गृहकर्जाबद्दलचे गैरसमज भाग ४

Reading Time: < 1 minute

गृहकर्जाबद्दलचे गैरसमज भाग १

गृहकर्जाबद्दलचे गैरसमज भाग २

गृहकर्जाबद्दलचे गैरसमज भाग ३


१६. प्री-क्वालिफाईड ऑफर्स म्हणजेच होम लोनला मंजुरी :

प्री-क्वालिफाईड, प्री-अप्रूव्हल, इन्स्टंट-अप्रूव्हल किंवा प्री-अप्रूव्हड ऑफर्स तुम्हाला होम लोन मिळण्याची हमी देत नाहीत. होम लोन मंजूर करण्याआधी सगळ्या बँका तुमच्या क्रेडिट स्कोअरसकट सगळ्या कागदपत्रांची योग्यता पडताळून पाहून त्यांचं मूल्यांकन करतात. त्यामुळे ह्या ऑफर्स म्हणजे केवळ तर्क असं म्हणायला हरकत नाही.

१७. सगळी होम लोन्स सारखीच :

तुमच्या गरजांना अनुरूप अशा होम लोन प्रॉडक्ट्सच्या बाजारात झुंडीच्या झुंडी उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या गरजेप्रमाणेच होम लोन निवडा.

१८. मालमत्तेच्या मालकाचा लाइफ इन्शुरन्स किंवा होम लोन प्रोटेक्शन  प्लॅन अनिवार्य आहे :

होम लोन देणार्‍या काही कंपन्या किंवा बँका तुम्हाला लाइफ इन्शुरन्स किंवा होम लोन प्रोटेक्शन प्लॅन विकण्याचा प्रयत्न करतात. ही चुकीची पद्धत आहे. होम लोन घेण्यासाठी तुम्ही असा कुठलाही प्लॅन किंवा अशी कुठलीही पॉलिसी खरेदी करण्याची आवश्यकता नाही. 

१९. प्रॉपर्टी इन्शुरन्स अनिवार्य आहे :

होम लोन घेताना प्रॉपर्टी इन्शुरन्स घेणं अनिवार्य नाही. पण काही कंपन्या त्यांच्या अटी आणि शर्ती यांमधून तो अनिवार्य करू शकतात. साधारणपणे, होम लोन घेताना तुमचं घर किंवा प्रॉपर्टी सुरक्षित करणं हे ऐच्छिक आहे.

२०. शक्य असलं तर होम लोनची रक्कम आगाऊ भरून टाका :

होम लोन लवकरात लवकर भरून टाकणं ही हुशारी नव्हे. होम लोनचे अनेक फायदे आहेत. इन्कम टॅक्स आणि प्रॉपर्टीच्या किमतीतली वाढ हे त्यापैकीच काही फायदे.


गृहकर्जाबद्दलचे गैरसमज भाग १

गृहकर्जाबद्दलचे गैरसमज भाग २

गृहकर्जाबद्दलचे गैरसमज भाग ३

गृहकर्जाची प्राथमिक पात्रता व निकष

कर्ज घेताना आवर्जून लक्षात ठेवायच्या ५ गोष्टी

(चित्र सौजन्य- https://goo.gl/psSFq6)

Leave a Reply

Your email address will not be published.