Reading Time: 3 minutes

उन्हाळ्यात दुपारच्या वेळेला रसना हमखास पिला जातो. शुभ कार्यातही पाहुण्यांचे रसना देऊनच स्वागत केले जाते. 

अशा या रसना ब्रँडचे संस्थापक अरीज खंबाटा यांचे अहमदाबाद येथे निधन झाले. अनेक दशकांपूर्वी अरीज यांचे वडील फिरोजा यांनी व्यवसायाला सुरुवात केली होती. Rasana in Marathi 

वडिलांच्या उद्योगाला पुढे वाढवण्याचे काम अरीज यांनी केले. त्यांनी ६० पेक्षा जास्त देशांमध्ये व्यवसायाचा विस्तार केला. १९७० च्या दशकात रसना बाजारात आले.  त्यावेळेला सॉफ्ट ड्रिंक महागड्या किमतीत विकले जात होते. रसनाची देशभरातील १८ लाख आउटलेटमधून विक्री केली जाते. 

रसना ब्रॅण्डची सुरुवात – Rasna Brand Start 

 • थम्स अप आणि लिम्का या कोल्ड्रिंक्सच्या काळात रसना हा ब्रँड ग्राहकांच्या पसंतीस पडला. ७० ते ९० च्या दशकात रसना हे पेय घराघरात जाऊन पोहोचले. 
 • अरीज खंबाटा हे १९६२ मध्ये घरच्या उद्योगात सामील झाले. अरीज हे दुसऱ्या पिढीतले  उद्योजक होते. 
 • १९४० मध्ये रसना कंपनीची सुरुवात झाली. सुरुवातीला रसनाने बिझनेस टू बिझनेस आणि छोट्या स्वरूपात उद्योगाला सुरुवात केली. 
 • त्यानंतर ग्राहकांपर्यंत ब्रँड पोहचायला सुरुवात झाली. सुरुवातीला ‘जाफे’ नावाने गुजरात राज्यापुरती विक्रीला सुरुवात झाली. 

 

रसना ब्रॅण्डची वाढ – Growth of Rasna brand 

 • अरीज खंबाटा यांनी उद्योगाला सुरुवात केल्यानंतर बिझनेस टू बिझनेस आणि बिझनेस टू कस्टमर या दोन्ही प्रकारावर लक्ष द्यायला सुरुवात केली. 
 • रसनाची जाहिरात घरा घरात जाऊन पोहचली होती. ५ रुपयाच्या पॅकमध्ये ३२ रसनाचे ग्लास बनतील अशा आशयाची जाहिरात बनवण्यात आली होती. 
 • सरळ हिशोब केला तर १५ पैशाला एका ग्लासची किंमत पडते. रसना ही भारताची त्या काळातली यशस्वी स्टार्टअप होती.
 • ८० च्या दशकामध्ये रसनाने नॉन एरेटेड ड्रिंक्समध्ये ५० टक्के बाजार हिस्सा मिळवला होता. 
 • दक्षिण आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये रसना मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला. 
 • १९८२ साली ₹ १३ कोटी असणारे सॉफ्ट ड्रिंकचे मार्केट २०१५ साली ₹ १४,००० कोटींपर्यंत जाऊन पोहचले आहे. यामधील रसनाचा वाटा २.४ टक्के आहे. 
 • अरीज खंबाटा यांनी हजारो नोकऱ्या उभ्या केल्या. फळांवर आधारित असणाऱ्या रसनाच्या फ्लेवर्समुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळाली.

 

नक्की वाचा : राकेश झुनझुनवाला : शेअर बाजारातील ध्रुवतारा 

 

रसना ब्रँड पोहचला घराघरात – 

 • अरीज  खंबाटा यांचा मुलगा पिरुज हा व्यवसायात आला. १८ व्या वर्षी उद्योगात आल्यानंतर त्याने ग्रामीण भागातील बाजारावर जास्त लक्ष दिले. 
 • त्याने रसना ब्रँडचे २ रुपयाचे पॅकेट आणले आणि त्या पॅकेटमधून ६ ग्लास रसनाचे बनतील अशी जाहिरात केली. 
 • पिरुज हे रसना उद्योगात आल्यानंतर त्यांनी वेग वेगळ्या प्रकारचे फ्लेवर्सचे रसना पण बाजारात आणले.

 

यशस्वी जाहिरातीचे घटक – 

 • ‘आय लव्ह यु रसना’ जाहिरात मुले आणि त्यांच्या पालकांना गृहीत धरून करण्यात आली होती. 
 • जाहिरातीमधून ब्रॅण्डची ओळख तयार होत गेली. त्यानंतर ब्रॅण्डने वेगवेगळे फ्लेवर्स बाजारात आणून त्याच्या विक्रीला सुरुवात केली. 
 • या पॅकमध्ये केसर, इलायची आणि जलजिराचा या पॅकमध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर २००० साली कंपनीने लिची, वॉटरमेलन आणि पायनॅपल असे विविध फ्लेवर्स बाजारात आणले. 
 • रसना बनवल्यानंतर ग्राहक त्यांच्या पसंतीने साखर टाकायचे, बाकी फ्लेवर्ड कोल्ड्रिंक पेक्षा रसनाने ६० टक्के पैसे वाचवले. 

 

आय लव्ह यु रसना जाहिरात – https://www.youtube.com/watch?v=tj4s54Ken-4

 

खरा त्रास – 

 • रसनाला खरा त्रास तेव्हा सुरु झाला जेव्हा कमी किमतीत कार्बोनेटेड ड्रिंक्स बाजारात आले होते. छोट्या बॉटल्स आणि पॅकेट खरेदी करणे लोकांना परवडत होते. 
 • पेप्सी आणि कोका कोला यांच्याकडे जाहिरात करण्यासाठी जास्त पैसे होते, त्यामुळे त्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली. 
 • त्यामुळे रसना या ब्रॅण्डच्या मागे पडायला लागला. रसनाचे प्रतिस्पर्धी कोका कोला सनफिल आणि कॅडबरी टॅग हे आहेत.

 

नक्की वाचा : असे बनले बफेट यशस्वी गुंतवणूकदार 

 

अरीज खंबाटा यांचे योगदान –

 •  खंबाटा यांचे भारतीय व्यवसायासाठी मोठे योगदान  आहे. त्यांनी २० वर्ष अहमदाबाद होमगार्ड्स आणि सिव्हिल डिफेंड्सचे कमांडंट म्हणूनही काम पहिले. 
 • उद्योग व्यवसाय आणि सामाजिक कामांमध्ये त्यांचे योगदान मोठे होते.
 • खंबाटा यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना भारताचे राष्ट्रपती होमगार्ड आणि नागरी संरक्षण पदक, तसेच फाईव्ह स्टार समरसेवा आणि संग्राम पदकांची संमनीत करण्यात आले आहे.
 • भारताचे तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते वाणिज्य क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल राष्ट्रीय नागरिक पुरस्काराने खंबाटका यांना सन्मानित करण्यात आले आहे. 
 • गुजरातचे सर्वोच्च करदाते म्हणूनही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. राष्ट्रीय तिजोरीत योगदान दिल्याबद्दल वित्त मंत्रालयाने त्यांना सन्मान पत्र दिले आहे. 

 

घराघरात रसनाच्या चवीने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू पसरवणाऱ्या अरीज खंबाटा यांना अर्थसाक्षर परिवारातर्फे मनःपूर्वक आदरांजली. 

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *