Reading Time: < 1 minute

अर्थसाक्षर.कॉमच्या सुजाण वाचकांना ‘अर्थपूर्ण’ अभिवादन !

आज थोडसं निवांतपणे ‘आर्थिक नियोजन’ ‘आर्थिक स्वातंत्र्य’ म्हणजेच Financial Planning ‘नेमके’ काय ? हेच समजून घेऊ

  • अर्थ विषयक माहीती Google वर ओसंडून वाहत असताना आता वाचून ‘चोथा’ झालेल्या ह्या विषयांतील नाविण्य काय ? असे वाटणे स्वाभाविक आहे ! काही अंशी खरे सुध्दा आहे !! परंतु वाचकहो हे पूर्ण सत्य नाही …
  • आर्थिक नियोजन, Wealth Creation हे Product नाही ! झटपट श्रीमंतीचा Shortcut तर त्याहून नाही !
  • उलटपक्षी Financial Planning  म्हणजेच एक शिस्तबध्द गुंतवणुकीचा प्रवास आहे. ज्यात गुंतवणुकदाराच्या ‘आर्थिक प्रवृत्ती’ चा कस लागतो.
  • मला कल्पना आहे की, आता थोडसं कुतूहल वाढलं असेल परंतु हा विषय जेवढा सोपा तेवढाच अंमलात आणताना कठीण आणि कष्टाचा आहे. स्वयंशिस्त हि सोपी गोष्ट नव्हे …
  • Financial Planning  ही आयुष्याला कलाटणी देणारी ‘योजना’ आहे. हि योजना म्हणजे इन्शुरन्स पॉलीसी नाही किंवा Mutual Fund मधून चालू असणारी SIP सुद्धा नाही.
  • बऱ्याचदा गुंतवणूकदार ह्या दोन उत्पादनांतील गुंतवणूकांनाच Financial Planning समजतो. आणि निशंक होतो. ह्याला जबाबदार गुंतवणूकदार नाही.
  • Financial Planning, Wealth Creation, Retirement Planning ह्या संज्ञाचा वापर-उत्पादन कंपन्या जाहीरातीत बिनदिक्कत करताना आढळतात. आणि वाचक, प्रेक्षक आणि ग्राहकवर्ग भूलतात.

 

विषयविस्तार नको !

 

नेमके Financial Planning  म्हणजे काय भानगड  आहे हे समजून घेऊयात .

१) जीवनलक्ष्ये सुस्पष्टपणे मांडणे.

२) महिन्यातील मिळकत – खर्च आणि गुंतवणूकीचा हिस्सा नोंदवणे.

३) अंदाजपत्रके बांधणे.

४) कोणत्याही अनपेक्षित खर्चासाठी, आयुष्यातील आर्थिक चढ – उतारांसाठी सुसज्ज व्यवस्था निर्माण करणे.

५) एका ठराविक कालावधीसाठी उपलब्ध आर्थिक संसाधनामार्फत ‘आर्थिक नकाशा’ तयार करणे.

सारांश ‘आर्थिक नकाशा’ नूसार अंतिम ध्येय किंवा आर्थिक दृष्टया मुक्कामी पोहण्याचा ‘प्रवास’ म्हणजे Financial Planning ! म्हणजेच आर्थिक नियोजन ……… (क्रमशः)

भक्ती रसाळ

Mumbai 

Certified Financial Planner, AIII, Health Insurance Expert

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…