Reading Time: 3 minutes

गृहकर्जाबद्दलचे गैरसमज भाग १

गृहकर्जाबद्दलचे गैरसमज भाग २

गृहकर्जाबद्दलचे गैरसमज भाग ३

गृहकर्जाबद्दलचे गैरसमज भाग ४


२१. रीफायनान्सिंग हे महागात पडतं :

तुम्ही जर कमी ईएमआय, जास्त लोनची रक्कम किंवा चांगले व्याजदर यांच्या शोधात असाल तर खुशाल तुमचं आत्ताचं होम लोन रीफायनान्स किंवा ट्रान्सफर करा; कारण रिझर्व्ह बँकेने इक्झिट फी, प्रीपेमेंट पेनल्टी आणि फोरक्लोजर चार्जेस आता रद्द केले आहेत.

होम लोन ही एक दीर्घकालीन बांधिलकी किंवा जबाबदारी आहे. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या गैरसमजुतींमध्ये अडकून पडू नका. आवश्यक ती मेहनत घेऊन योग्य होम लोन निवडा. होम लोनच्या बाबतीत लोकांच्या मनात आणखी कोणते गैरसमज आहेत ते पाहू या.

२२. प्रॉपर्टी ईझेस फायनान्स इश्यूजमधल्या तुमच्या योगदानासाठी वैयक्तिक लोन घेणं :

अ. होम लोन घेण्यापेक्षा वैयक्तिक लोन घेणं सोपं असल्यामुळे काही जण  प्रॉपर्टी घेताना हातभार लागावा यासाठी वैयक्तिक लोन घेतात. पण शॉर्टकट नेहमीच योग्य असतो असं नाही असं म्हणतातच. लोक हे विसरतात की वैयक्तिक लोन्ससाठी सध्या व्याजाचा दर १४ टक्क्यांवर स्थिर आहे आणि त्याच्यासाठी कालावधीही कमी आहे. परिणामी, ईएमआयची रक्कम जास्त बसते आणि सगळं सोपं होण्याऐवजी त्या ईएमआयचं ओझंच होतं.

ब. राज्यातल्या प्रमुख बँकांकडे यासाठी इतर प्रॉडक्ट्सही आहेत आणि ह्या बँका अशा परिस्थितीत लोकांना वाचवतात. एखादी व्यक्ती आपली दुसरी एखादी प्रॉपर्टी तारण ठेवून किंवा नवीन प्रॉपर्टीवर ११.५% व्याजदरावर जास्त कालावधीसाठी लोन घेऊ शकते. एखाद्या केसमध्ये जर व्यक्ती आधीच एखादे होम लोन फेडत असेल, तर ती व्यक्ती दुसर्‍या बँकेत बॅलन्स ट्रान्सफर करू शकते. ती बँक त्या व्यक्तीला होम लोन रेटवर टॉप-अपची ऑफर देऊ शकते. (जसं की २० लाखांसाठी १०.५%)

क. मार्केटमध्ये नुकत्याच झालेल्या चढउतारांमुळे घरगुती खर्चाबरोबरच लोकांच्या भविष्यातील आर्थिक आराखड्यांमध्येही उलथापालथ झाली. अशा परिस्थितीत आम्ही आमच्या ग्राहकांना कोणतंही फायनान्शियल प्रॉडक्ट, खास करून होमलोन घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला सांगतो. होम लोनच्या बाबतीत गुंतवणुकीचा आकडा मोठा असतो आणि पैसे फेडण्यात हलगर्जीपणा झाला तर त्याचा त्या व्यक्तीच्या आर्थिक स्वास्थ्यावर चिरकाळ टिकणारा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, जसं आपण आपलं स्वप्नातलं घर खरेदी करण्याआधी शहरातल्या सगळ्या प्रॉपर्टींचा अभ्यास, त्यांचं संशोधन करतो आणि मगच उत्कृष्ट प्रॉपर्टी खरेदी करतो, तसंच होम लोनच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन घेण्याची आणि ते नीट समजून घेण्याची हीच वेळ आहे.

२३. लोन फेडायचे राहिले असलेली प्रॉपर्टी कोणाला विकायची असेल, तर आधी त्याला त्या प्रॉपर्टीवरचं सगळं लोन फेडून बँकेकडून एनओसी घेणं आवश्यक आहे :

हासुद्धा एक सगळ्यात मोठा गैरसमज आहे. सेक्टरमधल्या ???? बर्‍याचशा बँकांनी आता अशी प्रॉडक्ट्स तयार केली आहेत, जी ग्राहकांच्या गरजा भागवू शकतात. व्हेन्डर टेकओव्हर हे ह्याचं उत्तम उदाहरण आहे, ज्यात विक्री होणार्‍या मालमत्तेवरचं कर्ज फिटलेलं नसतं. स्वाभाविकपणे, विक्री करण्यार्‍याला वाटतं की त्याने मालकी हक्क देण्याआधी तारण असलेली मालमत्ता सोडवून घेणं आवश्यक आहे. पण हे अर्धवट सत्य आहे. प्रॉपर्टी विकणारा स्वत:चं लोन बंद करून, प्रॉपर्टी विकत घेणार्‍याने ज्याच्याकडून लोन घेतले आहे, त्याच्या मदतीने प्रक्रिया पूर्ण करू शकतो. अशा परिस्थितीत, प्रॉपर्टी विकत घेणार्‍याने ज्याच्याकडून लोन घेतले आहे तो, प्रॉपर्टी विकणार्‍याला तारण सोडवण्यात मदत करतो.

२४. जर माझ्याकडे घराच्या किंमतीच्या किमान २०% रक्कम नसेल, तर मी ते घर घेऊ शकत नाही; कारण मला कोणीही लोन देणार नाही :

बँकिंग क्षेत्रात सध्या जी चढाओढ दिसते, त्याचा परिणाम म्हणून ग्राहकाला उपयुक्त ठरणारी अनेक प्रॉडक्ट्स बँकांनी काढलेली दिसतात. ग्राहकांना सामोरं जावं लागणार्‍या वेगवेगळ्या त्रासांना ध्यानात घेऊन ही सगळी प्रॉडक्ट्स तयार केली गेली आहेत. ग्राहकांना ज्यात रस आहे अशा गोष्टींची ते काळजी घेतात, जपतात. समजा, लोन घेणार्‍याकडे प्रॉपर्टीच्या किमतीच्या २०% रक्कम नसेल, तरीही तो लोन घेऊ शकतो, ज्यामध्ये तो आपली दुसरी एखादी प्रॉपर्टी तारण ठेऊ शकतो किंवा तो फेडू शकत नसलेल्या कर्जासाठी नवीन लोन घेऊ शकतो. तथापि, बांधकाम चालू असलेल्या प्रॉपर्टीच्या बाबतीत ती व्यक्ती पैशांची एखादी समांतर व्यवस्था करण्याची निवड करू शकते, ज्यात डाऊन पेमेंट १०-१५% इतकं कमी असू शकतं आणि उरलेली रक्कम बांधकामाच्या स्थितीशी जोडता येते. अशा वेळी लोन घेणारा आणि देणारा, दोघेही तसतसे पैसे भरत जातात जसजशी बांधकामात प्रगती होत जाते आणि बिल्डरकडून मागणी होते. हे गुणोत्तर ८०:२० असे राहते. काही बँका असंही प्रॉडक्ट तयार करून देतात जिथे १०:८०:१० अशी पेमेंटची पद्धत शक्य असते. ह्याचा अर्थ असा होतो की खरेदीदाराचा सहभाग खरेदीच्या वेळी केवळ १०% असतो आणि उअरलेले १०% प्रॉपर्टीचा ताबा घेतेवेळी देतो. अशा रीतीने सुरुवातीलाच २०% रक्कम त्याला भरावी लागत नाही.

२५. होम लोन घेताना जर मी माझी जास्त किमतीची प्रॉपर्टी तारण ठेवत असेन, तर मला माझ्या उत्पन्नाची कागदपत्रं देण्याची आवश्यकता नाही.

लोन फेडण्याची क्षमता आणि फेडण्याची इच्छा ह्या दोन अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्यांच्या आधारे बँक एखाद्याला लोन द्यायला तयार होते. तुमचं उत्पन्न दाखवणारी कागदपत्रं आणि तुमच्या असेट्स आणि आर्थिक जबाबदार्‍या  यांच्यामुळे तुमच्या लोन फेडण्याच्या इच्छेचा अंदाज येतो. यासाठी एखाद्या व्यक्तीची जुनी रेकॉर्ड्सही तपासली जातात. स्वयंरोजगारी व्यक्तीच्या बाबतीत ??? . त्यामुळे तारण ठेवल्या जाणार्‍या प्रॉपर्टीची किंमत ही लोन मंजूर करण्याआधी आवश्यक असलेल्या गोष्टींपैकी एक मानलीच जात नाही. म्हणून प्रॉपर्टीची किंमत किती आहे याची पर्वा न करता, प्रत्येक व्यक्तीला बँकेने मागितलेली कागदपत्रं जमा करणं आवश्यक आहे. तरच लोन मंजूर होऊ शकतं.

(चित्र सौजन्य- https://goo.gl/FfL66b )

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…