Reading Time: 3 minutes

आजकाल युपीआयच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्यवहार केले जातात. युपीआयच्या वापरामुळे पैसे देणे घेण्याच्या पद्धतीत मोठे बदल झाले आहेत. भारतात दररोज जवळपास २० ते २२ कोटी व्यवहार युपीआयच्या माध्यमातून केले जातात. 

युपीआयच्या व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पद्धतीमध्ये काळानुरूप बदल करणे गरजेचे असते. ग्लोबल फिनटेक महोत्सवात युपीआयच्या माध्यमातून पाच नवीन सुविधा देण्यात येतील असे सांगण्यात आले होते. त्या पाच सुविधा कोणत्या आहेत आणि त्यांचा वापर कसा केला जातो हे समजावून घ्यायला हवे. 

१. युपीआय ऑटो पे – 

  • युपीआय ऑटो पे या पद्धतीचा वापर करण्यासाठी सर्वात आधी बिल रजिस्टर करावे लागते. 
  • त्यानंतर जेव्हा बिल द्यायची वेळ येते तेव्हा बँक खात्यातून बिलाची रक्कम काढून संबंधित कंपनीला स्वयंचलित पद्धतीनेच  देयक दिले जाते. 
  • युपीआय ऑटो पे या पद्धतीचा वापर कर्जाचे हप्ते, वीजबिलाचा भरणा, मोबाईल बिल किंवा अन्य नियमित भराव्या लागणाऱ्या देयकांसाठी केला जातो. 
  • हा व्यवहार वेळेत पूर्ण होतो आणि दरवेळी कराव्या लागणाऱ्या ओटीपीची गरजही लागत नाही. 
  • यामध्ये बिल स्वयंचलित पद्धतीने भरण्यासाठी खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक असणे आवश्यक असते. 
  • आधी ही सुविधा उपलब्ध होती. पण त्या वेळी ५००० रुपयांपर्यंतचेच देयक देता होते, आता तीच मर्यादा १५,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 

२. युपीआय – १२३ – 

  • सध्या स्मार्टफोन असणाऱ्यांनाच फक्त युपीआयचा वापर करता येतो. 
  • स्मार्टफोन नसणाऱ्यांना युपीआयच्या माध्यमातून व्यवहार करायचे असतील तर त्यांच्यासाठी युपीआय १२३ पद्धत आणण्यात आली आहे. 
  • स्मार्टफोन नसणारी लोक युपीआय १२३ च्या मदतीने व्यवहार करू शकतील. 
  • युपीआय १२३ माध्यमातून व्यवहार करायचे असतील तर संबंधित व्यक्तीचा मोबाईल नंबर बँक खात्याला जोडलेला असणे आवश्यक असते. 
  • रजिस्टर असलेल्या मोबाईल क्रमांकावरून आयव्हीआर क्रमांकावर फोन करावा लागतो. 
  • त्यानंतर जे खाते युपीआय १२३ शी जोडायचे आहे त्या खात्याचा तपशील द्यावा लागतो. त्यानंतर एक युपीआय पिन तयार केला जातो. 
  • यासाठी आपल्याला डेबिट कार्डच्या नंबरचे शेवटचे ६ नंबर आणि एक्स्पायरी तारीख टाकून पुढील व्यवहार करता येतात. 
  • आता ज्याला पैसे पाठवायचे आहेतत्याचा मोबाईल क्रमांक टाकला की स्क्रीनवर त्याचे नाव दिसते. ग्राहकाच्या नावाची एकदा का खात्री पटली की संबंधित रक्कम आणि युपीआय पिन नंतर टाकावा. 
  • त्यानंतर लाभार्थीच्या खात्यावर पैसे पाठवले जातात. याबाबतचा एसएमएस दोघांनाही पाठवला जातो. 
  • युपीआय १२३ चा वापर करून आपण लाईट बिल आणि मोबाईल रिचार्ज करू शकता. 

नक्की वाचा : युपीआय म्हणजे काय? 

३. भारत बिल क्रॉस बॉर्डर पेमेंट सिस्टीम –

  • युपीआयचा वापर परदेशात राहणाऱ्या भारतीयांना करता येणार आहे. या सुविधेचा वापर करून परदेशात असणारी व्यक्ती भारतात राहणाऱ्या आई – वडील आणि अन्य नात्यातल्या लोकांना पैसे पाठवू शकणार आहे. 
  • वीज बिल, फोन बिल आणि अन्य बिल भरण्यासाठी परदेशातील व्यक्ती पैसे पाठवू शकणार आहे. तसेच घराचे हप्ते, विमा हप्ते आणि इतर रकमाही सहज भरता येऊ शकणार आहे. 
  • यासाठी परदेशातील असणाऱ्या व्यक्तींना ५ ते ६ टक्के खर्च येत असतो. पण या पद्धतीच्या वापरातून १ ते २ टक्के एवढाच खर्च येणार आहे. 
  • या पद्धतीमुळे परदेशात राहणाऱ्या  भारतीयांच्या पैसे वाचतील आणि सहज पद्धतीने ते भारतात तिकडून पैसे पाठवू शकणार आहेत. 

४. रूपे क्रेडिट कार्डला जोडले जाणार युपीआयची संलग्नता –

  • सध्या असणाऱ्या युपीआयला बँक खाते जोडलेले असते. अशावेळेस युपीआय खात्यावरून व्यवहार केल्यास बँक खात्यातून पैसे डेबिट केले जातात. 
  • त्यामुळे ग्राहकांना क्रेडिट कार्ड असून पण त्याचा वापर करता येत नाही. तसेच क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट स्वीकारण्यासाठी विक्रेत्यांकडे सुविधा उपलब्ध नसते. 
  • आता रूपे क्रेडिट कार्ड मोबाईलमधील युपीआयशी जोडता येणार आहे. युपीआय वरून पेमेंट केल्यावर बँक खात्यातून पैसे न जाता क्रेडिट कार्ड वरून भरणा केला जाईल. 
  • यामुळे जेव्हा क्रेडिट कार्डवर बिल येईल तेव्हा त्याची परतफेड केली जाते. सुरुवातीला फक्त रूपे क्रेडिट कार्डच्या मदतीनेच पेमेंट करता येणार आहे. 
  • लवकरच मास्टर आणि व्हिसा क्रेडिट कार्डधारकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. 

नक्की वाचा : युपीआयच्या लोकप्रिययतेचे परिणाम 

५. युपीआय लाईट – 

  • युपीआय लाईट सध्या फक्त भीम ॲपवर उपलब्ध आहे. 
  • कोटक बँक, एसबीआय, पीएनबी, युनिअन बँक, इंडियन बँक, एचडीएफसी बँक आणि कॅनरा बँक सुविधा देत आहेत. 
  • सदर सुविधा ही वॉलेट पद्धतीची आहे. या वॉलेटमध्ये जास्तीत जास्त २००० रुपये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केले जातात. 
  • या वॉलेटमधील रक्कम संपल्यावर परत ऑटो ट्रान्स्फर पद्धतीने त्यामध्ये २००० रुपये टाकता येतात. ऑनलाईन पद्धतीने २०० रुपयांपर्यंतचे पेमेंट ट्रान्स्फर करता येते. 
  • आपल्याला दररोज किरकोळ व्यवहार करावे लागतात. ते व्यवहार युपीआय लाईटचा वापर करून करता येऊ शकतो. 
  • याचा जरी बँक स्टेटमेंटमध्ये समावेश होत नसला तरी ग्राहकाला एसएमएस करून याबद्दलची माहिती दिली जाते. 

निष्कर्ष : 

  • युपीआयचा दररोजच्या जीवनात व्यवहार करत असताना चांगला उपयोग होतो. या नवीन पद्धतींच्या शोधामुळे युपीआयच्या वापरात सहजता येणार आहे. 
  • युपीआयचा वापर केल्यामुळे वेळ आणि पैशात पण बचत केली जाणार आहे.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…