सोने गुंतवणुकीचे पर्याय Gold Investment
https://bit.ly/3j2WFgu
Reading Time: 3 minutes

भारतात सोने गुंतवणुकीचे पाच पर्याय

भारतात सोने गुंतवणुकीचे (Gold Investment) विविध पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणूकदार सध्या ‘सोने’ गुंतवणूक करण्यास जास्त पसंती देत आहेत. कोव्हिड-१९ च्या साथीने जागतिक बाजार कोलमडला असताना जागतिक उत्पन्नातही निरंतर घट होत आहे. त्यामुळे बहुतांश मालमत्तांकडून परतावे कमी मिळत आहेत. बाजारातील स्थिती पाहून धोक्याची सूचना मिळालेले गुंतवणुकदार सोन्याकडे वळत आहेत. संकट काळात इतर मालमत्ता अस्थिर असतात तेव्हा सोन्याने नेहमीच स्थिर मूल्य धारण केलेले दिसून येते. 

हे नक्की वाचा: हिरे की सोने : गुंतवणूकीचा योग्य पर्याय कोणता? 

  • पारंपरिक गुंतवणूदार मालमत्ता म्हणून ज्या गोष्टी विचारात घेतो, ते सर्व गुण सोन्यात असतात. सोन्याच्या बाजाराने सोन्याच्या किंमतीत घसरण अनुभवली त्यांनतरमात्र आता मजबुत पुनरागमन केले आहे. 
  • अगदी काही अंशी शेअर्स आणि बाँडपेक्षा चांगली कामगिरी दर्शवली. तसेच सोन्यावर आधारीत मालमत्तांद्वारे एखादी व्यक्ती त्याचे रोख रकमेत रुपांतर करू शकते. 
  • स्टॉक्स आणि बाँड यासारख्या इतर मालमत्तांपेक्षा वेगळी कामगिरी दर्शवणारे, अशी सोन्याची ख्याती आहे. त्यांचे मूल्य घसरले की सोन्याचे मूल्य वधारते.
  • इतर मालमत्तांशी कमी परस्परसंबंध असल्याने, बाजारातील स्थिती प्रतिकुल असताना नुकसान भरून काढणारा उत्कृष्ट पोर्टफोलिओ डायव्हर्सीफायर म्हणून सोने काम करतो. 
  • महागाईवर मात करणाऱ्या वैशिष्ट्यांमुळेही सोने मौल्यवान आहे. आर्थिक मंदीच्या काळात, सरकार अमर्याद पैसे छपाई करण्याची शक्ती वापरतात. 
  • अर्थव्यवस्थेत जास्त पैसे असले, तर महागाई येते. लोकांच्या खिशातील पैशांचे व मालमत्तांचे मूल्य कमी होते, त्या काळात सोन्याची किंमत वाढते. 

संबंधित लेखसोनं खरेदी करताय? थांबा, आधी हे वाचा 

Gold ETF and Gold Fund: गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड फंड 

तुम्ही सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) करण्याचा विचार केला असेल तर पुढील पाच मार्गांनी ती करता येईल.

Gold Investmentसोने गुंतवणुकीचे पाच पर्याय:

१. भौतिक सोन्यात गुंतवणूक (Physical gold): 

  • सोन्याची नाणी, बार आणि दागिन्यांच्या रुपात भौतिक स्वरुपात सोने खरेदी करता येते. 
  • भारतीयांना सोन्याचे दागिने आवडतात, मात्र खरेदीपूर्वी सुरक्षा, विमा खर्च आणि जुने डिझाइन या गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे. 
  • भारतात घडणावळीचे शुल्क ६ ते २५% पर्यंत आहे, तर दुसरीकडे ज्वेलर्स, ई-कॉमर्स वेबसाइट्स, गैर-बँकिंग वित्तीय कंपन्या व सरकारकडून सोन्याची नाणी खरेदी केली जाऊ शकतात. 
  • भारत सरकाने स्वदेशी मिंटेड कॉइन लाँच केले असून, यात एका बाजूला अशोक चक्र आणि दुसरीकडे महात्मा गांधींची प्रतिमा आहे.

२. ईटीएफमध्ये गुंतवणूक (Exchange Traded Funds): 

  • पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे गोल्ड ईटीएफ खरेदी करणे. ईटीएफमध्ये गुंतवणूक करताना सुरुवातीची महागडी खरेदी, विमा आणि एवढेच नाही, तर विक्रीचा खर्चही लागत नाही. 
  • त्यामुळे ते अधिक कॉस्ट-इफेक्टिव्ह ठरते. ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोकांना ऑनलाइन स्टॉकब्रोकर आणि डीमॅट खात्यातून ट्रेडिंग अकाउंटची आवश्यकता असते. 
  • एकदा खाते उघडल्यानंतर फक्त गोल्ड ईटीएफ निवडणे आणि ब्रोकरच्या ट्रेडिंग पोर्टलवरून ऑर्डरच द्यावी लागते.

इतर लेख  सुवर्ण गुंतवणुकीचे ‘डिजिटलायजेशन’

        सोन्याची दरवाढ अजून कुठपर्यंत?

३. जीएपी (Gold Accumulation Plan -GAP):

  • स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोल्ड रश प्लॅननुसार, मोबाइल वॉलेट्ससारख्या गूगल पे, पेटीएम, फोनपेद्वारेही सोने ऑनलाइन खरेदी केले जाऊ शकते. 
  • ‘डिजिटल गोल्ड’ खरेदी करण्यासाठीचे हे पर्याय एमएमटीसी-पीएएमपी किंवा सेफगोल्ड किंवा या दोहोंच्या सहयोगातून दिले जातात. 
  • डिजिटल गोल्डला भौतिक सोन्याच्या रुपात पाहता येऊ शकते किंवा विक्रेत्याला पुन्हा विकता येऊ शकते.

४. सुवर्ण सार्वभौम रोखे (Sovereign Gold Bond scheme -SGB):

  • कागदी सोन्यात गुंतवणुकीचा हा दुसरा मार्ग आहे. सरकार एसजीबी जारी करते, जे दर काही महिन्यांमध्ये खुल्या होणाऱ्या इंटरव्हल्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध होतात. 
  • हे रीडंप्शनवर टॅक्स-फ्री आहेत. मॅच्युरिटी पीरिएड असल्यामुळे, हे दीर्घकालीन गुंतवणूक योजनांसाठी आदर्श पर्याय आहेत. 
  • भारत सरकारने ५ नोव्हेंबर २०१५ रोजी गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम सुरू केली असून जनतेला बँकेतील लॉकर्समध्ये असलेल्या सोन्यावर व्याजरुपाने कमाईचा मार्ग मिळू शकेल.

५. गोल्ड फ्यूचर्स:

  • गोल्ड फ्यूचर्समध्ये गुंतवणूक म्हणजे वास्तविकत: सोन्याच्या किंमतीवरील अंदाज लावला जातो आणि मूल्य अस्थिरतेचा लाभ कमावता येतो. 
  • सोने अपेक्षित दिशेने पुढे गेले तर फ्यूचर्स मार्केटमध्ये कुणीही लवकर पैसा कमावू शकते. मात्र, असे झाले नाही तर खूप कमी वेळेत पैसा गमावू शकतो.

सोने एखाद्याच्या गुंतवणुकीची सुरक्षा, लिक्विडिटी आणि लाभाची हमी देते. कोव्हिड-१९ दरम्यान जागतिक वृद्धीत मंदिमुळे अनिश्चितता वाढत आहे. इतर मालमत्ता वर्गावरही गुंतवणूकदारांचा विश्वास कमी आहे. अशा काळात लोक मदत का करत नाहीत, असे म्हणण्यापेक्षा लोक सोन्याकडे धाव घेत आहेत, या दृष्टीने पाहणे अधिक हितकारक ठरेल.

श्री प्रथमेश माल्या

गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष,

एंजल ब्रोकिंग लिमिटेड

For suggestions queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Gold Investment options Marathi Mahiti, gold Investment options in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…