Undervalued stock
Undervalued stock
Reading Time: 2 minutes

Undervalued stock indicators

स्कॅम १९९२हर्षद मेहता ही वेब सिरीज आली आणि भारतात डिमॅट खाते उघडण्याचा ओघ वाढतच गेला. शेअर मार्केट हा असा समुद्र आहे ज्यामधून संपूर्ण भारतातील आर्थिक स्थिती बदलू शकते असं सिरीजमध्ये दाखवण्यात आलं. त्यानंतर बऱ्याच नव तरुणांनी शेअर बाजारात एन्ट्री केली. कंपन्यांचे शेअर्स (समभाग) विकत घ्यायचे आणि जास्त किंमतीमध्ये विकायचे असं साधारणतः सुरु असतं. हे करत असताना कंपन्यांबद्दल अभ्यासही करावा लागतो. अन्यथा काही वेळेस आपल्याला तोट्यातही जावे लागू शकते. आपल्या आसपास असणारे कित्येक जण हे कोणाचे तरी ऐकून शेअर्स घेताना आपण पाहिलं असेल. हे अत्यंत धोकादायक आहे. जर समोरच्याचा शेअर्स बाबतीत अभ्यास नसेल तर तुम्हाला चांगलाच आर्थिक फटका बसू शकतो. ज्यांना शेअर्स मार्केटचा अनुभव आहे त्यांना कंपनीचे फंडामेंटल्स (मूलभूत माहितीमाहिती असतात. त्यानुसार ते शेअर्सची खरेदी विक्री करून नफा मिळव  तात. आपण घेत असणारा शेअर हा खरंच फायदा देणारा आहे किंवा तोटा देणारा हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यावरूनच आपण दीर्घकाळ शेअर बाजारात टिकू शकतो.

 

हेही वाचा – Share Market Basics: सर्वसामान्य भारतीयांनी शेअर बाजारात गुंतवणूक करावी का?

 

शेअर ‘ओव्हरव्हॅल्यू’ आहे की ‘अंडरव्हॅल्यू’  हे ओळखण्यासाठी खाली दिलेल्या  ‘सूचना’ नक्की वाचा 

PE रेशो (Low Price/Earnings (P/E) ratio) चेक करा

अंडरव्हॅल्यू शेअर बघण्यासाठी कोणत्याही कंपनीचा PE रेशो हा सर्वात पहिले चेक करावाPE रेशो म्हणजे कंपनीने १२ महिन्यांच्या कालावधीमध्ये कंपनीने प्रती शेअर मागे कमविल्या जाणार्‍या नफ्याची तुलना सद्य किंमतीबरोबर केली जातेPE रेशो कमी असल्यास कंपनीचा शेअर आपल्याला स्वस्त मिळत आहे असं समजावं. जर हा रेशो जास्त असेल तर शेअर आपल्याला महाग मिळत आहे असं समजावं.  

 

ज्या कंपनीवर कर्ज कमी आहे (stock having a very low cost of debt)

अंडरव्हॅल्यू शेअर बघण्यासाठी  आपण कंपनीचा कर्जाचा टक्का देखील पाहायला हवा. ज्या कंपनीवर कर्ज कमी असते त्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. कमी कर्ज असणाऱ्या कंपन्यांचा तीन महिन्यांचा कार्यकालीन नफा पाहून आपण गुंतवणूक केल्यास निश्चित आपल्याला फायदा होतो. एखाद्या स्क्रिनर ऍपमध्ये जाऊन आपण कंपनीचे कर्ज आणि QUATERLY RESULTS (तीन महिन्यांचा नफा किंवा तोटापाहू शकतो.

हेही वाचा –  Concept of Share Market: शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे? मग हे नक्की वाचा

Dividend Yield (कंपनीकडून नफ्याच्या स्वरूपात एका स्टॉकमागे मिळणारी रक्कम)

दरवर्षी डिव्हिडंड(नफा) देणाऱ्या कंपन्या प्रत्येक गुंतवणूकदाराला आवडत असतात. विशेषतः सरकारी चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा (रिटर्न्स) मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे. सरकारी कंपन्या आणि उद्योग जगतातील मोठ्या कंपन्याचे स्टॉक हे बऱ्याचदा अंडरव्हॅल्यू असतात. त्यांची किंमत बाजारातील स्थितीनुसारच असते. ते दरवर्षी चांगला परतावा (Dividend) देखील देतात. त्यामुळे अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करणे निश्चितपणे फायदेशीर ठरते.

 

 कंपनीचा बुक रेशो (Book ratio / book value)

कंपनीची बाजारपेठीतील खरी किंमत असते ती म्हणजे बुक व्हॅल्यू (book value). जर समजा एखाद्या कंपनीला नुकसान झाले आणि ती बंद पडली तर गुंतवणूकदार रस्त्यावर येऊ शकतात. अशा वेळेस कंपनीची जी काही बुक व्हॅल्यू आहे त्यानुसार सेबी(SEBI) आपल्याला कंपनी बुडाली तरीही पैसे परत करते. अंडरव्हॅल्यू शेअरची बुक व्हॅल्यू ही शेअर्सच्या किंमतीच्या जवळपास किंवा त्याहूनही जास्त असते. अशा प्रकारचे शेअर्स हे आपल्याला कमी सापडतात, मात्र जर सापडले तर ते आपल्याला दीर्घकालीन फायदा देण्याची ताकद ठेवतात. शेअर बाजारात अंडरव्हॅल्यू शेअर शोधण्यासाठी आपणही कंपनीची बुक व्हॅल्यू पाहू शकतो.

 

कंपन्यांचा खेळत्या भांडवलाचे असणारे गुणोत्तर Current Ratio of a stock

अंडरव्हॅल्यू शेअर बघण्यासाठी कंपनीचा खेळत्या भांडवलाचे गुणोत्तर (Current Ratio) बघणे देखील फायदेशीर असते. कंपनीचा करंट रेशो नेमका किती असावा याबद्दल गुंतवणूकदारांमध्ये गैरसमज बघायला मिळतो. कंपनीचा करंट रेशो हा १.२५ असल्यास तो फायदेशीर मानला जातो. .७५ ते २.२५ असा रेशो असल्यास गुंतवणूक करताना आपण बाकीच्याही बाबींचा विचार करावा.

हेही वाचा – Share Market Investment: शेअर बाजारात गुंतवणुकीचे वास्तव आणि मृगजळ

टीप : अंडरव्हॅल्यू शेअर बघण्यासाठी आपण https://www.screener.in/dash/, https://chartink.com/ यांसारख्या वेबसाईट्स वापरू शकता. शेअर बाजारात गुंतवणूक करताना कंपन्यांचे रेशो आणि कंपनीचे फंडामेंटल्स पाहूनच त्यामध्ये गुंतवणूक करावी.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…