Reading Time: 2 minutes

कोरोनाच्या महामारीनंतर अर्थचक्र सुधारेल असा विश्वास जगाला होता. अर्थचक्र सुधरलेही, मात्र जगभरात महागाई कमालीची वाढली. 

  • अनेक देशांमध्ये आतापर्यंतच्या काळातील सर्वात जास्त महागाईचा काळ सुरु असल्याची नोंद झाली आहे. 
  • असं असताना सोने या मौल्यवान धातूवर या महागाईचा जास्त काही परिणाम झालेला नाही. 
  • २०२१ आणि २०२२ म्हणजेच चालू वर्षात सोन्याची चमक बिलकुल कमी झालेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपासून तर राष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याला सध्या चांगला भाव  मिळत आहे. 
  • महागाईचा सर्व क्षेत्रांवर परिणाम होत असताना, सोन्यावर परिणाम का नाही ? असा प्रश्न उपस्थित होतो. याच उत्तर अत्यंत विस्तृत आहे. यासाठी आपल्याला सोन्याबद्दलच्या काही गोष्टी माहित पाहिजे.  

 

हे ही वाचा – Gold ETF Vs Gold Mutual Fund: गोल्ड ईटीएफ की गोल्ड म्युच्युअल फंड, तुम्ही काय निवडाल?

 

सोन्याचा साठा जगात सगळ्यात जास्त कुठे आहे? त्याची किंमत कोण ठरवतं

  • सोन धातूबद्दल जाणून घेण्यासाठी वरील दोन प्रश्न अत्यंत महत्वाचे ठरतात. आपण फेसबुक, इंस्टाग्रामवर काही मजेशीर पोस्ट वाचताना पाहिलं असेल की असं म्हटलं जातं की भारतात स्त्रियांकडे जगातलं सर्वात जास्त सोन आहे. 
  • आपल्याला हे पाहून हसू जरी येत असलं तरी यामध्ये तथ्य आहे. भारतात आणि दक्षिणआफ्रिकेत जगातलं सर्वात जास्त सोन आढळून येतं.
  • दक्षिण आफ्रिकेतल्या विटवॉटर्सरँड खोऱ्यातून जगाला सर्वांत जास्त सोनं मिळतं. असं असूनही या भागातील ४० टक्के उत्खनन झालेलं नाही. 
  • भारतात सोन्याची सर्वात मोठी जगातली दुसरी खाण आहे. ही खाण दक्षिण कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यात आढळून येते. नुकताच प्रदर्शित झालेला केजीएफ हा दाक्षिणात्य चित्रपट या खाणीवर दिगदर्शित केला आहे. 
  • २००३ सालापासून ही खाण बंद करण्यात आलेली आहे. तरीदेखील भारतात मोठ्या प्रमाणावर सोन्याचे उत्पादन केले जाते. 
  • सोन्याची किंमत लंडनमध्ये ठरते. लंडन बुलियन मार्केट मध्ये ज्या दिवशी व्यवहार सुरू असतात त्यादिवशी दिवसभरात दोनवेळा सोन्याची किंमत ठरवतात. 
  • सोन्याचे दर हे प्रामुख्याने अमेरिकन डॉलर्स, पाऊंड आणि युरोमध्ये निश्चित केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या सोन्याचे दर हे १८०० ते १८५० यूएस डॉलर्समध्ये आहे. तर भारतात प्रति १०ग्रॅममागे हे दर ५१,००० रुपये इतका आहे. 
  • सध्या अमेरिकेत आणि भारतात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. अमेरिकेत गेल्या ४० वर्षांमधील महागाईचा उच्चांक यावर्षीच्या महागाईने गाठला आहे. 
  • भारतातही गेल्या ८ वर्षांमधील सर्वात जास्त महागाईची यावर्षी नोंद करण्यात आली आहे. महागाईसोबतच बँकाच्या व्याजदरांमध्ये देखील कमालीची वाढ झालेली दिसत आहे. 

हे ही वाचा – Gold Investment: भारतात सोने गुंतवणुकीचे पाच पर्याय

 

सोन्याचा दर नियंत्रणात कसा राहतो ?

  • सोन्याच्या किंमतीला नियंत्रणात ठेवणारी गोष्ट म्हणजे व्याजदराची असणारी सद्यपरिस्थिती. 
  • अमेरिका, भारत आणि जवळपास इतरही देशांमध्ये सध्या व्याजदरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. 
  • महागाई आटोक्यात आण्यासाठी आयबीआय, फेड यांनी व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात काही दिवसांपूर्वी गृहकर्ज हे ६. ७५ टक्के व्याजदरावर मिळत असायचं. 
  • मात्र आता हेच कर्ज ८ ते ९ टक्के इतकं आहे. जो पर्यंत महागाई आटोक्यात येत नाही, तो पर्यंत व्याजदरांमध्ये वाढ होणार असं जागतिक बँकांनी याआधीच सांगितलं आहे. 
  • डॉलरचा वाढणारा भाव, पडणारा रुपया, वाढता व्याजदर यांसारख्या गोष्टींमुळे सोन्याच्या दरांवर दबाव येत आहे. 
  • दुसरीकडे रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्याला चांगले दिवस आले असं म्हणायला हरकत नाही. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान शेअर बाजार कमालीचा पडलेला असताना गुंतवणूकदारांना सोन्यामुळेच आधार मिळाला. 
  • सध्या महागाईचा दर हा उच्चांकावर असल्यामुळे भारतासहित इतरही देशांमध्ये सोन गुंतवणूकदारांना आकर्षित करणार असं वाटत नाही. त्यातच वाढलेल्या व्याजदरामुळे सोन्याच्या भावात काही फरक होईल असंही दिसत नाही. 
  • भारतात सोन्याची आयात आणि निर्मितीदेखील नियंत्रित आहे. सध्या सुरु असलेल्या महागाईच्या काळात वरील सर्व गोष्टींमुळं कसलाही फरक पडलेला नाही असं दिसून येत आहे. 
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…