Health Insurance आरोग्य विमा
Reading Time: 3 minutes

आरोग्य विमा (Health Insurance)

कोरोनाने दिलेला सर्वात मोठा धडा म्हणजे आरोग्य विमा (Health Insurance). पण कोरोना व्यतिरिक्त आरोग्य विमा खरेदी करण्याची अजूनही काही महत्वाची कारणे आहेत. ती कोणती याबद्दल आजच्या लेखात माहिती घेऊया.

Health Insurance: आरोग्य विमा काळाची गरज 

 • कार विमा, मालमत्ता विमा इ. विम्यांइतकाच आरोग्य विमा महत्त्वाचा असतो.
 • आपण सोने, चांदी, जमीन, मालमत्ता यांच्यामध्ये लाखो रूपयांची गुंतवणूक करत असतो. मात्र आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे असणारे शरीर, आरोग्य यावर आपण काहीच गुंतवणूक करत नाही. आरोग्यासाठी केलेली गुंतवणूक ही सर्वोत्तम गुंतवूणक असल्याचे समजले जाते.
 • आरोग्यावर केलेली गुंतवणूक ही कधी फायदेशीर ठरेल सांगता येणार नाही. त्यामुळे आरोग्य विमा काढून, आपल्या आरोग्यासाठी उत्तम गुंतवणूक केली पाहिजे. त्या गुंतवणूकीचा आपल्याला भविष्यात देखील चांगला फायदा होतो.
 • आरोग्य विमा खरेदी करण्याची कारणे जाणून घेऊया.
 • कोरोना महामारीने जगण्याचे संदर्भच बदलले आहेत. मला काय होतंय, मी तरुण आहे अशी आरोग्य विमा नाकारण्याची  अनेक कारणे फोल ठरत आहेत.
 • कोरोनाच्या औषध उपचारांचा खर्च आज लाखोंच्या घरात गेला आहे. केवळ कोरोनाच नाही तर, इतर आजारांच्या उपचारांचा खर्चही लाखाच्या घरात असतो.
 • या अचानक उद्भवणाऱ्या आणि टाळता न येणाऱ्या खर्चाला सामोरे जाताना आपल्या बरोबर ‘आरोग्य विमा’ नावाची ढाल असणे अत्यंत आवश्यक आहे. 

विशेष लेख: आरोग्यम् धनसंपदा.. आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष नको!

Health Insurance: आरोग्य विमा खरेदी करण्याची महत्वाची कारणे

१.कॅार्पोरेट विमा पुरेसा नाही –

 • आपण नोकरी करत असलेल्या कंपनीमार्फत देखील आरोग्य विमा प्रदान करण्यात येत असतो. मात्र प्रत्येक वेळेस तो विमा पुरेसा असेलच असे नाही.
 • काही गंभीर आजार कंपनी विम्याच्या कक्षेमध्ये समाविष्ट केले जात नाहीत. तसेच नोकरी संपली अथवा बदलली तर कॅार्पोरेट विम्याची मुदत देखील समाप्त होत असते. अशावेळेस एक व्यक्तीगत विमा असणे गरजेचे असते.

२. भविष्यात फायदेशीर –

 • आरोग्य विम्यामध्ये केलेली गुंतवणूक ही एकप्रकारे सुखरूप भविष्यासाठीच केलेली गुंतवणूक असते.
 • आज आजारपणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या धोक्यांसाठी सुरूवातीपासूनच तयार असणे गरजेचे आहे.
 • अनेक वेळा अडचणीच्या काळात आपल्याकडे पैसे नसतात. अशावेळेस आरोग्य विमा फायदेशीर ठरतो.
 • विमा कंपन्या एकच विमा पॅालिसी जर अनेक वर्ष कायम ठेवली तर त्यावर लॅायलटी बोनस देखील देत असतात.

३. औषध-उपचारांचा वाढता खर्च –

 • आज भारतासारख्या देशामध्ये औषध-उपचारांच्या खर्चामध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे. सामान्य माणसाला अनेक मोठ्या आजारांवरील खर्च झेपतोच असे नाही. अशावेळेस कामाला येतो तो आरोग्य विमा!
 • अडचणीच्या काळात लाखो रूपये एकदम भरणे शक्य नसते. अशावेळेस हॅास्पिटलचा खर्च, औषधांचा खर्च, तंत्रज्ञानाचा खर्च, अवयव प्रत्यारोपणाचा खर्च असे अनेक खर्च विम्याचा वापर करून पूर्ण केले जातात.
 • आपले वय कमी असताना, आपल्याला मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा  इतर आजारपण नसते. त्यामुळे भविष्यात असा आजार झाल्यास तो पॉलिसीमध्ये कव्हर केला जाऊ शकतो.
 • कमी वयात विमा घेतल्याने विम्याचा हफ्ता कमी असतो. मात्र वय वाढल्यावर त्यानुसार विम्याचा हफ्ता अधिक भरावा लागू शकतो. त्यामुळे कधीही कमी वयात आरोग्य विमा घेणे कधीही चांगले.

हे नक्की वाचा: योग्य आरोग्य विम्याची निवड

४. आयकरामध्ये सवलत –

 • भारतीय आयकर कायदा कलम ८० डी नुसार, आरोग्य विमा हा करसवलतीसाठी पात्र आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच ६० वर्षाखालील व्यक्तीस वैयक्तीक आरोग्य खर्चासाठी अधिकची करसवलत मिळते.
 • याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची विम्या अंतर्गत करण्यात आलेली आरोग्य तपासणी, औषध उपचार हे देखील करसवलतीसाठी पात्र आहेत.

५. अन्य खर्च –

 • हॅास्पिटलमधील खर्चाबरोबरच अनेक विमा कंपन्या, ॲम्ब्युलन्स खर्च, हॅास्पिटलच्या रूमचे भाडे, हॅास्पिटलमधील जेवणाचा खर्च, डे-केअर खर्च इ. गोष्टी देखील काही विमा योजना प्रदान करतात.
 • विमा घेताना या गोष्टींची खात्री करून घ्यावी. निव्वळ विमा प्रतिनिधी सांगतो म्हणून आंधळेपणे या गोष्टींवर विश्वास ठेवू नये.
 • योग्य आरोग्य विम्याची निवड करणे हे खूप आवश्यक आहे.

६ वृद्धावस्थेत आवश्यक –

 • अनेक वेळा आपण बघतो की, जसजसे वय वाढत जाते तसे आजारपणामध्ये देखील वाढते. आई-वडील अथवा आजी-आजोबा यांच्या औषध-उपचारांसाठी आरोग्य विमा फायदेशीर ठरतो.
 • प्रत्येक जण एकदिवस वृध्द  होणार आहे. त्यामुळे निवृत्ती नियोजनाची तरतूद करणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्याची तरतूद करताना आरोग्य विम्याची खरेदी आताच का करू नये?

हजारो रूपये आपण अनेक गोष्टींवर खर्च करतो. आरोग्य विमा घेऊन थोडासा खर्च जर आपल्या आरोग्यासाठी केला तर तो भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरेल. त्यामुळे आरोग्य विमा नक्की घ्यावा.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel: CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.