Reading Time: 4 minutes

 याशिवाय-

★भारतीय करार कायदा कलम 17 नुसार त्याची नोंदणी करणे आवश्यक नसले तरी नोंदणी करणे केव्हाही चांगलेच आहे.

★मृत्युपत्र संयुक्तपणे बनवता येत असले तरी स्वतंत्र बनवावे.

★यासाठी यातील तज्ञ व्यक्ती आणि वकील या दोघांची मदत घ्यावी. तज्ञ व्यक्ती आपल्या अपेक्षा त्यात येतात की नाही याची काळजी घेण्यासाठी तर वकील त्यातील तरतुदी कायदेशीरदृष्ट्या वैध आहेत की नाही हे पाहण्यासाठी असावा.

★मृत्युपत्राचा निर्माता आणि 2 साक्षीदार यात एक डॉक्टर असेल तर उत्तम यांनी प्रत्येक पानावर सह्या कराव्यात. शक्यतो त्या एकाच वेळी एकमेकांसमोर केल्या तर ते केव्हाही चांगले.

★मृत्युपत्राची  मुळप्रत सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये, आपल्या वकिलाकडे व्यवस्थापक नेमला असल्यास त्याच्याकडे किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे.

★माहिती असल्यास किंवा नसल्यास अशी माहिती मिळवून त्यात अगदी थोडक्यात असा घराण्याचा इतिहास लिहावा. आयुष्यात उपयोगी पडलेल्या व्यक्तींचा उल्लेख  कृथार्थथेने करावा. भविष्यात काही अडचण आल्यास कोणाकडून मार्गदर्शन घ्यावे याचा उल्लेख असावा. असे सुचवण्यामागे मनुष्य हा समाजप्रिय प्राणी असून त्यास समाज घटकांची उपयुक्तता पटवून द्यावी असा व्यापक हेतू आहे. असेच करायला हवे असे नाही.

★या संबंधातील वादविवादांच्यामध्ये संबंधित न्यायालयाने मृत व्यक्तीच्या स्थानी आपण आहोत असे समजून सारासार विचार करून या विषयी आपला निर्णय द्यावा अशी कायद्याची अपेक्षा आहे. 

            

मुंबई ग्राहक पंचायतीने या विषयावर एक छोटी पुस्तिका बनवली होती यात किमान प्राथमिक माहिती आणि संदर्भासाठी मृत्युपत्राचा एक नमुना दिला आहे सध्या या पुस्तिकेची छापील प्रत उपलब्ध नाही. याची सॉफ्ट कॉपी कुणाला हवी असल्यास माझ्याकडून मागून घ्यावी. त्याचाच आधार घेऊन पूर्वी सुचवलेल्या नमुन्यात कालानुरूप योग्य ते बदल करत मृत्युपत्राचा नमुना कसा असावा ते येथे देत आहे.

                  

मृत्युपत्र (नमुना)

★मी खाली सही करणार –

नाव: ×××

राहणार: ×××

पूर्ण पत्ता: ×××

व्यवसाय: ×××

मोबाईल क्रमांक: ×××

वय:××× वर्षे 

★प्रास्ताविक: या भागात घराण्याचा इतिहास, आपल्या जडण जडणघडणीत /अडीअडचणीत मदत करणाऱ्या/ भविष्यात मार्गदर्शन होईल अशा व्यक्तींचा थोडक्यात कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा. असे न करताही मृत्युपत्र बनवता येईल.

★माझ्या पश्चात माझ्या संपत्तीचे वाटप विनातंटाबखेडा व सुलभरितीने व्हावे या हेतूने स्वखुशीने व संतुलित मानसिक अवस्थेत असताना माझ्या वाट्यास आलेल्या वंशपरंपरागत मालमत्तेचे / स्वकष्टार्जित मिळकतीचे मी स्वतःच्या इच्छेने खालीलप्रमाणे मृत्युपत्र (Will) करून ठेवीत आहे.

★मालमत्ता निर्मितीचे मार्ग: माझी सर्व मालमत्ता मला माझ्या वाट्यास आलेल्या वडिलोपार्जित मिळकतील भाग,माझ्या नोकरीच्या / व्यवसायाच्या उत्पन्नातून निर्माण झालेली आहे, पगार /मानधन / व्यवसायातील नफा/ गुंतवणुकीतून मिळणारे व्याज, लाभांश, भांडवली नफा, मिळणारे घरभाडे हे माझ्या उत्पन्नाचे साधन आहे या सर्व स्वकष्टार्जित आणि वारसाहक्काने माझ्या वाट्यास आलेल्या मालमत्तेची माझ्या मनाप्रमाणे विल्हेवाट करण्यास पूर्ण मुखत्यार आहे.

★मृत्यूपत्रातील लाभधिकारी:

माझे कुटुंबातील खालील व्यक्ती या मृत्यूपत्राचे लाभाधिकारी आहेत.

पत्नी: नाव ×××

व्यवसाय; ×××

वय: ×××

पत्ता ×××

मोठा मुलगा / मुलगी: नाव ×××

वय ×××

व्यवसाय ×××

पत्ता ×××

त्याच्या जोडीदारविषयी माहिती

त्यांच्या अपत्यांची माहिती

मुलगा/ मुलगी: नाव ×××

वय ×××

व्यवसाय ×××

त्याच्या जोडीदाराची माहिती

त्याच्या अपत्यांची माहिती

मुलगा/ मुलगी: ×××

याच्या सह/ शिवाय अन्य कुणा व्यक्तीस/ संस्थेस किंवा स्वतंत्रपणे निर्माण केलेल्या कौटुंबिक ज्ञासास मालमत्तेतील सर्व अथवा काही भाग द्यायचा असल्यास त्यांचा पूर्ण तपशील द्यावा त्याचप्रमाणे असे करण्याचे पटेल असे कारण त्याची शक्यतो कोणास वाईट वाटणार नाही अशा पद्धतीने मांडणी करून सांगावे  किंवा कोणतेही कारण न देताही असे लिहू शकता.

★माझी स्थावर जंगम मिळकत खालीलप्रमाणे:

स्थावर मालमत्ता

1)राहत्या जागेचा तपशील घर/ फ्लॅट

2)शेतजमीन/ फार्महाऊस संपूर्ण तपशील 

3)पडीक जमीन तपशिलासह

4)अन्य घर/ फ्लॅट लीजने दिले असल्यास त्याचा तपशील

5)गोडाऊन/ ऑफिस/ व्यापारी गाळा याचा तपशील.

6)अन्य स्थावर मालमत्ता

जंगम मालमत्ता 

1. बँक/पतपेढी खाती तपशीलवार माहिती

*बँकेचे नाव

शाखा 

खाते प्रकार

खातेक्रमांक 

IFSC 

विशिष्ट दिवशी  शिल्लख असलेली रक्कम

अन्य तपशील

सहधारक

नॉमिनी

अन्य बँका पतपेढी यातील खात्याची वरील पद्धतीने माहिती.

यातील कोणती खाती कशासाठी प्रामुख्याने वापरली जातात याचीही माहिती द्यावी.

2 शेअर्स: 

★ब्रोकिंग फार्मचे नाव,पत्ता, ट्रेडिंग कोड

★डिपॉजीटरी / डिपॉजिटरी पार्टीसीपंटचे नाव, खाते क्र

विशिष्ठ दिवशी खात्यात असलेल्या शेअर/ बॉण्ड/ इनवीट/ रिटस/ इटीएफ यासारख्या मालमत्तेचा तपशील, बाजारमूल्य.

याचप्रकारचे अन्य खाते असल्यास त्याचा तपशील

3.मुदत ठेवी

बँक/  पतपेढी/ कंपनी येथील मुदत ठेवींचा संपूर्ण तपशील

शाखेचे नाव

खाते क्रमांक/FDR No

Amt 

मुदतपूर्ती दिनांक

या सर्व गुंतवणुकीत त्याच्या व्यवहार्यतेनुसार तपशिलात बदल होऊ शकतो. याचा वर्षातून एकदा आढावा घेऊन 31 मार्च अखेरीस असलेला तपशील माझ्या वैयक्तिक डायरीत वेगळा लिहून ठेवीन. 

4 सोने इतर मौल्यवान वस्तू:

तपशील प्रकार, वजन, वस्तू कायम वापरात आहे की लॉकरमध्ये

यातील तपशिलात फरक पडण्याची शक्यता आहे/ नाही तरीही 31 मार्च रोजी आढावा घेऊन लिहून ठेवीन.

5.अन्य गुंतवणूक त्याच्या तपशिलासह

*पोस्टाच्या योजना (NSC, MIS, TD, SSY इ)

*वरिष्ठ नागरिक योजना (SCSS)

*प्रधानमंत्री वयवंदना योजना (PMVVY)

*सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी योजना (PPF)

*विमा संलग्न बचत योजना (ELSS)

*खाजगी गुंतवणूक, अन्य योजना

*राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS)

*उधार म्हणून दिलेले पैसे 

*म्युच्युअल फंड योजना डी मॅट खाते वगळून

योजनांची नावे

फोलिओ क्र

युनिट संख्या

बाजारमूल्य

*क्रेप्टो करन्सी मधील गुंतवणूक तपशील

*कमोडिटी करन्सी यातील गुंतवणूक तपशील

*या उल्लेख नसलेल्या अन्य योजनांचा तपशील

भविष्यातील गरजा, गुंतवणूक प्राधान्य आणि कर नियोजनयानुसार आवश्यक बदल करून वर्षांतून त्यांचा आढावा घेऊन नोंद ठेवली जाईल. त्यामुळे जंगम मालमत्ता तपशिलात फरक पडेल यातील काही गोष्टी वगळण्यात येतील तर काही नव्याने केल्या जातील. 

★या सर्व माझ्या नावावर अस्तीत्वात असलेल्या निर्माण होणाऱ्या सर्व स्थावर जंगम मालमत्ता माझ्या पश्चात 

माझी पत्नी (नाव)××× यांना मिळाव्यात 

दुर्दैवाने ती नसल्यास मुलगा/मुलगी (नाव) ××× आणि मुलगा/मुलगी (नाव) ××× यांना सम / विषम प्रमाणात

मिळाव्यात

अथवा याशिवाय अन्य व्यक्ती / संस्था (नाव) ××× याना संपूर्ण अथवा काही प्रमाणात मिळाव्या.

यात लाभार्थींचा उल्लेख त्यांना मिळू शकणाऱ्या लाभासह / लाभशिवाय कारणासह करावा. सदर लाभार्थीनी आपल्या मर्जीनुसार त्याचा उपभोग घ्यावा.

★श्री. नाव ××× पत्ता ×××याना या मृत्युपत्राचे व्यवस्थापक म्हणून नेमले असून त्यांनी आणि / अथवा मृत्यूपत्राचे लाभार्थी म्हणजेच (त्यांची नावे) यांनी अथवा त्यांच्या वारसांनी यात व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचे संपूर्ण अधिकार मी त्यांना देत आहे.

★मी यापूर्वी मृत्यूपत्र केलेले नाही/ किंवा मी यापूर्वी ×××या तारखेस केलेले मृत्युपत्र रद्द करीत आहे सबब सदरचे मृत्युपत्र हे अखेरचे मृत्युपत्र समजण्यात यावे. 

मृत्युपत्र धारकाची सही

पूर्ण नाव ×××

स्थळ ×××

दिनांक ×××

आमचे देखत श्री (नाव) ×××यांनी त्यांच्या मृत्युपत्रावर सही केली असून त्यांचे देखत आम्ही साक्षीदार म्हणून 

1(नाव) ×××

आणि

 2(नाव) ×××

आमच्या  सह्या केल्या आहेत.

साक्षीदार 1.×××

सही

राहणार ×××

साक्षीदार 2.×××

सही

राहणार ×××

          

याप्रमाणे आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपले मृत्युपत्र बनवून यातील जाणकार आणि वकील यांचे त्यावरील मत घ्यावे. कायद्याने आवश्यक नसले तरी डॉ कडून वैद्यकीय  प्रमाणपत्र घ्यावे, नोंदणी करावी. याची प्रत नोंदणी अधिकारी/ व्यवस्थापक/ ट्रस्टी कंपनी  यांच्याकडे अथवा स्वताकडे सुरक्षित ठेवावे मृत्यूपत्र हा महत्वाचा दस्त असून ते तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करणे केव्हाही चांगले!(संपूर्ण)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.