concept of share market
Reading Time: 3 minutes

Concept of Share Market 

शेअर बाजार म्हणजे नक्की काय (Concept of Share Market), त्याचं काम कसं चालतं, आयपीओ, शेअर्स खरेदी-विक्रीचे नियम, याबद्दल अनेक लोक अनभिज्ञ आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक तर करायची आहे, पण बाजाराबद्दल काहीच माहिती नाही, अशी अनेकांची अवस्था आहे. आजच्या लेखात आपण याच विषयाबद्दल मूलभूत माहिती घेऊया. 

Concept of Share Market: शेअर बाजार म्हणजे काय ?

कंपनी किंवा व्यवसाय चालू करण्यासाठी सर्वात जास्त आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे भांडवल. हे भांडवल मिळवण्यासाठी कंपनीच्या मालकी हक्काचे छोटे भाग करून त्याची विक्री करण्यात येते. या समभागाला ‘शेअर्स ‘ असं म्हणतात.   समभागांची विक्री किंवा खरेदीचे व्यवहार म्हणजे ‘ट्रेडिंग’ तर हे व्यवहार ज्या ठिकाणी होतात ती जागा म्हणजे ‘शेअर बाजार’. 

महत्वाचा लेख: शेअर बाजार: ये रिस्क, रिस्क है रिस्क, रिस्क!

भारतीय शेअर बाजारचा इतिहास 

 • भारतात १८७५ साली मुंबईत पहिला शेअर बाजार (BSE) स्थापन झाला.  हा आशियातील सर्वात जुना शेअर बाजार आहे. 
 • १८९४ मध्ये कापड मिलच्या ट्रेडिंगसाठी अहमदाबाद शेअर एक्सचेंजची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर  १९०८मध्ये कलकत्ता स्टॉक एक्सचेंज, तर १९२० साली मद्रास स्टॉक एक्सचेंज सुरू करण्यात आला. 
 • हळूहळू याचा विस्तार वाढत गेला व २४ वेगवेगळे स्टॉक एक्सचेंज एकत्रित करून १९९३ साली नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) स्थापन करण्यात आला व त्याद्वारे शेअर बाजारातील सर्व व्यवहार कार्यान्वित झाले. 

संबंधित लेख: BSE vs NSE- काय फरक आहे बीएसई आणि एनएसई मध्ये?

शेअर बाजाराची कार्यपद्धती : 

 • शेअर बाजारात सहभागी असणाऱ्या कंपन्या, व्यवहार करणारे दलाल, व्यापारी व इतर गुंतवणूकदार बाजाराच्या माध्यमातून शेअर्स किंवा समभागांचे खरेदी – विक्रीचे व्यवहार करतात. 
 • प्रथमतः बाजारात येणाऱ्या कंपन्या कर्ज घेण्यापेक्षा आयपीओच्या माध्यमातून समभाग विक्री करून भांडवल जमा करतात आणि या भांडवलाचा उपयोग व्यवसाय वृद्धीसाठी करतात. 
 • ज्या व्यक्ती अशा कंपन्याचे शेअर्स खरेदी करतात, ते त्या कंपन्यांचे भागीदार बनतात. जर कंपनीला नफा झाला तर तो नफा शेअर्स धारकांना लाभांश स्वरूपात वाटला जातो. 
 • कंपनीचा नफा व व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढत राहिला, तर त्याच्या शेअर्सची किंमत व मागणी वाढत जाते. शेअरची किंमत  शेअरच्या मागणीवरून ठरते. मागणी वाढल्यावर शेअर्सच्या किमतीत वाढ होते.
 • एकाच वेळी हजारे गुंतवणूकदारांशी व्यवहार करणे शक्य नसल्याने ट्रेडिंगचा परवाना असलेल्या व्यक्तीला म्हणजेच स्टॉक ब्रोकर किंवा काही दलाली संस्थांना शेअर्सची खरेदी-विक्री करण्याची परवानगी दिली जाते.
 • ब्रोकर किंवा दलाली संस्था या शेअर बाजार आणि गुंतवणूकदार यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करतात. खरेदी विक्रीच्या व्यवहारांवर ब्रोकर्स काही माफक शल्क आकारतात, ते गुंतवणूकदारांना द्यावे लागते. 

हे नक्की वाचा: शेअर बाजार जोखीम:  काही गैरसमज

Share Market Investment: शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी? 

१. गुंतवणूक कधी आणि कुठे  –

 • गुंतवणूकीसाठी शेअर बाजारामध्ये अनेक प्रकारच्या कंपन्यांचे शेअर्स उपलब्ध असतात. पण प्रत्येक गुंतवणूकदाराने आपली आर्थिक उद्दिष्ट्ये, जोखीम क्षमता आणि आर्थिक मर्यादा ओळखून किती गुंतवणूक करायची, हे ठरवायला हवे.
 • उदाहरणार्थ, तुम्हाला नुकतीच नोकरी लागली आहे आणि तुमचा मासिक पगार रूपये २५,००० एवढा आहे. त्यात घरभाडे रु. १०,००० आणि उर्वरित खर्च ५,००० होत असेल. राहिलेले १०,००० रूपये गुंतवणूकीसाठी शिल्लक राहतात. अशावेळी उरलेल्या पगारातील काही पैसे तुम्ही कमी जोखमीच्या पर्यायात गुंतवू शकता.
 • शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीबाबतीत असणारी जोखीम ओळखून निर्णय घ्यावे फार महत्वाचे आहे. 

२. गुंतवणूकीची योजना –

 • गुंतवणूकीचे निर्णय घेताना बाजाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. शेअर्सच्या किंमतीत होणारे चढ-उतार समजून घेऊन त्यानुसार गुंतवणूकीचे धोरण ठरवा. 
 • गुंतवणूक किती व कधी करायची हे ठरल्यावर की योग्य समभागांची निवड करा.
 • उदा. तुमचं बजेट रु. १००० असेल, तर तुम्ही एक लार्ज-कॅप किंवा काही स्मॉल-कॅप समभाग खरेदी करू शकता. जास्त नफा मिळवण्यासाठी उच्च-लाभांश समभागांची निवड करा.  
 • तुम्ही गुंतवणूक केलेल्या कंपनीची बाजारातील स्थिती जाणून घ्या. कदाचित कंपनीची बाजारातील पत कमी होऊ शकते. अशावेळी नुकसान टाळण्यासाठी कंपनीच्या कामकाजावर देखरेख असणे आवश्यक आहे. 
 • कंपनीत होणारे विलिनीकरण किंवा अधिग्रहण तसेच वरिष्ठ व्यवस्थापकांची नियुक्ती किंवा राजीनामा यांची माहिती घ्या. कंपनीचे नवीन नियम जाणून घ्या व त्याचा अभ्यास करा. 

विशेष लेख: शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक

३. योग्य वेळ ओळखा –

 • शेअर बाजारामध्ये सर्वात महत्वाची असते ती वेळ! आज सर्वात खाली असणारे शेअर्स उद्या कदाचित उच्च स्थानावर देखील दिसतील. त्यामुळे गुंतवणूक करताना अर्धवट माहितीवर, उत्साहाच्या भरात निर्णय घेऊ नका. खरेदी -विक्री करताना नेहमी बाजाराचा आढावा घ्या.
 • काहीवेळा गुंतवणूक करताना पुरेसे शेतीस न मिळणे, बाजार घसरणे अशा अडचणी येतात. अशावेळी योग्य वेळेची वाट पाहणे सोयीस्कर ठरते. 

४. पोर्टफोलिओ –

 • शेअर बाजार ही गतिमान गोष्ट आहे. काही कंपन्या क्षणात फायदेशीर वाटू शकतात, तर दुसऱ्या क्षणाला त्या बाजारामध्ये घसरलेल्या दिसतात. अनपेक्षित येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी आपल्या गुंतवणूकीच्या प्रोफाईलमध्ये (इन्व्हेस्टमेंट प्रोफाईल) किंवा पोर्टफोलिओमध्ये बदल करणे आवश्यक असते. 
 • नवीन गुंतवणूकदारांनी स्टॉकची घसरलेली किंमत पाहून घाबरून न जाता आपली गुंतवणूक नफा मिळवण्याच्या उद्देशाने वळवावी. 
 • शेअर बाजारातील अस्थिरतेवर मात करण्यासाठी पोर्टफोलिओचे परिक्षण करणे व नवीनतम बदल करणे आवश्यक आहे. 

शेअर बाजार” हा गुंतवणुकीचा थोडासा धाडसी पर्याय आहे.  शेअर बाजारात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर, पुरेशी माहिती व अभ्यास असणं आवश्यक आहे. जगातील यशस्वी गुंतवणूकदारांमधील अग्रगण्य नाव म्हणजे “वॉरन बफे” ज्यांनी शेअर बाजाराच्या जोरावर अफाट संपत्ती जमवली. अर्थात यामध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक आवश्यक आहे म्हणूनच शेअर बाजारात गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Concept of Share Market  Marathi Mahiti,  Share market Investment for beginners Marathi Mahiti, How to invest in Share market Marathi Mahiti, History of share Market Marathi Mahiti, Concept of Share Market in Marathi, share Market Concept Marathi Mahiti

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…