Demat: डिमॅट अकाउंट
शेअर बाजाराचे आकर्षण असणाऱ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे डिमॅट अकाउंट (Demat) म्हणजे काय? डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी किती शेअर्स खरेदी करावे लागतात? अशा काही मूलभूत प्रश आजच्या लेखात आपण डिमॅट अकाउंटबद्दल काही मूलभूत माहिती घेऊया.
Demat: डिमॅट अकाउंट म्हणजे काय?
- डिमॅट हा ‘Dematerialisation‘ या शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहे.
- डिमॅट अकाउंट म्हणजे शेअर्स, बाँड्स, डिबेंचर्स, इत्यादीचा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ठेवणारे खाते. शेअर मार्केटचे व्यवहार करण्यासाठी डिमॅट खाते उघडले जाते. डिमॅट खात्याचा वापर ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो. यासाठी इंटरनेट पासवर्ड आणि ट्रान्झॅक्शन पासवर्ड तयार करावे लागतात.
Demat: डिमॅट अकाउंट कसे काम करते ?
- कंपनीतील शेअर्सची मालकी ‘शेअर सर्टिफिकेट’च्या स्वरूपात असते.
- फिजिकल शेअर सर्टिफिकेट सांभाळणे, त्यावर खरेदी – विक्री व्यवहारांच्या नोंदी करणे, हे प्रचंड किचकट, वेळखाऊ काम होते. यावर मात करण्यासाठी शेअर सर्टिफिकेट्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवता येण्याची सुविधा डिमॅट अकाउंटद्वारे मिळायला सुरुवात झाली.
- फिजिकल शेअर सर्टिफिकेटमध्ये असणारे पुढील धोके डिमॅट मुळे नाहीसे झाले-
- शेअर सर्टिफिकेट चोरी होणे
- हरवणे
- खराब होणे
- कुणीतरी डुप्लीकेट बोगस कॉपी तयार करून फसवणूक करणे इ.
- बँकेच्या खात्यात ज्याप्रमाणे रक्कम भरली अथवा काढली, तर डेबिट अथवा क्रेडिट व्यवहार नोंदले जातात त्याप्रमाणे डिमॅट खात्यातही नोंदी होतात.
- तुम्ही शेअर्स खरेदी केले, तर तुमच्या डिमॅट खात्यात इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये ते जमा होतात. तुम्ही शेअर्स विकले, तर तुमच्या डिमॅट खात्यातून कमी होतात. शेअर खरेदी करताना तुम्ही दिलेले पैसे मात्र तुमच्या बँक खात्यातून दिले जातात.
डिमॅट अकाउंटचे इतर फायदे –
- डिमॅट खात्यामुळे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी आपल्या स्मार्टफोन, टॅब किंवा कॉम्प्युटरद्वारे सहज शेअर्सचा व्यवहार करू शकतो.
- फक्त शेअर्सचा नव्हे, तर म्युचूअल फ़ंड युनिट्स, एक्सचेंज ट्रेडेड फंड युनिट्स, सरकारी कर्जरोखे असे विविध गुंतवणूक पर्याय डिमॅटमध्ये जमा होऊ शकतात.
- अगदी एकही शेअर न विकत घेता तुम्ही डिमॅट अकाउंट उघडू शकता.
- कुठल्याही लिस्टेड कंपनीचा फक्त १ शेअरसुद्धा तुम्ही खरेदी करून डिमॅट खात्यामध्ये ठेऊ शकता.
- शेअर्सचे हस्तांतरण, शेअर्स तारण ठेवून कर्ज घेणे अशा विविध सुविधा तुम्हाला डिमॅट खात्यामुळे मिळतात.
भारतामध्ये NSDL आणि CSDL द्वारे डिमॅट अकाउंट सुविधा पुरवली जाते. ही सुविधा ब्रोकर्स , मध्यस्तांमार्फत पुरवली जाते. या ब्रोकर्सला डिपॉझीटरी पार्टिसिपन्ट्स म्हणतात (Depository Participants). ओळखीचा पुरावा व इतर कागदपत्र गोळा करून डिमॅट अकाउंट उघडले जाते.
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Demat account in Marathi, Demat account Marathi mahiti, Demat account mhanje kay? Demat account Marathi