करोना कर्ज म्हणजे काय?
कोविड १९ मुळे अर्थव्यवस्थेस आलेली मरगळ दूर करण्यासाठी सरकार आणि रिझर्व बँकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यापैकी एक म्हणजे करोना कर्ज. भविष्याची अनिश्चितता, पगारातील कपात, टाळलेली पगारवाढ, नोकरीची अशाश्वतता यामुळे फक्त अत्यावश्यक खर्चांकडे लक्ष दिले जात आहे.
कोरोना – आव्हान मोठे, समाजमन संभ्रमित ठेवून कसे चालेल? …
बँकांकडे भरपूर पैसा आहे तो घेण्यास कोणी नाही. रिझर्व बँकेकडे डिपॉसीट म्हणून ठेवला तर मिळू शकणारे व्याजही खूप कमी आहे. सरकारी यंत्रणांचा कर्ज वितरण करण्यास येत असलेला दबाव, तर आधीच जुनी वाढत असलेली अनुत्पादक कर्जे यामुळे बँकांकडून घेण्यात येत असलेली वाढीव दक्षता यात एका नव्या योजनेची भर पडली असून त्याचे नाव करोना कर्ज असे आहे.
करोना कर्ज –
- बहुतेक सर्व सरकारी बँकांनी या कर्जाची सोय आपल्या विद्यमान ग्राहकांना उपलब्ध केली असून त्याच्या अटी सोप्या करण्यात आल्या आहेत. करोना कर्ज हे वैयक्तिक कर्ज असून ते व्यक्ती आणि उद्योग दोघांनाही मिळेल.
- याचा फायदा व्यक्ती छोटे मध्यम उद्योगांचे मालक, निवृत्ती वेतनधारक सर्वजण घेऊ शकतात.
- एरवी उद्योगांना असे कर्ज मिळवण्यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करणे अथवा खाजगी सावकारावर अवलंबून राहावे लागत असे. आता तसे होणार नाही.
- पैसेच नसण्याच्या पार्श्वभूमीवर आपली बँक आपल्या या खातेदारांना करोना कर्ज देण्यास तयार आहे. त्यामुळे अशा खरोखर गरजू व्यक्ती असतील, तर आपले नियमित व्यवहार चालू ठेवण्यास या कर्जाचा उपयोग होईल.
- यामुळेच एकमेकांबद्दल विश्वास निर्माण होईल. उद्योगांना कच्चा माल घेणे, कुशल मनुष्यबळ टिकवून ठेवणे यासाठी हे कर्ज उपयोगी पडू शकेल.
कोरोना: ईएमआय भरण्यास मुदतवाढ, तुम्ही काय कराल ?…
- करोना कर्ज सहज उपलब्ध होत असताना ते घ्यावे का? असा प्रश्न सहज निर्माण होतो. तेव्हा गरज नसेल, तरअसे कर्ज घेऊ नयेच.
- कर्ज सहज मिळते म्हणून घेऊन ते जोखमीच्या योजनांत गुंतवणे हे आपल्यावर बुमरेंग सारखे उलटू शकते.
- उद्योजकाने कर्जातून कोणतीही नवीन भांडवली योजना निर्माण करणे धाडसाचे ठरणार असून यातून आपली पत टिकवून ठेवण्यासाठी याचा वापर केला, तर ते अधिक योग्य होईल. नाहीतर कर्ज फेडण्यासाठी कर्ज अशा दुष्टचक्रात तो अडकू शकतो.
- कर्ज फेडण्याची निश्चित योजना आपल्याकडे असेल, तर खुशाल हे कर्ज घ्यावे.
- सध्या ३० जूनपर्यंत करोना कर्ज मिळू शकते याची मुदत यापुढे वाढू शकते.
- यात असलेले धोके विचारात घेऊन जरी कमी व्याजदराने कर्ज मिळत तरी जर आपला इन्व्हेस्टमेंट मधील बॅक अप इमर्जन्सी फंड असल्यास जरी हे गुंतवणूक तत्वांच्या विरोधात असले तरी त्याचा प्रथम वापर करावा असे वाटते.
लॉकडाऊन व अर्थव्यवस्थेतील अपरिहार्य बदल
कोविड इमर्जन्सी लोन
- कोविड इमर्जन्सी लोन स्कीम या नावाने इंडियन बँकेने ही योजना सर्वप्रथम बाजारात आणली.
- यात ५ विविध प्रकारच्या योजना असून, व्याजदर ८.०५ ते ९.५% या मध्ये आहे.
- हे कर्ज सर्वसाधारणपणे तीन ते पाच वर्षात फेडायचे आहे.
- पगारदारांच्या कोविड उद्रेगाच्या पूर्वीच्या पगाराच्या जास्तीत जास्त वीस पट, पेन्शनरांच्या बाबतीत पेन्शनच्या पंधरा पट तर उद्योजकांना खेळत्या भांडवलाच्या वीस पट कर्ज मिळेल.
- यासाठी कोविडपूर्व आपले कर्ज व्यवहार स्वच्छ असावेत एवढीच महत्वाची अट त्यात आहे.
- यावर प्रक्रिया शुल्क नाही, तारण ठेवण्याची गरज नाही.
- याचप्रमाणे रिझर्व बँकेने सवलत दिलेल्या कालखंडात म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत यावरील इ एम आय पुढे ढकलता येईल.
संकटकाळातील आर्थिक नियोजन
अशाच प्रकारच्या योजना बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र भारतीय स्टेट बँक, इंडियन ओव्हर्सिज बँक, युको बँक यांनी अशाच योजना आणल्या असून त्याचे नाव त्यातील अटी, शर्ती, पात्रता, व्याजदर (७% ते १०.५%), परतफेड मुदत, किमान /कमाल मर्यादा यामध्ये किरकोळ फरक आहेत.
यात २९ फेब्रुवारी २०२० रोजी आपले कोणतेही कर्ज अनुत्पादक मालमत्तेत वर्ग झालेले नसावे. यांचे सर्व तपशील paisabazaar.com या संकेतस्थळावर एकत्रित पहाता येतील. ज्या सरकारी बँकानी अशी कर्ज योजना जाहीर केलेली नाही त्यांच्याशी बोलून कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज मिळवणे आता शक्य आहे.
– उदय पिंगळे
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies