kailash katkar story
worldrepublic.news
Reading Time: 3 minutes

Success Story of Quick Heal

फक्त रु. 400 पगार ते 700 कोटी रुपयांच्या कंपनीचा सीईओ 

क्विक हीलचे संस्थापक कैलास काटकर यांची यशोगाथा (Quick Heal Success Story)  !

 • आज संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन बहुतेक लोकांसाठी एक सामान्य तंत्रज्ञान बनले आहे. परंतु तंत्रज्ञानालाही कधीतरी मर्यादा येऊ शकतात. एखाद्या  व्हायरसमुळे संगणक किंवा स्मार्टफोन निरुपयोगी झाल्याचे तुम्ही ऐकले असेलच. या उपकरणांचे व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्स उपलब्ध असतात. 
 • आता अँटीव्हायरस सॉफ्टवेअरबद्दल आपण बोलतोय आणि Quick Heal हे नाव डोळ्यांसमोर आलं नाही असं होऊच शकत नाही. पण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना या कंपनीमागील व्यक्ती आणि त्यांच्या प्रेरणादायी कथेबद्दल माहिती नसेल. 
 • चला तर आज 755 कोटी रुपयांच्या कंपनीचे संस्थापक असलेले, 55 वर्षीय कैलास काटकर यांचा एक सामान्य कॅल्क्युलेटर रिपेअरमन ते Quick Heal कंपनीचे CEO हा रंजक प्रवास (Quick Heal Success Story)  आपण जाणून घेऊया. 

हेही वाचा – Success Story Of Lens cart : ‘वाचा’ लेन्सकार्टची यशोगाथा !…

बालपण, शिक्षण आणि व्यवसायाची पायाभरणी

 • कैलास काटकर यांचा जन्म 1966 मध्ये महाराष्ट्रातील रहमितापूर या छोट्याशा गावात एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील फिलिप्स इंडियामध्ये मशीन सेटर म्हणून काम करत होते. त्यांची आई गृहिणी होती. 
 • आपल्या मुलाने अभियंता व्हावे असे त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते. पुढे त्यांचे कुटुंब पुण्यात आले. कैलास काटकर यांना आशा आणि संजय ही दोन भावंडे आहेत. कैलास हे एक सामान्य विद्यार्थी होते जे कधीही अभ्यासात गुंतले नाहीत. 
 • चिल्ड्रन्स अकादमी हायस्कूलमध्ये नववीत नापास झाल्यानंतर कैलास यांनी अभ्यास सोडला त्यामुळे त्यांच्याकडे कोणतीही व्यावसायिक पदवी नाही. आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांनी स्थानिक रेडिओ आणि कॅल्क्युलेटर दुरुस्तीच्या दुकानात 400 रुपये मासिक पगारावर कॅल्क्युलेटर तंत्रज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली. 
 • पुढे 1990 मध्ये त्यांनी त्यांच्या 15,000 रुपयेच्या बचतीतून स्वतःचे रेडिओ आणि कॅल्क्युलेटर दुरूस्तीचे दुकान सुरू केले. सुरुवातीला ते लेसर पोस्टिंग मशीन, कॉम्प्युटर आणि इतर अनेक मशीन्स दुरुस्त करायचे नंतर हळूहळू संगणक देखभालीचे काम करू लागले. 

 

उद्योजकीय प्रवास

 • कैलास स्वतः जास्त शिकले नाही तरी त्यांनी आपल्या भावाला संगणकाचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन दिले. संगणक हा येत्या काळाची मुख्य गरज आहे हे कैलास यांनी ओळखले होते. 
 • त्यांच्या दुरुस्तीच्या दुकानासोबतच, कैलास यांनी 1993 मध्ये CAT कॉम्प्युटर सर्व्हिसेस कंपनीची स्थापना केली, ज्यात संगणकांची दुरुस्ती आणि देखभाल केली जायची. 
 • येथे कैलास यांना समजले की त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी येणारे बहुतेक संगणक व्हायरसने संक्रमित आहेत. त्यांनी संजय यांना अँटीव्हायरस क्षेत्रात लक्ष केंद्रित करायला सांगितले. नंतर, त्यांच्या भावाने – संजयने कॉम्प्युटर सायन्समध्ये (BCS) पदवी पूर्ण केली. 
 • शिक्षण घेत असताना संजय त्यांच्या संगणक दुरुस्तीच्या दुकानात प्रोग्रामिंग भाषेचा सराव करण्यासाठी येत असत. कैलास काटकर यांनी संजयला हार्ड डिस्क फॉरमॅट न करता व्हायरस काढण्यासाठी उपाय शोधण्याची सूचना केली. 
 • त्यावेळी उच्च किंमतीमुळे, लोकांना अँटीव्हायरस सॉफ्टवेअर खरेदी करणे आवडत नव्हते. कारण अँटीव्हायरस सॉफ्टवेअर रु.10,000 ते रु.12,000 पर्यंत विकले जात होते. 
 • त्यामुळे लोक अँटीव्हायरस सॉफ्टवेअर खरेदी  करण्यापेक्षा त्यांचे मशीन संगणक तंत्रज्ञांकडे दुरुस्तीला देण्यास  प्राधान्य देत. त्या वेळी, व्हायरस लागला तर बहुतेक संगणक तंत्रज्ञ किंवा हार्डवेअर अभियंते हार्ड ड्राइव्ह फॉरमॅट करायचे आणि DOS पुन्हा इन्स्टॉल करायचे. अनुभवातून शिकत असतानाच संजय त्यांच्या स्वतःच्या CAT कॉम्प्युटर सर्व्हिसेससाठी इतर हानिकारक व्हायरस काढून टाकण्यासाठी नवीन अँटीव्हायरस टूल्स विकसित करत राहिले. हेच त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील पहिले पाऊल होते.  
 • कैलास घरोघरी आणि कार्यालयात जाऊन कॉम्प्युटरमधील व्हायरस शोधायचे आणि तो मॅन्युअली दुरुस्त करायचे. त्यांच्या लक्षात आले की सर्व घरे आणि ऑफिसला भेट देणे येत्या काही वर्षांत कंटाळवाणे होणार आहे. यावर उपाय म्हणून ग्राहकांनी त्यांना अँटीव्हायरस सॉफ्टवेअर तयार करण्याचा सल्ला दिला. आणि त्यातूनच दोन्ही बंधूंनी 1995 मध्ये DOS साठी Quickheal Antivirus हे त्यांचे पहिले उत्पादन लाँच केले.
 • त्यात पुढे काही बदल करून Quick Heal ने 1996 मध्ये Windows 95 अँटीव्हायरस सॉफ्टवेअर अवघ्या 700 रु. किमतीत उपलब्ध करून दिले जे भारतीय बाजारपेठेद्वारे चांगले स्वीकारले गेले आणि ते त्यांच्या  प्रतिस्पर्ध्यांमध्ये सर्वात स्वस्त असे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर होते. 
 • या कामात कैलास मार्केटिंग बघायचे आणि संजय अँटीव्हायरस डेव्हलपमेंटची धुरा सांभाळायचे. बघता बघता Quick Heal  लोकप्रिय होऊ लागला. 
 • 2006 मध्ये कंपनीने मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनशी करार केला. 2007 पासून, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने क्विक हील अँटी-व्हायरस Genuine Windows XP सह विकण्यास सुरुवात केली. पुढे 2010 मध्ये, Quick Heal ला Sequoia Capital या अमेरिकन खाजगी इक्विटी फर्म कडून गुंतवणूक मिळाली. हे दोन कंपनीच्या यशातील मानाचे तुरे होते. 
 • आज कैलास काटकर हे एमडी आणि सीईओ तर संजय काटकर हे Quick Heal Technologies चे सीटीओ म्हणून कार्यरत आहेत. Quick Heal Technologies चे 112+ देशांमध्ये २ कोटींपेक्षा अधिक ग्राहक आणि 15000 हून अधिक कर्मचारी आहेत. 
 • Quick Heal Technologies मध्य पूर्व, यूएसए, जपान आणि इतर अनेक देशांना अँटी-व्हायरस सेवा प्रदान करत आहे. तसेच कंपनी रिटेल आणि एंटरप्राइझ या दोन्ही विभागांना उत्पादने पुरवते. त्यांच्या या यशस्वी वाटचालीमुळे Quick Heal चा आयपीओ 2016 साली आला आणि त्यानंतर तो शेअर बाजारात लिस्ट झाला.

हेही वाचा – BYJU’S Success Story: ‘बायजू रविंद्रन’ यांची प्रेरणादायी यशोगाथा !…

अशी कैलास काटकर यांची ही यशोगाथा सर्व उद्योजकांसाठी आणि आणि नव्याने उदयास येऊ पाहणाऱ्या स्टार्ट-अप्ससाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

UPI : युपीआय म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसची (UPI) निर्मिती…

गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक सल्लागाराची निवड कशी करावी?

Reading Time: 3 minutes तुम्हाला गुंतवणूक करायची आहे आणि समजा एखाद्या व्यक्तीने ती पद्धतशीरपणे करून दिली…

शेअर बाजारात ६ गोष्टींपासून कायम राहा लांब !

Reading Time: 2 minutes कोरोनाच्या कालावधीत अनेक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून काढता पाय घेतला. पण काही गुंतवणूकदारांनी…