुढे नेऊ नये.

सायबर सुरक्षेसाठी काही महत्वाच्या टिप्स

३. असुरक्षित प्लिकेशन्स:

 • अनेकदा अशी फसवणूक करणाऱ्या व्यक्तीकडून anydesk, teamviewer यासारख्या प्लिकेशन्स द्वारे स्क्रिन शेअर करायला सांगून विविध प्लिकेशन्स डाऊनलोड करायला सांगितले जाते.    
 • यामुळे आपल्या स्क्रीनवरील सर्व माहिती त्या व्यक्तीला दिसू लागते आणि त्यांना आपल्या स्क्रिनचा ताबा मिळतो ज्याद्वारे ते आपली  गोपनीय माहिती मिळवू शकतात व त्याचा दुरुपयोग करू शकतात.
 • अशा प्रकारची चोरी करण्याचा प्रयत्न एका अनुज मेहता नावाचे पुण्यातील व्यवस्थापन विषयाचे प्राध्यापक यांच्यासोबत झाला होता. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मोबाईलमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि कंपनीचा टेक्निशियन आहे असे सांगून एका फसवणूकदाराने त्यांना  ‘TeamViewer‘ हे स्क्रिन-शेअरिंग अँप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. ज्यामुळे त्यांची समस्या त्वरित दूर करता येऊ शकेल.
 • यामुळे प्रो. अनुज यांच्या स्क्रिनचा ताबा त्या व्यक्तीला मिळाला नंतर त्याने डेबिट कार्ड फोनच्या कॅमेरा समोर धरायला सांगितले ज्यामुळे तो डेबिट कार्ड नम्बर,सीव्हीव्ही वगैरे नोंदवून घेऊ शकेल, प्रो मेहता यांना इथे शंका वाटली आणि त्यांनी असे करण्यास साफ नकार दिला आणि स्क्रिन शेअर करण्यासाठी दिलेली परवानगी त्वरित नाकारली.
 • त्यांच्या या सावधानतेमुळे त्यांचे नुकसान होण्यापासून ते बचावले. अशाच प्रकारे आपण आपले बँक डिटेल्स, कार्ड डिटेल्स, युपीआय पिन,ओटीपी याबद्दल कोणालाही कसलीही माहिती न दिल्यास आपण अशा फसवणुकीपासून नक्कीच वाचू शकतो.

सावधान !भारतातील सर्वात मोठी ‘सायबर क्राईम’ घटना

४. फसवे मार्केटिंग कॉल्स, मेसेजेस, इ-मेल्स: 

 • बँकेचे प्रतिनिधी आहोत आणि व्हेरिफिकेशनसाठी कॉल केलेला आहे असे सांगून मार्केटिंग कॉल्स अनेकदा आपल्याला येत असतात आणि आपल्याला आपला कार्ड नंबर व पिन, सीव्हीव्ही, युपीआय आयडी, ओटीपी अशी माहिती विचारली जाते.
 • आपण अनावधानाने ही माहिती पुरवली, तर आपल्या बँक खात्यातले पैसे चोरीला जाऊच शकतात.
 • वरील प्रकारची कोणतीही माहिती कोणतीही बँक कधीही त्यांच्या ग्राहकांना विचारात नाही. त्यामुळे अशी कोणतीही विचारणा झाली तर हा फसवा कॉल आहे याबद्दल खात्री बाळगा आणि तुमची कोणतीही माहिती देऊ नका. 

५. बनावट ॲप्लिकेशन्स :

 • गुगल प्ले स्टोअरवर Modi Bhim, Bhim Modi App, BHIM Payment-UPI Guide, BHIM Banking guide, Modi ka Bhim,अशी काही बनावट प्लिकेशन्स होती ज्यामधून व्यवहार केल्यास तुमच्या पैशांची चोरीहोत असे.
 • या प्लिकेशन्सबद्दल तक्रार केल्यावर ते गुगल प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आले.
 • असे बनावट प्लिकेशन्स ओळखण्यासाठी ते तयार केलेल्या कंपनीचे नाव, त्यांची वेबसाईट, ईमेल आयडी अशी सर्व माहिती घेऊन आणि त्याची सत्यता तपासून मगच आपल्या फोनवर डाउनलोड करावेत.  

सावधान !! ऑनलाईन फ्रॉड कॉल

६. सोशल मीडियावरील बनावट हेल्पलाईन नंबर्स 

 • आपल्या बँक खात्यासंदर्भात काही माहिती अथवा तक्रार असल्यास त्यासाठी आपण सोशल मीडियावर हेल्पलाईन क्रमांक शोधतो आणि त्यांना कॉल करतो.
 • अनेकदा ही बनावट कॉल सेंटर्स असतात  त्यामुळे सोशल मीडियावर हेल्पलाईन क्रमांक शोधण्याऐवजी तुमच्या जवळील बँक शाखेमध्ये संपर्क साधून अथवा बँकेच्या वेबसाईटवरून सदर क्रमांक मिळवावेत.
 • या व्यतिरिक्त तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर, सर्व प्लिकेशन्स अपडेटेड असावीत.  तुमच्या फोनचा लॉक पॅटर्न, पिन हा सहज समजण्यासारखा ठेवू नये. 
 • फोन हरवल्यास त्वरित बँकेला कळवून तुमचे अकाउंट तात्पुरते बंद करण्यास सांगावे. 

सावधान : सिम स्वॅप फ्रॉड

बहुतांश वेळा युपीआय माध्यमातून होणारे फसवणुकीचे प्रकार हे बेजबाबदारपणे वागल्यामुळे होतात. योग्य काळजी घेतल्यास कोणीही याला बळी पडणार नाही. युपीआय माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांच्या संपूर्ण सुरक्षेची काळजी NCPI ने या कार्यपध्दतीची रचना करतानाच घेतलेली आहे. आता गरज आहे ती आपण थोडी सावधानता बाळगून योग्य  ती काळजी घेण्याची.

ऑनलाईन व्यवहार करणे देशाच्या हिताच्या आणि प्रगतीच्या दृष्टीने फार गरजेचे आहे, अशावेळी आपण जबाबदारीने  या सुविधेचा वापर केला, तर  सुरक्षित आणि कायदेशीर आर्थिक व्यवहार सहज शक्य होतील. 

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Are UPI transactions safe? Marathi Mahiti, UPI Transactions in Marathi, UPI Fraud Marathi Mahiti

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मोबाईल चोरीला गेलाय? बँकेबाबत ऑनलाईन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे पालन

Reading Time: 3 minutes गर्दीत असताना फोन चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. फोन चोरीला गेल्यानंतर वैयक्तिक…

ऑनलाईन व्यवहार करताना भीती वाटते? या टीप्स नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes मागच्या दोन वर्षात म्हणजे कोविड दरम्यान झपाट्याने काही बदललं असेल तर ते…

मोटार अपघाताची नुकसान भरपाई?? व्हॉट्सॅप मेसेजने केलेली दिशाभूल..

Reading Time: 2 minutes काही दिवसांपूर्वी व्हॉट्स ॲपवर एक मेसेज आला होता; पोळी का करपते? दूध…