insurance policy
credit – economic times
Reading Time: 3 minutes

Insurance policy : आजच्या काळातील ६ सर्वात महत्वाच्या विमा पॉलिसी

जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्येच्या सामना करण्यासाठी तुम्हाला आर्थिक दृष्ट्या तयारीत असणे गरजेचे असते. तुमची आर्थिक परिस्थिती आज उत्तम असली तरीदेखील एखाद्या अनपेक्षित घटनेमुळे आर्थिक परिस्थिती बिघडण्याची शक्यता असते. अशामध्ये आणीबाणीच्या संकटावेळी आपल्या परिवाराची आर्थिक बाजू भक्कम असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे विमा पॉलिसी असेल तर तुम्ही टेन्शन फ्री राहू शकता, कोणत्याही अनपेक्षित येणाऱ्या संकटामध्ये विमा पॉलिसी मुळे तुम्हाला आर्थिक मदत मिळते.  आज कोरोनाच्या काळात विमा पॉलिसी असणे किती महत्वाचे आहे हे सर्वांच्याच लक्षात आले आहे.

खाली दिलेल्या ६ विमा पॉलिसी तुमच्याकडे असणे महत्वाचे ठरेल:

  1. टर्म इन्शुरन्स –  कुटुंबातल्या कमावत्या व्यक्तीचा अकाली मृत्यु झाला तर परिवारावर खूप मोठ आर्थिक संकट येऊ शकते.त्यामुळे कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेणे खूप महत्त्वाचे ठरते. जेवढ्या रक्कमेचा टर्म इन्शुरन्स काढला जातो तेवढी रक्कम विमा धारकाच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या नॉमिनीला मिळते. त्यामुळे घरातल्या कमावत्या व्यक्ती नंतर कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत नाही. त्यामुळे आपल्यानंतर कुटुंबातील व्यक्तींच्या भविष्यासाठी टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेणे खूप फायदेशीर आहे. टर्म इन्शुरन्स वयाच्या जितक्या  लवकर काढाल तेवढाच तुम्हाला कमी प्रीमियम भरता येतो. 

हेही वाचा – जीवन विमा आणि आरोग्य विमा यामधील मूलभूत फरक…

लक्षात ठेवा  टर्म इन्शुरन्स नेहमी तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या साधारण २० पट जास्त असावा.

  • आरोग्य विमा – आरोग्य विमा असणे आज काळाची गरज बनलेली आहे. अगदी किरकोळ आजार किंवा छोटासा अपघात झाला तरी त्याचा खर्च भरपूर येतो, वाढत्या महागाईमुळे वैद्यकीय सेवा आणि रुग्णालयांचा खर्च महाग होत चालला आहे.आरोग्य विम्यामुळे हाच खर्च कमी होतो. जेवढ्या रक्कमेचा आरोग्य विमा असतो त्या पॉलिसीच्या अनुषंगाने वैद्यकीय खर्चात मदत मिळते. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचा आरोग्य विमा काढणे महत्वाचे आहे. तुमच्या कुटुंबासाठी किंवा मुलांसाठी जेवढ्या लवकर तुम्ही पॉलिसी घ्याल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होतो.
  • मोटार विमा – आपल्या गाडीला काही नुकसान होऊ नये याची खबरदारी प्रत्येक जण घेत असतो. परंतु अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ती या गोष्टी काही सांगून घडत नाहीत त्यामुळे आर्थिक नुकसानाचा फटका तुम्हाला बसू शकतो पण जर तुम्ही मोटार विमा काढला असेल तर आर्थिक नुकसानाची भरपाई विमा पॉलिसी प्रदान करते.
  • वैयक्तिक अपघात – अकाली अपघाती मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक संकटापासून वाचवण्यासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. या योजनेमध्ये  फक्त १२ रुपयांचा वार्षिक प्रीमियम भरून २ लाख रुपयांची मदत मिळते. विमाधारकाचा अकाली मृत्यु झाला तर त्याच्या पश्चात त्याच्या नॉमिनीला २ लाख रुपयांपर्यंतची मदत मिळते किंवा विमाधारकाच्या अपघाता दरम्यान त्याचे दोन्ही हात, डोळे,पाय या अवयवांचे कायमस्वरूपी नुकसान झाले तर २ लाख रुपयांपर्यंतची मदत त्या व्यक्तीला मिळते.
  • गृह विमा – आजच्या काळात स्वतःचे घर असणे गरजेचे आहे, घर हे प्रत्येकासाठी त्यांचे सुरक्षित ठिकाण असते परंतु घराला काही नुकसान झाले तर  आर्थिक नुकसानाला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते म्हणूनच होम इन्शुरन्स काढणे महत्वाचे आहे. आग,घरफोडी, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या गोष्टीमुळे घराला काही नुकसान झाले तर तुम्ही काढलेल्या गृह विमा अंतर्गत तुम्हाला आर्थिक मदत मिळते.जास्त कालावधीची पॉलिसी निवडणे फायदेशीर आहे.

हेही वाचा – Health Insurance Policy: आरोग्य विम्याच्या सहाय्याने हॉस्पिटल खर्च वाचवण्यासाठी ८ महत्वाच्या टिप्स…

  • सायबर विमा – इंटरनेट आपल्या सर्वांच्या जीवनातील महत्त्वाचा घटक बनले आहे सकाळी उठल्यापासून आपण इंटरनेट सोबत जोडले जातो. पेमेंट करण्यासाठी, ऑनलाईन खरेदीसाठी, ऑनलाइन ब्लॉग्स किंवा लेख वाचण्यासाठी, सोशल मीडिया साठी इंटरनेटचा वापर  सर्रास होत आहे.  एवढा सगळा डेटा ऑनलाइन  असल्याने सायबर गुन्हे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सायबर गुन्ह्यांमुळे तुमचे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते त्यामुळेच गुन्ह्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी सायबर विमा हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकेल.आर्थिक संरक्षण देणारा विमा निवडून होणारे नुकसान तुम्ही टाळू शकता.

परंतु लक्षात ठेवा विमा पॉलिसी घेताना त्याची पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे इन्शुरन्स पॉलिसी मध्ये अनेक प्रकार असतात वेगवेगळ्या किंमती वैशिष्ट्ये, विविध फायदे असतात त्यामुळे कोणती इन्शुरन्स  पॉलिसी ही तुमच्यासाठी व तुमच्या कुटुंबासाठी योग्य आहे हे तपासून इन्शुरन्स पॉलिसी ची निवड केली पाहिजे. योग्य इन्शुरन्स पॉलिसी आपत्कालीन परस्थितीमध्ये तुमचे तुमच्या परिवाराचे आर्थिक संरक्षण करते. त्यामुळे लवकरात लवकर इन्शुरन्स पॉलिसी मध्ये गुंतवणूक करून स्वतःचे व कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करा.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.