Reading Time: 2 minutes

गुंतवणूक करत असताना जोखीम हा त्यामधील अविभाज्य घटक आहे. पैशांची गुंतवणूक करत असताना जोखीम कशी सांभाळायची याबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलेही असेल. 

गुंतवणुकीतील जोखीम आणि शेअर बाजारामधील अस्थिरता गुंतवणूकदाराने सर्वात प्रथम समजून घ्यायला हवी. गुंतवणूक करत असताना जोखीम अनेक प्रकारची असते, नव्यानेच गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवर्जून घ्यावा.

 

गुंतवणुकीतील धोक्याच्या पैलूंची ओळख 

१. बाजारातील अस्थिरता म्हणजे धोका नसतो 

 • शेअर बाजारात गुंतवणूक करत असताना जोखीम हा महत्वाचा घटक असतो. जोखीम असणे हा आर्थिक गुंतवणुकीमधील महत्वाचा घटक आहे. गुंतवणूकदाराकडून शेअर बाजारातील चढ उताराचा अभ्यास करून गुंतवणूक केली जाते.
 • शेअरबाजारात जोखीम घेऊनच गुंतवणूक केली जाते.
 • शेअर बाजारात तयार झालेल्या अस्थिरतेच्या काळात जोखमीनेच नवीन शेअर्सची खरेदी केली जाते.
 • जोखीम समजून न घेतल्यामुळे गुंतवणूकदाराला तोटा होऊ शकतो. शेअर बाजारातील अस्थिरतेच्या काळात धोका उद्भवत नाही. गुंतवणूक करत असताना भविष्यात त्यामधून किती परतावा मिळू शकतो याचा योग्य विचार करूनच ती करावी. 

 

नक्की वाचा : शेअर बाजार गुंतवणुकीमध्ये तांत्रिक विश्लेषणाचे महत्व 

 

 

२. शेअर बाजारातील जोखीम म्हणजे कायमचे पैसे गमावणे 

 • शेअर बाजारात गुंतवणूक करत असताना त्यामध्ये जोखीम असते. शेअर बाजारावर अनेक घटकांचा परिणाम होत असल्यामुळे बाजार सतत खाली वर होत असतात. 
 • शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे अनेक वेळा गुंतवणूकदाराला नुकसान होऊ शकते. शेअर बाजारात जोखीम घेऊन पैसे गुंतवले आणि शेअर बाजार खाली आला तर कायमचे पैसे गमावले जातात. 
 • बाजारामधील अस्थिरतेच्या काळात जोखीम घेणे धोक्याचे ठरते. गुंतवणूक केल्यानंतर शेअर  बाजारात चांगली परिस्थिती येईपर्यंत गुंतवणूकदार वाट पाहू शकतो पण शेअर्स विकले तर तोटा उदभवू शकतो. 

 

३. शेअर बाजारात जोखीम आवश्यक.  

 • शेअर बाजारात भविष्यातील गुंतवणूकीतून मिळणाऱ्या परताव्याचे अंदाज अपयशी ठरतात. गुंतवणूक करत असताना प्रत्येक कंपनीच्या शेअर्समधील जोखीम किती धोकादायक आहे हे फक्त एक गुंतवणूकदारच समजू शकतो. 
 • गुंतवणूकदार गुंतवणूक करत असताना भविष्यात घडणाऱ्या परिणामांचा विचार करत असतो. शेअर बाजारातील चांगले शेअर निवडून जोखीम कमी करण्यावर गुंतवणूकदार भर देत असतो. 
 • यावर्षी एखाद्या कंपनीचा शेअर्स मधून चांगला परतावा मिळाला  तर पुढील वर्षी तसाच मिळेल याची शाश्वती नसते. 
 • स्मार्ट गुंतवणूकदार तेच असतात जे कमी प्रमाणात जोखीम घेऊन निवडक शेअर्स मधून नफा कमवत असतो. 

 

४. गुंतवणूकदारांना जोखीम समजून घेऊन गुंतवणूक करावी.

 • शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असताना जोखीम अटळ आहे. जोखमीच्या काळात शेअर बाजाराचा अंदाज घेऊन गुंतवणुकीत बदल करता येऊ शकतो. 
 • शेअर बाजारातील गुंतवणुकीचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. 
 • बाजारातील जोखीम म्हणजे दहशतवादी हल्ले, महामारी आणि इतर विपरीत शक्यतांनी शेअर बाजारामध्ये अस्थिरता उद्भवू शकते. 

 

५. गुंतवणूक करून जोखीम स्वीकारणे योग्य 

 • शेअर बाजारात काही कंपन्यांचे शेअर्स नियमित चांगला परतावा देतात. ते शेअर्स गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित समजले जातात. 
 • शेअर बाजारात स्मॉल कॅप शेअर धोकादायक आणि लार्ज कॅप शेअर्स सुरक्षित समजले जातात. लार्ज कॅप शेअर्समधून दीर्घकाळासाठी चांगला परतावा मिळतो. 
 • शेअर बाजारातील जोखमीचा अंदाज लावता येत नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करताना जोखीम स्वीकारून काही गुंतवणूकदार चांगला नफा कमावतात. 
 • शेअर बाजारात एकाच ठिकाणी गुंतवणूक करणे योग्य समजले जात नाही. कमीत कमी जोखमीत जास्तीत जास्त फायदा कमवणे चांगल्या गुंतवणूकदाराचे लक्षण समजले जाते. 
 • शेअर बाजारामध्ये जर जोखीम घेतली नाही तर चांगला परतावा मिळत नाही. गुंतवणूकदाराची जोखीम स्वीकारण्याची क्षमता जास्त असली तरी त्याने अनावश्यक जोखीम घेऊ नये, त्यामुळे नुकसान होऊ शकते. 

 

नक्की वाचा : शेअर बाजारात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या ४ गोष्टी

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…