Reading Time: 2 minutes

आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफर) म्हणजे प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग. शेअर मार्केटमधे एखाद्या कंपनीचा आयपीओ येतोय असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती कंपनी पहिल्यांदाच सार्वजनिक होत असते. एखादी कंपनी सार्वजनिक झाली म्हणजे गुंतवणूकदार त्या कंपनीचे शेअर्स, स्टॉक मार्केटच्या माध्यमातून खरेदी आणि विक्री करू शकतात. 

एखादी कंपनी आयपीओ का आणते?

  • कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हणजे त्यासाठी भांडवल आवश्यक असते. जेव्हा एखाद्या कंपनीला विस्तारासाठी अधिक भांडवलाची आवश्यकता वाटू लागते, तेव्हा कंपनी आयपीओद्वारे सार्वजनिक होऊन गुंतवणूकदारांचे पैसे भांडवल म्हणून वापरते. 
  • याच्या बदल्यात कंपनीला जेव्हा नफा होतो, तेव्हा गुंतवणूकदारांना हा नफा डिव्हिडंडच्या (लाभांश) स्वरूपात वितरित केला जातो. 
  • तसेच शेअर मार्केटमधे कंपनीच्या शेअर्सचे भाव चढ-उतारामुळे खालीवर होत असतात; तेव्हा आयपीओच्या माध्यमातून कमी किमतीत मिळालेल्या शेअर्सची चढत्या भावाने विक्री करून गुंतवणूकदार या व्यवहारातून नफा कमवू शकतात.

सर्वात मोठा आयपीओ : 

  • आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ कुठला ? असा विचार जर मनात आला असेल तर तो म्हणजे भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीचा होता .
  • 4 मे , 2022 या वर्षी एलआयसीचा आयपीओ आला होता. आणि 9 मे, 2022 रोजी आयपीओ बंद झाला होता. आयपीओची इश्यू प्राईज Rs.902-949 अशी निश्चित केली होती. 
  • एनएसई आणि बीएसईवर एलआयसीचे शेअर्स Rs. 872 वर लिस्ट झाले आणि आज 28 ऑगस्टच्या ट्रेडिंग सेशनमधे हा शेअर Rs.1088 स्तरावर आहे.
  • एलआयसीने आयपीओद्वारे जवळपास Rs.21000 करोड इतक्या रकमेचा इश्यू बाजारात आणला होता. 

माहितीपर : युनिफाईड पेन्शन योजना

जाणून घेऊ सध्या मार्केटमधे आयपीओचे कुठले पर्याय गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहेत,

ऑगस्ट 2024 महिन्याच्या शेवटी आलेले काही आयपीओ :

1.प्रीमियर एनर्जी आयपीओ : 

  •  प्रीमियर एनर्जीचा आयपीओ  27 ऑगस्ट 2024 ला सुरू झाला असून 29 ऑगस्ट 2024 बंद होणार आहे. आयपीओसाठी  शेअरची किंमत Rs.427 – Rs.450 अशी निश्चित केली गेली असून 1 लॉट 33 शेअर्सचा आहे.
  • प्रीमियर एनर्जी या कंपनीची स्थापना 1995 मधे झाली होती. ही कंपनी सोलर पॅनल आणि सोलर सेल बनवते. तसेच नावाजलेल्या कंपन्या जसे की एनटीपीसी , टाटा पॉवर सोलर सिस्टिम, पॅनासोनीक लाईफ सोल्युशन, शक्ती पंप या सर्व  प्रीमियर एनर्जीच्या ग्राहकांच्या यादीमध्ये समाविष्ट आहे. 
  • प्रीमियर एनर्जी 3 सप्टेंबर 2024 या दिवशी एनएसई आणि बीएसई वर लिस्ट होईल अशी अपेक्षा आहे.
  • प्रीमियर एनर्जीचा आयपीओ आज म्हणजे 28 ऑगस्ट पर्यंत 6.18 पटीने ओवर सबस्क्राईब झाला आहे.
  • ब्रोकरेजेसकडून प्रीमियर एनर्जीच्या आयपीओसाठी सकारात्मक प्रतिसाद आहे . 

2. इकोस इंडिया मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी आयपीओ :

  •  इकोस इंडिया मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटीचा आयपीओ 28 ऑगस्ट 2024 ला  सुरू झाला असून 30 ऑगस्ट 2024 ला बंद होणार आहे.
  • आयपीओसाठी शेअरची किंमत Rs.318 – Rs.334 अशी निश्चित केली गेली असून 1 लॉट 44 शेअर्सचा आहे.
  • आयपीओद्वारे Rs.601 करोड इतके भांडवल उभे राहील असा कंपनीचा हेतु आहे.
  • कंपनी कॉर्पोरेट कस्टमरला कार भाडेतत्त्वावर देणे तसेच कर्मचाऱ्यांना वाहतूक   सुविधा देण्याचे काम ही कंपनी करते. कंपनीला व्यवसायाचा 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असून 100 पेक्षा जास्त शहरांमध्ये कंपनी कार्यरत आहे.
  •  इकोस इंडिया मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी 4 सप्टेंबर 2024 या दिवशी एनएसई आणि बीएसई वर लिस्ट होईल अशी अपेक्षा आहे. 
  • इकोस इंडिया मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटीचा आयपीओ आतापर्यंत म्हणजे  पहिल्या दिवशी 3.10 पट इतका सबस्क्राईब  झाला आहे. 

महत्वाचे : सॉवरिन गोल्ड बाँड

3.ट्रॅव्हल्स आणि रेंटल्स आयपीओ : 

  • ट्रॅव्हल्स आणि रेंटल्सचा आयपीएल 29 ऑगस्ट 2024 ला सुरू होईल आणि 2 सप्टेंबर2024 ला  बंद होईल.
  • आयपीओसाठी शेअरची किंमत Rs.40 अशी निश्चित केली गेली असून 1 लॉट 3000 शेअर्सचा आहे.
  • ट्रॅव्हल्स आणि रेंटल्सचा आयपीओ 5 सप्टेंबर, 2024 रोजी बीएसई एसएमई वर लिस्ट होईल अशी अपेक्षा आहे.
  • ट्रॅव्हल्स आणि रेंटल्स1996 मधे स्थापन झाली होती.  ही कंपनी  प्रवासाशी निगडित सर्व  सुविधा देण्यासाठी ओळखली जाते. यामध्ये विमानाचे तिकीट, हॉटेल्स आरक्षण, पॅकेज टुर, रेल्वे तिकीट, प्रवासाशी संबंधित विमा तसेच पासपोर्ट आणि विसा यासारख्या सुविधा देखील कंपनीतर्फे दिल्या जातात.

टीप – लेखामधे दिलेले आयपीओ हे गुंतवणुकीसाठी सुचवले नसून केवळ वाचकांपर्यंत माहिती पोहोचावी आणि जागरूकता निर्माण व्हावी हा यामागचा हेतू आहे. शेअर मार्केटमधे गुंतवणूक करायची असल्यास कायम जाणकार, तज्ञ आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा .

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.