Arthasakshar Development of China marathi
https://bit.ly/2ZuI1q4
Reading Time: 2 minutes

चीन -आर्थिक महासत्ता 

चीन या देशाबद्दल सध्या जगभरात नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. सध्या पूर्ण एकटं पाडलं गेलेल्या चीनला आर्थिक महासत्ता बनण्यासाठी ७० वर्षे लागली.  

Keep your friends close and your enemies closer. असे म्हणतात म्हणून आपला शत्रू असलेल्या पाकिस्तानचा पालनहार चीन बाबत आपल्याला माहिती हवीच हवी. शिवाजी महाराजांनी मावळ्यांची साथीने बलाढय मुघल साम्राज्याचा पाडाव केला. याचं कारण म्हणजे गनिमी कावा. अनेकदा शत्रूच्या गोटात जाऊन शिवाजी महाराजांनी त्याला नामोहरम केलं आहे. त्यामुळे आपल्या शत्रूबद्दल शक्य तेवढी माहिती आपल्याला असायला हवी तरच  गुण आणि दोष समजू शकतील.   

भारत विरुद्ध चीन – अर्थव्यवस्था…

लोकसंख्येमध्ये अव्वल स्थानी असलेला चीन इतकी प्रगती करू शकला? चीनने नक्की कोणता “फॉर्म्युला” वापरला की अमेरिकेसारख्या महासत्तेला आव्हान देण्याचे सामर्थ्य आज चीनकडे आहे?   

यशाची उंची गाठण्यासाठी चीनने कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा केली? 

चीन खरोखरच आर्थिक महासत्ता आहे का?

या साऱ्या प्रश्नांची उत्तरे हे आज आपण पाहणार आहोत- 

पतंजली- आचार्य बाळकृष्ण यांचे साम्राज्य…

  • सन १९७९ मध्ये चीनने अमेरिकेसोबतचा व्यापाराचा करार पुनर्स्थापित केले. जागेचे व कर्मचाऱ्यांचे अत्यंत वाजवी दर यामुळे चीनमध्ये  पैशांची आवक सुरु झाली. 
  • सन  २००१ मध्ये चीनने जागतिक व्यापार संघटना (World Trade Organisation) यांचे सदस्यत्व घेतले आणि यानंतर पूर्ण जगासाठी चीन  हेच उत्पादनाचे ठिकाण बनले, परिणामी २०१७ मध्ये चीनमध्ये एकूण १६८ बिलियन डॉलर्स इतकी विदेशी गुंतवणूक झाली. 
  • चीनने जनतेच्या साक्षरतेची टक्केवारी कमालीची वाढवली ज्यामुळे त्यांच्याकडील कुशल कामगारांच्या उपलब्धतेने कामगारांच्या कामाची गती आणि दर्जा यामध्ये सुधारणा होतं गेली. २०१० मध्ये चीनचा साक्षरता दर ९६% होता जो १९८२ मध्ये २२% होता.
  • चीनमध्ये सर्व गोष्टी बनवल्या जातात अगदी खेळण्यांपासून ते मोबाईल, इलेक्टिक वस्तूंपर्यंत जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये चीनने खूप मोठे मार्केट मिळवले. 
  • howmuch.net ने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार चीन केवळ 81 देशांकडून १ अब्ज डॉलर्स किंवा त्याहून अधिक किमतीची वस्तूंची आयात करते, तर ते सुमारे 117 देशांना १ अब्ज डॉलर्स किंवा त्याहून अधिक वस्तूंची निर्यात करते.   
  • चीनचा प्रगतीचा दर या दशकामध्ये थोडा कमी झाला आहे. परंतु तसा विचार करता ५ ते ६ टक्क्यांनी जरी ही प्रगती साधली तरीही चीन हा जागतिक प्रगतीच्या तुलनेत सर्वांत अग्रेसरच असेल. या गतीने देखील चीन हा जागतिक प्रगती दराच्या ३५% भागीदारी असणारा देश असेल, म्हणजेच इतकी मोठी भागीदारी असणारा चीन हा एकमेव देश असेल, जी टक्केवारी अमेरिकेच्या तिप्पट आहे.

‘मा यून’ ते ‘जॅक मा’ चा यशाचा प्रवास – भाग १…

  • फोर्ब्सने 2019 साली प्रकाशित केलेल्या यादीनुसार चीनमध्ये 300 अब्जाधीश होते. यामुळे चीन जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये जगात दुसर्‍या स्थानावर जाऊन पोचला आहे. पहिल्या क्रमांकावर अर्थातच अमेरिका आहे. 
  • चीनमधून २०१७ सालच्या नोंदींनुसार २.४९ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स इतक्या मोठ्या प्रमाणात निर्यात झाली. ज्यामुळे चीन हा देश जगातील सर्वांत जास्त निर्यात करणारा देश बनला, यापाठोपाठ अमेरिकेचा क्रमांक लागत असला तरी या दोन्हींच्या आकडेवारीमध्ये खूप मोठी तफावत आहे.
  • सन १९८० पासून चीनची अर्थव्यवस्था अक्षरशः चक्रवाढीच्या दराने वाढत आहे. म्हणजेच १९८० साली ३०५ बिलियन डॉलर असणारी चीनची अर्थव्यवस्था २०१९ साली १४.३ ट्रिलियन डॉलर इतक्या मोठ्या उंचीवर गेली. वर्ल्ड बँकेनुसार खरेदी क्षमतेचा (purchase parity) विचार करता  चीनची अर्थसत्ता २०१४ पासून सर्वोच्च आहे.
  • चीनच्या प्रगतीमध्ये २ सर्वांत महत्वाच्या मुद्द्यांचा सहभाग आहे, हे २ मुद्दे म्हणजे –
    • तिथल्या लोकांनी आणि विदेशातून देखील झालेली भांडवल गुंतवणूक आणि 
    • मोठ्या प्रमाणावर त्यांनी त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर दिला.
  • आजवर चीनच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठा वाटा उत्पादन क्षेत्रांचा आहे, परंतु आता चीन कमी इंधन वापराच्या, तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेल्या सेवा क्षेत्रांवर जास्त भर देणार आहे.

अशाप्रकारे अनेक मुद्द्यांच्या आधारे आपण निश्चितच चीनला आर्थिक महासत्ता म्हणू शकतो. 

मा यून ते जॅक मा यशाचा प्रवास – भाग २ …

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.