Reading Time: 2 minutes

अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे प्रयोग आपल्या सर्वांना माहित आहेत. बफेट यांनी सांगितलेले नियम समजावून घेऊन सामान्य माणूसही चांगले पैसे कमवू शकतो.

 

चला तर मग पाहूया वॉरेन बफेट यांचे काही सोपे आणि महत्वाचे धडे !

 

१. गुंतवणूकीची सुरुवात लवकर करा  –

  • गुंतवणूकीची सुरुवात जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुमची बचतीला सुरुवात होते.
  • शिस्तबद्ध पणे केलेले कुठलेही काम त्याचे चांगले फळ नक्कीच देते. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीपासूनच गुंतवणूक करणे गरजेचे असते.

 

करिअरच्या सुरुवातीलाच गुंतवणुकीला सुरुवात करावी.

 

२. गुंतवणूकीची जोखीम लक्षात घ्या, पैसे वाया घालवू नका –

  • गुंतवणूक म्हटले की जोखीम आलीच पण नफा मिळवण्याच्या नादात, आहे तो पैसा गमवावा लागू नये यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे असते.
  • नफ्यामधील पैसे वाया जाऊ नये यासाठी योग्य निर्णय घेता यायला हवा.

 

गुंतवणुकीतील धोका ओळखून शेअरची खरेदी करावी.

 

 

३. कधीही गर्दीच्या मागे धावू नका –

  • एखाद्या कंपनीचा शेअर चांगला आहे असा मित्राने सल्ला दिला किंवा सगळे म्हणतायेत म्हणून त्याची खरेदी करू नका.
  • असे न करता एखादी कंपनी गेल्या ४ ते ५ वर्षात किती नफा कमावते आहे, संचालक मंडळाचा कंपनीत किती टक्के हिस्सा आहे आणि कंपनीवर किती कर्ज आहे अशा इतरही महत्वाच्या बाबी माहित असणे गरजेचे असते.

 

कोणी सल्ला दिला म्हणून गुंतवणूक करू नका.

 

४. गुंतवणूक करताना कायम दीर्घ काळासाठीच करावी –

  • मोठ्या कालावधी साठी केलेली गुंतवणूक ही छोठ्या कालावधी साठी केलेल्या गुंतवणूकीच्या तुलनेत जास्त परतावा देते.
  • त्यासाठी तुम्ही निवडलेले शेअर चांगल्या कंपनीचे असणे गरजेचे असते. शेअर बाजाराचा अभ्यास आणि तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्यानेच गुंतवणूक करावी.

 

शेअर बाजारातील गुंतवणूक दीर्घ काळासाठी करावी, तरच चांगला परतावा मिळतो.

 

५. शेअर बाजार खाली येत असताना कधीही घाबरू नका –

  • शेअर बाजाराची किंमत खाली आलेली असताना गुंतवणूकदारांसाठी हीच गुंतवणुकीची मोठी संधी असते.
  • आधी शेअरची किंमत जास्त असल्यामुळे शेअर विकत घेता येत नसतील तर किंमत कमी होताना न घाबरता, ह्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यायला हवा.

 

शेअर बाजाराची किंमत खाली येताना घाबरू नका, त्याच वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.

 

६.   शेअर मध्ये विविधता ठेवा –

  • शेअर मध्ये गुंतवणूक करत असताना सर्व पैसे एकाच प्रकारात गुंतवू नयेत. शेअर खरेदीत  विविधता असणे गरजेचे असते.
  • वेग वेगळ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करावेत, जेणेकरून तुमची गुंतवणूकीची जोखीम कमी कमी होत जाईल.

 

शेअर बाजारात गुंतवणूक करताना शेअर खरेदीत विविधता ठेवा.

 

नक्की वाचा : गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक सल्लागाराची निवड कशी करावी?

 

७.  पुस्तकांचे वाचन करत राहा –

  •  गुंतवणूकी संदर्भात नव-नविन गोष्टी वाचत रहा, जेणेकरून तुम्हाला नविन कौशल्य शिकायला मिळतील.
  • नवीन गुंतवणुकीच्या संदर्भातील निर्णय घेणे वाचनामुळे सोयीस्कर होते.

 

वाचन केल्याने गुंतवणुकीतील माहितीत भर पडत राहते.

 

८. योग्य वेळेची वाट पहा –

  • शेअर बाजार खाली आल्यावर शेअरची खरेदी करावी आणि शेअर बाजार वाढत गेल्यावर शेअरची विक्री करावी हा सोपा नियम कायम लक्षात ठेवा.
  • लोक शेअर बाजार खाली आल्यावर शेअरची विक्री करतात, खरी तर हीच वेळ खरेदीची असते.
  • योग्य वेळेची वाट पाहून शेअरची विक्री करायला हवी.

 

योग्य वेळी शेअरमध्ये गुंतवणूक करा आणि चांगला परतावा मिळवा.

 

९. रोख रकमेची बचत करायला हवी –

  • गुंतवणूक करताना थोडे पैसे बाजूला काढून ठेवणे कधीही फायद्याचे ठरते. त्या पैशांचा उपयोग शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी किंवा आपत्कालीन निधी म्हणूनही करता येतो.
  • जेणेकरून तुम्हाला तुमची मालमत्ता अडचणीच्या वेळेला विकावी लागत नाही.

 

आपत्कालीन वेळी गरजेसाठी रोख रकमेची बचत करून ठेवा.

 

नक्की वाचा : प्रत्येक गुंतवणूकदाराला जोखमीबद्दल काय माहित असायला हवे?

 

१०. गुंतवणुकीचे एकापेक्षा जास्त माध्यम तयार करा –

  • एक गुंतवणूक पर्यायापेक्षा अनेक मार्गांमधून पैसे मिळत राहतील अशी गुंतवणूक करायला हवी.
  • चुकून एका गुंतवणूक पर्यायातून नुकसान झाले तरी दुसऱ्या ठिकाणावरून पैसे मिळत राहतात.

 

कधीही एका उत्पन्नाच्या मार्गावर अवलंबून राहू नका, त्याची गुंतवणूक करा आणि दुसरे उत्पन्नाचे मार्ग तयार करा.

 

निष्कर्ष :

  • वॉरेन बफेट यांनी सांगितलेले गुंतवणुकीचे नियम महत्वाचे आहेत. त्यांना समजून घेऊन योग्य प्रकारे गुंतवणुकीला सुरुवात करावी.
  • करिअरच्या सुरुवातीला गुंतवणुकीस सुरुवात केल्यावर अडचणीच्या वेळेला पैशांची चिंता भासत नाही.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…