SHARE MARKET
SHARE MARKET IN MARATHI
Reading Time: 3 minutes

5 Biggest Wealth destroyers :  ‘या’ ५ शेअर्सपासून तुम्ही काय शिकाल ? 

शेअर बाजारात गेल्या काही वर्षात चांगली स्थिती दिसून आली आहे, गेल्या पाच वर्षांमध्ये BSE सेन्सेक्स १७% CAGR दराने वाढल्याने गुंतवणूकदारांना ११०% पेक्षा जास्त रिटर्न्स मिळाले आहेत.

परंतु याच काळामध्ये काही शेअर्स ९५% पेक्षा जास्त प्रमाणात घसरले आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे काही सोप्पे नाही. यामध्ये फायदयाबरोबरच नुकसानीचा धोका देखील असतो. जर तुम्ही जास्त कर्ज, व्यवस्थापनाच्या समस्या असलेल्या किंवा कमकुवत आर्थिक स्थिती असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला नुकसानीचा धोका जास्त असतो. आजच्या लेखात आपण मागील पाच वर्षात ज्या शेअर्समध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे ते बघूया:

१) रिलायन्स कॅपिटल – 

 • रिलायन्स कॅपिटल कंपनी वेल्थ डिस्ट्रॉयर या यादीमध्ये पहिला नंबर वर आहे. एक काळ असा होता की रिलायन्स कॅपिटल कंपनी मार्केटमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय होती परंतु सप्टेंबर २०१८ मध्ये IL&FS अचानक कोसळल्यानंतर मात्र रिलायन्स कॅपिटलच्या अडचणींना सुरुवात झाली. मार्च २०१९ पासून ते सप्टेंबर २०१९ पर्यंत कंपनीचे क्रेडिट रेटिंग प्रत्येक महिन्याला कमी होत गेले.
 • तसेच या कंपनीमध्ये इतर अनेक समस्या देखील निर्माण होत गेल्या,२०१८ मध्ये रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीत गेले.
 • अनिल अंबानी यांनी त्यांच्या रिलायन्स समूहाच्या कंपन्यांसाठी प्रचंड कर्ज घेतले होते. रिलायन्स समुहाच्या कंपन्या एकामागून एक लॉस मध्ये जाऊ लागल्या आणि शेवट अपयशी ठरली ती म्हणजे रिलायन्स कॅपिटल. रिलायन्स कॅपिटल कर्ज फेडू शकले नाही त्यामुळे दिवाळखोरीत दाखल झाली.

 

हेही वाचा – Stock Market Portfolio : शेअर बाजारात उत्तम पोर्टफोलिओ ‘कसा’ बनवाल ?…

२) येस बँक – 

 • येस बँक हे नाव या यादीत पाहायला मिळणे हे सर्वांना अपेक्षितच असायला हवे.
 • येस बँकेची संपत्ती मागील पाच वर्षांमध्ये जवळजवळ ९४% कमी झालेली आहे. येस बँकेचे कर्ज वाढत गेले बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता देखील खराब होऊन ती आरबीआय च्या स्कॅनर खाली आली तसेच येस बँकेला अनेक गव्हर्नन्स समस्यांच्या देखील सामना करावा लागला. 
 • त्यामुळे येस बँकेचे जास्त प्रमाणत नुकसान झाले व पर्यायाने येस बँकेचा शेअर गुंतवणूकदारांसाठी जास्त नुकसानीचा ठरला.

३) SREI इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स- 

 • IL&FS नुकसानीत गेल्यामुळे २०१८ मध्ये SREI इन्फ्रा सारख्या कंपनीवर संकट निर्माण झाले.
 • कोविडमुळे कंपनीला भरपूर तोटा झाला होता. इन्फ्रा प्रकल्प ठप्प झाले व त्यामुळे कर्जदारांचे प्रकल्प देखील रखडले. 
 • आरबीआयने ऑडिट करून SREI समूहाद्वारे खूप मोठी रक्कम बुडीत कर्ज असल्याची शक्यता दाखवल्याने कंपनीचे शेअरचे भाव पडले आणि गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.

हेही वाचा – असेट अलोकेशन – शेयर बाजाराच्या उतार चढावावर मात करा….

४) रिलायन्स कम्युनिकेशन- 

 • रिलायन्स कमुनिकेशन या अनिल अंबानी समूहाच्या आणखी एका कंपनीमध्ये गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. 
 • रिलायन्स जिओ येण्यापूर्वी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) कंपनी दूरसंचार क्षेत्रात लोकप्रिय होती. इतर ऑपरेटर जेव्हा इन्कमिंग कॉल साठी ₹ ४-६ प्रति मिनिट शुल्क आकारत होते तेव्हा आर कॉम ने रु. ५०० मध्ये हँडसेट सह विनामूल्य कॉल्स ऑफर केले होते. अनिल अंबानी यांनी प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ६०% स्वस्त किंमत आकारून वापरकर्त्यांना आकर्षित केले होते. नंतर मात्र कंपनीला जी एस एम सेवा सुरू करण्यासाठी भरपूर गुंतवणूक करावी लागली त्यासाठी कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावे लागले. 
 • नंतर सतत होणाऱ्या तोट्यामुळे आणि घटत्या व्यवसायामुळे कंपनीला कर्ज कमी करता आले नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये कंपनीच्या शेअर्स ८५% पेक्षा जास्त खाली आले होते.

५) सद्भाव इंजिनिअरिंग  – 

 • सद्भाव इंजिनिअरिंग लिमिटेड (SEL) ही पायाभूत सुविधा उभी करणारी  कंपनी आहे . महामार्ग, पुल, खाणकाम इत्यादी प्रकल्प या कंपनीद्वारे राबवले जातात.
 • जानेवारी २०१८ मध्ये कंपनीचे शेअर्स रुपये ४०० पेक्षा जास्त किमतीला विकले जात होते आणि आता हे शेअर्स रुपये ५० पेक्षा कमी किमतीला आले आहेत. यामुळे कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना  ८५% पेक्षा जास्त रकमेचे नुकसान झाले आहे. 
 • कंपनीने यावर्षी रु. १.५ अब्ज इतका तोटा नोंदवला आहे. त्यामुळे कंपनी शक्य तितक्या मार्गांनी निधी गोळा करून टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा – असेट अलोकेशन – शेयर बाजाराच्या उतार चढावावर मात करा…

लक्षात ठेवा ! फक्त एखाद्या कंपनीच्या शेअर्सची किंमत कमी झाली म्हणून लगेच तो शेअर खरेदी करणे टाळा. असे केल्यास तुम्हाला अनेकदा नुकसान होऊ शकते. शेअर्सची निवड करणे आणि चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे यासाठी नेहेमी अभ्यास करा व मगच निर्णय घ्या !

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…