term insurance plan
term insurance plan
Reading Time: 3 minutes

मुदत विमा योजनेसाठी योग्य कालावधी किती असावा?

 • आपल्या कुटुंबाच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचा विचार करता मुदत विमा योजना खरेदी करण्याचा निर्णय हा नक्कीच  फायदेशीर आहे. कोणतीही घटना काही सांगून घडत नसल्यामुळे त्या अनपेक्षित घटनेचा परिणाम तुमच्या कुटुंबाच्या भविष्यातील आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. 
 • मुदत विमा योजनेमध्ये पॉलिसीधारकाच्या अकाली मृत्यू नंतर विमा कंपनी पॉलिसी धारकाच्या कुटुंबाला विम्याची रक्कम प्रदान करते. जेणेकरून पॉलिसी धारकाच्या कुटुंबाला आर्थिक अडचणी भासत नाही व यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक कर्ज पूर्ण करण्यास मदत मिळते. 
 • परवडणारा प्रीमियम व जास्त फायदे यामुळे मुदत विमा योजनेला ग्राहक पसंती देतात.
 • कोणतीही व्यक्ती जी १८ ते ६५ वर्षे वयोगटामध्ये येते ती टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यास पात्र आहे. जेवढ्या कमी वयामध्ये टर्म इन्शुरन्स खरेदी केला जातो तेवढा जास्त फायदा असतो.
 • परंतु मुदत विमा योजना खरेदी करताना अनेक ग्राहकांना मुदत विमा योजनेचा कालावधी निवडणे थोडे अवघड जाते. मुदत विमा योजनेसाठी किती कालावधीची निवड करावी हा प्रश्न अनेकदा ग्राहकांना गोंधळात टाकतो. मुदत विमा योजनेचा कालावधी ठरविण्यासाठी काही मुख्य घटक विचारात घेणे गरजेचे असते.

हेही वाचा – Term Insurance : टर्म  इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी ‘ही’ घ्या काळजी…

मुदत विमा योजनेचा कालावधी निवडताना विचारात घ्यावे असे प्रमुख घटक:

१) पॉलिसीधारकाचे वय – 

 • मुदत विमा योजनेमध्ये पॉलिसी कालावधी निवडण्यासाठी पॉलिसी धारकाचे वय हा महत्त्वाचा घटक आहे.पॉलिसी कालावधी निवडताना पॉलिसीधारकाचे वय विचारात घेऊन कालावधी निवडणे महत्त्वाचे ठरते. 
 • पॉलिसी खरेदी करताना पॉलिसीधारकाचे वय जेवढे कमी असते तेवढा जास्त पॉलिसी कालावधी निवडणे उपयुक्त ठरू शकते.
 • उदाहरणार्थ: मुदत विमा योजना खरेदी करताना पॉलिसीधारकाचे वय २० ते २५ वर्षे दरम्यान असेल तर त्यांना जास्तीत जास्त कालावधीची निवड करणे गरजेचे असते. जेणेकरून  पॉलिसी धारकाच्या सेवानिवृत्ती पर्यंत विमा संरक्षण प्राप्त होते. परंतु मुदत विमा योजना खरेदी करताना पॉलिसी धारकाचे वय ४० ते ५० वर्षे दरम्यान असेल तर सेवानिवृत्ती पर्यंत विमा संरक्षणासाठी कमी कालावधीची निवड करता येते.

२) कुटुंबातील सदस्यांची संख्या – 

 • पॉलिसीधारक जर कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती असेल व कुटुंबातील सदस्य म्हणजे जोडीदार, मुले, पालक आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे पॉलिसीधारकावर अवलंबून असतील तर पॉलिसी धारकाच्या अनपेक्षित मृत्युनंतर कुटुंबाला मिळणारे आर्थिक विमा संरक्षण भविष्यात त्यांना पुरेसे असायला हवे.
 • त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी त्यांना पुरेसे विमा संरक्षण मिळावे म्हणून पॉलिसी कालावधीची निवड करताना पॉलिसी धारकाने कुटुंबातील सदस्य संख्येचा विचार करणे गरजेचे आहे.

हेही वाचा – Term Vs. Personal Accident Insurance : मुदत विमा व वैयक्तिक अपघात विमा यांमधील फरक काय?…

३) आर्थिक जबाबदाऱ्या – 

 • मुदत विमा योजनेसाठी पॉलिसी कालावधीची निवड करताना पॉलिसी धारकाने जर काही कर्ज घेतले असेल व कर्जाची परतफेड बाकी असेल तर या गोष्टींचाही विचार करणे गरजेचे आहे.
 • उदाहरणार्थ: जर पॉलिसी धारकाने होम लोन किंवा कार लोन घेतले असेल याची परतफेड बाकी असेल तर कर्ज रकमेचा विचार करून पॉलिसी कालावधीची निवड करावी, विम्याची रक्कम ही कर्जाच्या रक्कमेएवढीच असावी व मुदत विमा संरक्षण योजनेचा कालावधी कर्ज परतफेड कालावधी पेक्षा मोठा असावा. यामुळे पोलिसी धारकाचा अनपेक्षित मृत्यू झाल्यास त्याच्यानंतर कुटुंबाला कर्ज फेडण्यास मदत होऊ शकते.

४) आर्थिक उद्दिष्टे – 

 • मुदत विमा योजनेबरोबरच पॉलिसी धारकाची काही महत्वाची आर्थिक उद्दिष्ट देखील असतात. घर विकत घेणे असो किंवा  कार विकत घेणे असो याव्यतिरिक्त मुलांचे उच्च शिक्षण, परदेशवारी यांसारखी आर्थिक उद्दिष्ट देखील पूर्ण करणे पॉलिसीधारकासाठी तितकेच महत्त्वाचे असते. 
 • यांसारख्या आर्थिक उद्दिष्टांचा विचार करून मुदत विमा योजनेचा कालावधी निवडणे महत्त्वाचे आहे जेणेकरून मुदत विमा योजनेचा आर्थिक उद्दिष्टांवर परिणाम होणार नाही.

५) परवडणारा प्रीमियम – 

 • मुदत विमा योजनेचा कालावधी निवडण्यासाठी विचारात घेतला जाणारा आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे मुदत विमा योजनेची प्रीमियम रक्कम. 
 • मुदत विमा योजनेमध्ये जेवढा कमी कालावधी तेवढा जास्त प्रीमियम रक्कम व जितका जास्त कालावधी तेवढी कमी प्रीमियम रक्कम असते. यामुळे मुदत विमा योजनेच्या प्रीमियमचा आर्थिक नियोजनावर काही परिणाम होणार नाही ना या गोष्टीचा विचार करणे महत्त्वाचे असते. अर्थातच हे पॉलिसी धारकाने कोणत्या प्रीमियम पेमेंट पर्यायाची निवड केली आहे यावर देखील अवलंबून असते.

हेही वाचा – Insurance Riders: विमा पॉलिसीमध्ये अतिरिक्त कव्हरेज देणारे “रायडर” तुम्हाला माहिती आहेत का?…

मुदत विमा योजनेमध्ये पॉलिसी कालावधी निवडताना वर दिलेल्या महत्त्वाच्या घटकांचा विचार करून कालावधी निवडणे फायदेशीर ठरते.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…