Health insurance
Health insurance
Reading Time: 2 minutes

Third-Party Administrator (TPA)

आरोग्य विम्यामध्ये TPA म्हणजे काय? 

TPA ची भूमिका काय आहे?

आजच्या काळात आरोग्य विमा असणे किती महत्वाचे आहे हे काही वेगळे सांगायला नको. वैद्यकीय आणीबाणीमध्ये आरोग्य विमा नसल्यास कदाचित आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. परंतु आरोग्य विमा असल्यामुळे वैद्यकीय आपात्कालीन परिस्थितीमध्ये  आर्थिक ताण जाणवत नाही.

आरोग्य विमा खरेदी करताना TPA म्हणजे काय? हा प्रश्न भरपूर जणांना असतो. आरोग्य विमा खरेदी केल्यानंतर पॉलिसी धारकास TPA संबंधित सर्व माहिती असणे आवश्यक असते.TPA म्हणजे काय?TPA ची भूमिका काय आहे? ही माहिती जाणून घेणे पॉलिसी धारकास महत्वाचे असते.

हेही वाचा – Smoking affects health insurance premium : तुम्ही सिगारेट ओढत असाल तर विम्याबाबत ‘हे’ नक्की वाचा

TPA म्हणजे काय? 

TPA म्हणजे थर्ड ‌पार्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेटर ही एका प्रकारची संस्था आहे जी पॉलिसी धारक व विमा कंपनी यांच्यामधील दुवा म्हणून काम करते. आरोग्य विमा अंतर्गत दावा प्रक्रिया हाताळण्याचे काम TPA करते. TPA हे IRDA द्वारे परवानाकृत असतात.

  • आरोग्य विमा कंपनी द्वारे TPA ची निवड केली जाते. आरोग्य विमा अंतर्गत दावा प्रक्रिये मध्ये पॉलिसी धारकास TPA शी संपर्क साधावा लागतो. 
  • TPA कॅशलेस  हॉस्पिटलायजेशन  किंवा प्रतिपूर्ती हॉस्पिटलायजेशन  दावा यासाठी मान्यता देते.
  • पॉलिसी धारकाचे दस्ताऐवज तसेच  हॉस्पिटलच्या पावत्या तपासणे ही कामे TPA द्वारे केली जाते त्यामुळे दावा प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होते.

आरोग्य विम्या अंतर्गत TPA ची भूमिका काय आहे?

१) कनेक्टिंग लिंक – 

आरोग्य विमा अंतर्गत हॉस्पिटलायजेशन दाव्या  मध्ये  TPA विमा कंपनी व पॉलिसी धारक यांमध्ये कनेक्टिंग लिंक म्हणून काम करते. हॉस्पिटलायजेशन दाव्या बाबतीत पॉलिसी धारकास TPA शी संपर्क साधावा लागतो. TPA पॉलिसी धारकास युनिक आयडेंटिफिकेशन नंबर व ओळख पत्र प्रदान करते. ज्यामुळे पॉलिसी धारकास संपूर्ण दावा प्रक्रियेत मदत मिळते.

२) क्लेम सेटलमेंट- 

क्लेम सेटलमेंट मध्ये TPA ची महत्वपूर्ण कामगिरी असते. पॉलिसी धारकाने दाव्या संबंधित विमा कंपनीस माहिती दिल्यानंतर दावा पूर्ण करण्याची जबाबदारी TPA ची असते. पॉलिसी धारकाने कागदपत्रे सबमिट केल्यानंतर त्याची व्यवस्थित पडताळणी करणे तसेच पॉलिसी धारकाकडून आवश्यक माहिती घेणे हे काम TPA करते. कॅशलेस हॉस्पिटलायजेशन दाव्या अंतर्गत रुग्णालयाकडून आवश्यक कागदपत्रे घेणे व प्रतिपूर्ती हॉस्पिटलायजेशन दावा प्रकरणी पॉलिसी धारकाकडून कागदपत्रे घेणे ही TPA ची जबाबदारी असते. 

हेही वाचा – Health insurance premiums : आरोग्य विमा पॉलिसीचे महागडे हप्ते टाळण्यासाठी ‘हे’ वाचा

 

३) रेकॉर्ड ठेवणे- 

पॉलिसी धारक हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्याशी निगडीत सर्व महत्वपूर्ण नोंदणी डेटाबेस मध्ये ठेवण्याचे काम TPA करते.

४) २४×७ हेल्पलाइन सुविधा-

पॉलिसी धारकांच्या सुविधेसाठी त्यांच्या शंका व समस्या निराकरणासाठी साठी अनेक TPA २४×७ सेवा उपलबध करतात.

५) अतिरिक्त सेवा – 

 अनेक TPA पॉलिसी धारकांसाठी औषध, रुग्णवाहिका व्यवस्था इत्यादी अनेक अतिरिक्त वैद्यकीय सेवा देखील पुरवतात.

 

हेही वाचा – Health Insurance Review: आरोग्य विम्याचे पुनरावलोकन करणे आवश्यक असते का?

 

आरोग्य विम्या मध्ये TPA चे पॉलिसी धारकांसाठी असणारे फायदे :

आरोग्य विम्या अंतर्गत संपूर्ण दावा प्रक्रियेत TPA पॉलिसी धारकास मदत करते. TPA आरोग्य विम्या मध्ये पॉलिसी धारक व विमा कंपनी यांमधील दुवा म्हणून काम करते. हॉस्पिटलायझेशनच्या काळात पॉलिसी धारकास TPA कडून सतत समर्थन मिळते.पॉलिसी धारकास ओळखपत्र देणे,हॉस्पिटलचा खर्च रुग्णाचा दस्ताऐवज  यामधील सत्यता तपासणे ही कामे TPA करते जेणेकरून दावाप्रक्रिया सुलभ होते.यामुळे दावा प्रक्रियेमध्ये TPA पॉलिसी धारकांसाठी फायदेशीर आहे. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…