डॉ. कलाम कथीरेसन
https://bit.ly/2FSEaxm
Reading Time: 3 minutes

तुमचे “अय्या” कोण??

तुम्हाला व्ही. कथीरेसन माहीत आहेत का? १९७९ साली सैन्यदलात वीज कामगार म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या कथीरेसन यांची नेमणूक १९८० साली हैद्राबादला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे गाडीवान म्हणून झाली. ते डॉ.कलाम यांच्या सेवेत १९९१ पर्यंत होते. पैकी निम्मा कालावधी मदतनीस म्हणून देखील त्यांनी सेवा दिली. ते सध्या तमिळनाडूतील एका सरकारी महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक म्हणून नोकरी करतात. हे कसं घडलं?

हे नक्की वाचा: नवरात्र विशेष: आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय? 

नवरात्र विशेष लेख क्र. २: आर्थिक नुकसानाचा ‘फोबिया’

 • कथीरेसन यांच्या म्हणण्यानुसार डॉ. कलाम यांनी मला वर्तमानपत्र-मासिके व पुस्तकं वाचताना पाहिले. 
 • त्यानंतर डॉ.कलाम यांनी मला पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. त्यासोबतच आर्थिक सहाय्यता सुद्धा केली. 
 • डॉ.कलाम नेहमीच आपल्या सहकाऱ्यांशी त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी उत्साहवर्धक भाषणं देत असत. 
 • वडीलांच्या अचानक झालेल्या निधनामुळे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचे बळ कथीरेसन यांना डॉ. कलाम यांनी दिले. 
 • त्यांनी १०वी, कलाशाखेतील पदवी व नंतर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. डॉ. कलाम नंतर दिल्लीत बदलून गेल्यावर सुद्धा कथीरेसन यांच्या शैक्षणिक प्रगतीचा मागोवा घेत राहिले.
 • १९९६साली कथीरेसन यांनी नोकरीचा राजीनामा देऊन पीएच.डी. करण्याचे ठरविले. त्यासाठी शिक्षण खात्यात पर्यवेक्षक म्हणून नोकरी पत्करली. 
 • दिवसभर काम आणि रात्री पीएच.डी.चा अभ्यास असा प्रवास सुरु झाला. वडिलोपार्जित शेतीत स्वतः काम करणाऱ्या पत्नीने घरखर्चासाठी कधीही पैशांची मागणी केली नाही. 
 • तिचं आर्थिक नियोजन मी आजवर समजू शकलो नाही, असं कथीरेसन प्रांजळपणे कबूल करतात. कारण त्यांना मिळणारा सगळा पगार शिक्षणासाठी खर्च होत होता. 
 • माझ्यात गाडीवान ते प्राध्यापक हे परिवर्तन घडवण्यात त्यांचे सर (तमिळ भाषेत “अय्या”) डॉ. कलाम यांनी माझ्या पंखांना उमेदीची ताकद दिली नसती, तर हे शक्यच झाले नसते, कथीरेसन हे गर्वाने सांगतात.

नवरात्र विशेष लेख क्र. ३:  आर्थिक शिस्त लावणारी “काह-केह-बोह” 

नवरात्र विशेष लेख क्र. ४: मी श्रीमंत कसा होऊ? 

मेहुलची एसआयपी (SIP) गुंतवणूक 

 • मेहुल साधारण २३ वयाचा अविवाहीत युवक. ३ वर्षांपासून म्युच्युअल फंडाच्या समभाग संलग्न योजनेत एसआयपी (SIP) सुरु आहे. 
 • मार्च महिन्यात गुंतवणूकीचे बाजार मूल्य ३०% कमी झाल्याने गुंतवणूक थांबवावी या निर्णयाप्रत आला होता. पण SIP सुरु करून ३ वर्षे झाली आहेत हा त्याचा हिशेब चुकत होता. कारण SIPच्या पहिल्या हप्त्याला ३ वर्षे झाली आणि शेवटच्या हप्त्याला एकच महिना झाला होता. 
 • याच अर्थ अंदाजे एसआयपी चा कालावधी दीड वर्ष होता. समभाग संलग्न गुंतवणूक किमान ७ वर्षे असेल तरच करावी, हा मुलभूत नियम त्याला समजावून सांगितल्यावर गुंतवणूक सुरु ठेवण्याचे मान्य केले.

एकापेक्षा जास्त गृहकर्जाचे नियोजन 

 • एक व्यक्ती किमान २ गृहकर्ज घेऊ शकते. तिसरे गृहकर्ज घेतांना त्याच व्यक्तीच्या नावे घेतल्यास व्यावसायिक कर्ज म्हणून गणले जाते. 
 • परंतु खासगी गृह कर्ज वितरण करणाऱ्या बँकेच्या प्रतिनिधीने हे निदर्शनास आणून दिले नाही. त्यामुळे किमान २.५% जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची तयारी असलेल्या मित्राला पत्नीच्या नावे गृहकर्ज घेण्याचे सुचविले. 
 • तिच्या नावे पहिलेच गृहकर्ज असल्यामुळे व्याजदर, तर कमी लागलाच पण सरकारी योजनेचा लाभ मिळून २.६८ लाखांचा अतिरिक्त लाभ देखील झाला.

नवरात्र विशेष लेख क्र. ५: पैशाचे व्यवस्थापन: खर्च आणि गुंतवणुकीचा ताळमेळ 

नवरात्र विशेष लेख क्र. ६:  Guaranteed Return: खात्रीशीर परताव्याचा अट्टाहास…

सुशांतचे आर्थिक नियोजन 

 • सुशांत तिशीतला व्यावसायिक. ४ वर्षांपूर्वी मालमत्ता विभाजन न करता सुरु केलेली सर्व गुंतवणूक समभाग संलग्न योजनांमधे होती. त्यात अचानक आलेल्या कोरोनाच्या आरीष्टामुळे व्यवसाय ठप्प झालेला आणि गुंतवणुकीवरील परतावा नकारात्मक. 
 • पोर्टफोलिओत आपत्कालीन निधीची तरतूद नाही. गुंतवणूकीतील काही भाग नुकसानीत विकून व्यावसायिक देणी भागवावी की कर्ज काढून? अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या सुशांतला संयम राखण्याचे सुचविले. 
 • बाजार हळूहळू पूर्वपदावर आल्यावर आर्थिक ध्येयांचा आढावा घेऊन पोर्टफोलिओची फेरबांधणी केली. 
 • संपत्ती निर्मितीसाठी एसआयपी च्या माध्यमातून गुंतवणूक करायचे ठरले, तर ठोस रक्कम स्थिर उत्पन्न आणि तरलता देणाऱ्या योजनांमधे गुंतविली. 
 • सुशांत आता नव्या दमाने व्यवसायवृद्धीवर लक्ष देतोय.

वरील ३ घटनांकडे बघितल्यास तुम्हाला पैलवान होता नाही आलं तरी चालेल पण चांगल्या पैलवानासोबत मैत्री असली पाहिजे, हे लक्षात येईल.

नवरात्र विशेष लेख क्र. ७: DIY: गुंतवणूक कितपत फायद्याची?

– अतुल प्रकाश कोतकर

[email protected]

(लेखक म्युच्युअल फंड व विमा वितरक आहेत.)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.