Reading Time: 4 minutes

गुंतवणूक हे एक सुखी जीवनाचे साधन आहे. महान गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी गुंतवणुकीची व्याख्या “भविष्यात अधिक पैसे मिळण्याच्या अपेक्षेने आता पैसे कामाला लावण्याची  प्रक्रिया” अशी केली आहे.

मागील काही वर्षांपासून लोकांचा इन्व्हेस्टिंग हा लोकप्रिय विषय झाला आहे.  खास करून नवी पिढी ही शेअर बाजाराकडे (share market) वळत आहे. परंतु, शेअर बाजार गुंतवणूक हा काही खेळ नाही. 

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला त्याचे पुरेपूर ज्ञान असणे आवश्यक आहे. यामुळे आज आपण या लेखामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी महत्वाची माहिती समजून घेणार आहोत. तुम्ही जर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करत असाल तर योग्य मार्गदर्नासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. 

नक्की वाचा – Share Market Basics : सर्वसामान्य भारतीयांनी शेअर बाजारात गुंतवणूक करावी का ? 

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याआधी –

   

  • लोक करत असलेल्या सर्वात सामान्य चुकांपैकी एक चूक म्हणजे, ज्या गोष्टीबद्दल त्यांना माहिती नाही किंवा ज्याबद्दल त्यांना फारच कमी ज्ञान आहे अशा गोष्टीमध्ये जोरदार प्रवेश करणे होय. 
  • “तुम्ही करू शकणारी सर्वोत्तम गुंतवणूक म्हणजे स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक.” 
  • वॉरन बफे यांच्यामते मन ही सर्वात महत्वाची संपत्ती आहे ज्यामध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते, म्हणूनच त्यांनी त्यांच्या दिवसातील बहुतेक वेळ ८० वाचन आणि विचार करण्यासाठी दिला आहे. 
  • यशस्वी गुंतवणूकदार बनण्याची पहिली पायरी म्हणजे वाचन सुरू करणे. तुम्ही मूलभूत आर्थिक पत्रकांपासून याची सुरुवात करू शकता. जसे की बॅलन्स शीट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट्स ई.  
  • नंतर वॉरन बफे, जिम सिमन्स, पीटर लिंच आणि रे डॅलिओ यांसारख्या मार्केटमध्ये अफाट संपत्ती कमावलेल्या दिग्गज गुंतवणूकदारांबद्दल वाचू शकता, त्यांचे आत्मचरित्र वाचू शकता. 

नक्की वाचा – Share Market Tips for Beginners : शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदारांनी टाळाव्यात “या” चुका 

  • सर्वप्रथम जोखीम आणि ध्येय निश्चिती करणे –
  • जीवन आणि गुंतवणुकीत तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. 
  • प्रत्येक व्यक्तीची ध्येये ही वेगवेगळी असतात. व्यक्तीच्या १८ किंवा वयाच्या ३० व्या वर्षी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचे ध्येय असू शकते. ३० वर्षे वयाच्या व्यक्तीला मुलाचे शिक्षण, शिकवणी किंवा लग्नासाठी गुंतवणूक करायची असेल. 
  • तुम्ही मोठे असल्यास, तुम्हाला निवृत्तीसाठी तुमची संपत्ती वाढवण्याची आणि ती  सुरक्षित ठेवण्याची इच्छा असू शकते.
  • व्यवसाय समजून घ्या आणि पुरेपूर माहिती असलेल्या कंपनीमध्येच गुंतवणूक करा –
  • व्यवसाय समजून घेणे ही गुंतवणूकीची पहिली पायरी असते. 
  • कंपनी ऑफर करत असलेले उत्पादन व सेवांबद्दल नेहमी सखोल वाचन केले पाहिजे व त्याबाबतीत सतत अपडेट ठेवले पाहिजे. 
  • कंपनीबद्दल अधिक जाणून घ्यायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी – 
  • कंपनीची उत्पादने/सेवा, 
  • कच्चा माल (जर ती उत्पादन करणारी कंपनी असेल), 
  • कंपनीचे प्रतिस्पर्धी, 
  • उद्योग, व्यवसायांसाठी असणारी त्यांची जोखीम, 
  • कंपनी जिथे चालते तिथला भूगोल, 
  • कंपनी चालवणारे व्यवस्थापन. 

वर नमूद केलेल्या माहितीचे काळजीपूर्वक पुनरावलोकन केल्यानंतर कंपनीच्या व्यवसायाबद्दल सखोल माहिती मिळू शकते. 

  • गुंतवणूकदारासाठी दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या/तिच्या स्कील्स्वर किंवा त्यांच्या कौशल्याशी जुळणाऱ्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे. 
  • आयटी उद्योगात काम करणाऱ्या व्यक्तीला एका आयटी कंपनीविषयी पूर्ण माहिती असेल.  त्याचप्रमाणे, रासायनिक उत्पादन उद्योगाशी परिचित असलेल्या व्यक्तीला रासायनिक कंपनीबद्दल अधिक समजेल.

नक्की वाचा – Share Market Investment : शेअर बाजारात गुंतवणुकीचे वास्तव आणि मृगजळ

  • सर्वप्रथम त्रैमासिक व वार्षिक अहवालांद्वारे पुरेपूर ज्ञान मिळवा –
  • इंटरनेटच्या या डिजीटल युगात जिथे माहिती स्वस्त व सहजरित्या उपलब्ध आहे, तिथे खोट्या माहिती व अफवांपासून स्वतःला रोखणे कठीण आहे. 
  • तुम्ही कंपन्यांद्वारे जाहीर  केलेले वार्षिक व त्रैमासिक अहवाल सतत वाचणे व त्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. 
  • कंपन्या त्यांचे वार्षिक व त्रैमासिक अहवाल गुंतवणूकदारांना देतात व व्यवसायाची सद्यस्थिती स्पष्ट करतात. हे अहवाल कंपनीच्या आर्थिक परिस्थितीशी संबंधित सर्व डेटा प्रदान करतात.
  • स्वतः व्यावहारिक बना व लवकर सुरुवात करा –
  • शेअर मार्केटला सुरुवात करण्यापूर्वी माणसाच्या मनामध्ये खूप भावना समोर येतात, कधी ते उत्साही बनते, तर कधी हताश आणि घाबरून जाते. 
  • एक नवशिक्या म्हणून  या सर्व भावना अनुभवणे हे महत्त्वाचे आहे. कारण ते गुंतवणूकदाराला रिअल-टाइममध्ये अनुभव मिळविण्यात मदत करतात. 
  • या महत्त्वाच्या भावनांचा भाग होण्यासाठी तुम्ही लवकरात लवकरात लवकर शेअर मार्केटला  सुरुवात करून त्यामध्ये गुंतवणूक सुरू केली पाहिजे. 
  • वॉरन बफे ११ वर्षांचे असताना त्यांचा पहिला शेअर विकत घेतला. यावरून आपण हे शिकायला हवे की शेअर बाजारातील गुंतवणुकीस लवकरात लवकर सुरुवात करणे नेहमीच चांगले असते.

नक्की वाचा – Share Market : शेअर बाजारात प्रथमच ग्न्ताव्णूक करताना ‘या’ गोष्टींकडे विशेष लक्ष द्या  

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जाणून घ्या हे महत्त्वाचे मुद्दे – 

ट्रेडिंग खाते म्हणजे काय?

  • तुम्ही शेअर बाजारात व्यापार करू इच्छित असाल तर त्यासाठी सिक्युरिटीज खरेदी आणि विक्री करण्यासाठी ट्रेडिंग खाते वापरले जाते. 
  • बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (Bombay Stock Exchange) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (National Stock Exchange) हे प्राथमिक एक्सचेंज आहेत जिथे स्टॉक सूचीबद्ध केले जातात. 
  • तसेच, काही स्टॉक्स फक्त या दोन एक्सचेंजेसपैकी एकावर उपलब्ध असू शकतात.

लिंक केलेले बँक खाते- 

  • ट्रेडिंगसाठी तुमच्या खात्यातून नियमितपणे पैसे जमा की

होण्यासाठी किंवा वजा होण्यासाठी तुमचे बँक खाते हे तुमच्या ट्रेडिंग खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. 

  • तसेच, तुम्ही टू-इन-वन खाती शोधू शकता जे डीमॅट खाते व ट्रेडिंग खाते दोन्ही म्हणून काम करतात.

नक्की वाचा – शेअर बाजार : वाव आहे, पण दिशा … ?  

गुंतवणूक कशी सुरू करावी –

  • तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्राथमिक शेअर मार्केट किंवा दुय्यम शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता.
  • प्राथमिक शेअर मार्केट –
  • यामध्ये कंपनीने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) लाँच केल्यानंतर गुंतवणूक केली जाते. 
  • तुम्ही IPO दरम्यान अर्ज केल्यानंतर तुमच्या बँक खात्यात रक्कम ब्लॉक केली जाते. 
  • तुमचे शेअर्स वाटप झाल्यानंतर, रक्कम तुमच्या खात्यातून डेबिट केली जाते व तुम्ही एका आठवड्याच्या आत त्यांची खरेदी विक्री सुरू करू शकता.
  • दुय्यम शेअर मार्केट –  
  • इथे गुंतवणूकदारांमध्ये स्टॉकची खरेदी आणि विक्री होते. 
  • स्टॉकची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे शेअर्स निवडू शकता. 
  • तुम्‍हाला एका विशिष्ट शेअर खरेदी किंवा विक्री  करण्यासाठीची किंमत तुम्ही ठरवू शकता.

शेअर मार्केटमध्ये काही जोखीम आहेत का?

  • शेअर मार्केटमधील व्यवहार किंवा तुमची गुंतवणूक ही पूर्णपणे जोखीमयुक्त असते. परंतु ही जोखीम तुम्ही कमी देखील करूच शकता. 
  • शेअर बाजारात गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी मार्केट कसे काम करते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
  • तुम्ही काही ब्रोकर त्यांच्या ऍपद्वारे किंवा त्यांच्या वेबसाइटवर ऑफर करत असलेल्या शैक्षणिक साधने आणि संशोधन यांचा संदर्भ घेऊ शकता. 
  • अशा प्रकारे तुम्ही जोखीम कमी करू शकता व कोणते स्टॉक खरेदी करायचे व ते कधी विकत घ्यायचे किंवा कधी विकायचे याची चांगली निवड करू शकता कारण बाजारामध्ये वेळ ही महत्त्वाची असते.

जर तुम्ही थोड्या पैशातून सुरुवात करत असाल तर गुंतवणूक करणे शक्य आहे. फक्त नवीन गुंतवणूकदार म्हणून तुम्हाला गुंतवणूक करताना कोणकोणत्या निर्बंधांचा सामना करावा लागतो याची माहिती व जाणीव असणे आवश्यक आहे. 

शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी पूर्व तयारीने गुतंवणूक करण्यास सुरुवात करा. तसेच, शेअर बाजाराविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आमचे ‘अर्थसाक्षर व्हा’ हे पुस्तक नक्की वाचा. 

तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी अर्थसाक्षर टीमतर्फे खूप शुभेच्छा !

 

 

(How to start investing in the stock market as a beginner)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…