Arthasakshar Aarogya Setu app & privacy
Reading Time: 2 minutes

आरोग्य सेतू : तुमच्या माहितीची गोपनीयता

“आरोग्य सेतू” या प्लिकेशनचे जसे अनेक फायदे आहेत तसे काही तोटेही समोर येत आहेत. विशेषकरून या प्लिकेशनद्वारे घेतल्या जाणाऱ्या वैयक्तिक माहितीच्या वापराबद्दल जेव्हा काही दिवसांपूर्वी काही तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केला तेव्हा ११ मे २०२०, सोमवारी, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रिकल अँड इन्फॉर्मशन टेकनॉलॉजी MeiTY) या प्लिकेशनद्वारे मिळालेल्या माहितीचा वापर करण्याविषयीचे काही शिष्टाचाराचे नियम घालून दिले आहेत. याआधी यासंदर्भातील या ॲप्लिकेशनची ‘गोपनीयता’ (Privacy Policy) हा एकच मार्ग या माहितीच्या सुरक्षेबाबतीत होता. 

आरोग्य सेतू ॲप: फायदे व वापराची पद्धत…

कोणत्या प्रकारची माहिती ॲप्लिकेशनच्या माध्यमातून घेण्यात येईल?

  • मुख्यत्वे ‘आरोग्य सेतू’ च्या माध्यमातून मिळालेली माहिती ४ भागांमध्ये विभागली जाऊ शकेल –
    • वैयक्तिक माहिती – नाव, व्यवसाय, लिंग इत्यादी,  
    • संपर्क – कोण कोण तुमच्या संपर्कात आले, किती वेळ एकत्र घालवला आणि एकमेकांमध्ये किती अंतर होते, 
    • संपर्क क्षेत्रासंदर्भातील माहिती म्हणजे तुम्ही कोणकोणत्या भागात, किती किती वेळ घालवला याची भौगोलिक माहिती.
    • स्व-तपासणीची माहिती 

गोपनीयता – तुमची माहिती कोण कोण आणि कोणकोणत्या कारणांसाठी वापरू शकतात आणि केव्हा?

  • आरोग्य सेतू प्लिकेशनच्या माध्यमातून आलेली माहिती जास्तीत जास्त १८० दिवस साठवून ठेवता येऊ शकेल. 
  • सद्य परिस्थितीत कोरोना बाधित नसलेल्या व्यक्तींची माहिती ४५ दिवस राहील आणि कोरोना झालेल्या व्यक्तीची माहिती ९० दिवस राहील. 
  • ही सर्व माहिती MeiTY , ज्यांनी हे अँप्लिकेशन बनवले आहे, त्यांच्याकडे साठवली जाईल. 
  • ही माहिती मेईटी – NIC  (नॅशनल इनफॉरमॅटिकस सेंटर) – आरोग्य मंत्रालय, राज्यस्तरीय / विभागस्तरीय / स्थानिक सरकारी आरोग्य खाते, राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्था अधिकारी, राज्य व केंद्र स्तरीय इतर मंत्रालये, आणि इतर राज्यस्तरीय/विभागीय/स्थानिक सरकारी सामाजिक आरोग्य संस्था ठराविक आरोग्य हितकारक कारणांसाठीच वापरू शकतील. 

जन धन, आधार कार्डची अपरिहार्यता ‘कोरोना’ संकटात सिद्ध…

पुढील संशोधनासाठी होणार उपयोग:

  • पुढील संशोधनाच्या उद्देशाने यातील काही माहिती काही नोंदणीकृत भारतीय विद्यापीठांना व संशोधन केंद्रांना तज्ज्ञांच्या परवानगीने देता येईल. 
  • या प्लिकेशनच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या वापराबद्दल ‘आरोग्य सेतू डेटा ऍक्सेस अँड नॉलेज शेअरिंग प्रोटोकॉल, २०२०’ च्या अंतर्गत केलेला हा कायदा सहा महिन्यांपर्यंत अमलांत आणला जाईल. 
  • आरोग्य सेतू ॲपद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग हा फक्त COVID-१९ संदर्भातील माहितीसाठीच केला जाईल.
  • या प्लिकेशनद्वारे मिळालेली कोरोना झालेल्यांविषयीची माहिती विशेष गरजेची आहे. जेणे करून ते कुठे गेले होते, कोणाकोणाच्या संपर्कात आले होते, किती वेळासाठी संपर्कात आले होते हे समजणे आणि त्यानुसार लवकरात लवकर उपचार करणे शक्य होईल. 

NIC द्वारे मिळवलेली वैयक्तिक माहिती जोपर्यंत हा शिष्टाचार अस्तित्वात असेपर्यंत अथवा त्या व्यक्तीने तशी विनंती केली असल्यास अथवा ३० दिवसांपर्यंत यापैकी जो सर्वात कमी कालावधी असेल त्यानुसार त्यानंतर नष्ट करता येईल.

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web search:aarogya setu app safe ahe ka? marathi, Is aarogya setu app safe in marathi
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutes मृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.  

मर्यादित भागीदारी संस्था: नियम व वैशिष्ट्ये

Reading Time: 3 minutes व्यवसायाचे कर्ज व देणी वसूल करण्यासाठी भागीदाराच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता असते. मर्यादित भागीदारी व्यवसायामुळे हे प्रश्न सुटू शकतात. डॉक्टर्स, सनदी लेखापाल, वास्तुविशारद, वकील, तांत्रिक सल्लागार, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार यांना आपल्या ज्ञानाचा आणि सहकाऱ्याच्या ज्ञानाचा उपयोग करून मर्यादित भागीदारीमुळे (LLP) आपला व्यवसाय वाढवता येऊ शकेल. अशा प्रकारे मर्यादित भागीदारी असलेली भागीदारी स्थापन करता येणे सोपे आणि कमी खर्चाचे आहे.

लाभांश (Dividend) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes कंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes)  समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.

सर्व नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वीच का आहे?

Reading Time: 3 minutes सरकारने रद्द केलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या १०० टक्के नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वी झाली, कारण त्यावर आता कर भरला गेला आणि आता ती एका जागी पडलेली रक्कम बँकेत येवून प्रवाही झाली. नोटबंदीपूर्वीची वाढ ही “रोगट सूज” होती, ती जाऊन देश सशक्त होतो आहे आणि दमदार वाटचालीला सज्ज होतो आहे, हे आता अधिक महत्वाचे !