महिला उद्योजक
आपल्याकडे दंतकथांमध्ये अनेक मिथकं आणि कहाण्या ऐकायला मिळतात. यातील बहुतांश कथा या ‘वाईटावर चांगल्याचा विजय’ सांगणाऱ्या असतात. त्यामुळे या कथा चांगलेपणा आणि सकारात्मकतेला प्रोत्साहन देतात. समजाला एकत्र आणतात. पण सर्वच मिथके चांगली नसतात. काहींना विशिष्ट नकारात्मक किनार असते. यामुळे मागे खेचण्याची क्रिया घडते. असंच काहीसं सहन करत असतात महिला उद्योजक! आज आपण महिला उद्योजकांबद्दल समाजामध्ये असणाऱ्या व त्यांना मागे खेचणाऱ्या मिथकांबद्दल माहिती घेऊया.
महिला उद्योजक: महिलांबद्दलची ३ मिथकं
१. महिला उत्तम बॉस होऊ शकत नाहीत:
- महिला बॉससोबत काम केलेले असंख्य लोक तुम्हाला सांगतील की हे फक्त आणि फक्त मिथकच आहे. फक्त एवढेच नाही तर, प्रोत्साहन, वाटाघाटी, संकट व्यवस्थापन यासारख्या आघाड्यांवरही त्या पुरुष समकक्षांपेक्षा अधिक सरस ठरतात, असे अनेक अहवालांतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे महिला उत्तम बॉस होऊ शकतात, हे यातून दिसून येते.
- याचबरोबर बॉसना भावनिक चातुर्याची गरज असते आणि स्त्रिया या क्षेत्रात उत्तम काम करू शकतात, हे लपून राहिलेले नाही.
- या भावनिक चातुर्याद्वारे महिला फक्त ऑफिसमध्येच प्रभावीपणे काम करू शकतात असे नाही, तर शेअर बाजारातही हे दिसून येते.
- तिथे, बाजारात अस्थिरता असताना त्यांचा इक्यू त्यांना विवेकपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतो. त्यामुळे यापुढे तुम्ही महिला बॉससोबत काम करणार असल्याचे कळले तर तर तुम्ही चांगल्या कामाच्या वातावरणात प्रवेश करणार आहात, हे लक्षात घ्या.
२. महिला स्वत:ची कंपनी सुरु अथवा चालवू शकत नाहीत:
- महिलांमध्ये उद्योजकता वाढत आहे, मात्र महिला स्वत:ची कंपनी सुरु करण्यास असमर्थ असतात, हे मिथक आहे. त्यांना यशाच्या मार्गाने कंपनी चालवण्याची संधी तर द्या, महिलांनी आतापर्यंत अनेक कंपन्या स्थापन करून त्यात त्या अग्रेसर राहिल्या आहेत, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.
- महिलांच्या नेतृत्वात कंपन्यांनी मिळवेलेले यश हे त्यांच्या आयुष्यभराच्या अनुभवावरून दिसून येते.
- महिलांनी इथवर केलेल्या प्रवासामुळे, त्या सहजपणे ग्राहकांचा दृष्टीकोन आणि त्यांच्या गरजा ५० टक्के ओळखू शकतात. याद्वारे त्या पुरुष समकक्षांपेक्षा अनेक पैलूंनी उद्योग चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात तसेच त्याचे विश्लेषणही करू शकतात.
३. पैशांच्या हिशोबात महिला कमकुवत असतात:
- यातही फार तथ्य नाही, हे तुम्ही ओळखलेच असेल. आई, आजी, काकू किंवा पत्नी यांच्या स्वरुपात आपण प्रत्येकानेच आयुष्यातील महिलांचा अनुभव घेतला आहे. अत्यंत सहजतेने आणि कौशल्याने त्या घरातील आर्थिक बाजू सांभाळतात.
- याआधीच्या पिढ्यांमधील गृहिणीदेखील कोणतेही औपचारिक शिक्षण नसताना किंवा योग्य कामाचा अनुभव नसताना त्या घरातील पैशांचे व्यवस्थापन करण्यात तरबेज होत्या.
महिला मूळातच पैशांबाबत योग्य असतात, याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचा स्वभाव सावधपणाचा असतो. यामुळे त्या अतार्किक जोखीम घेत नाहीत. घरासोबतच, शेअर बाजारातही त्यांचा हा स्वभाव सक्रिय असतो, जिथे हिशोबशीर जोखीम घेणे (आवेगाने निर्णय न घेणे), ही यशाची मुख्य गुरुकिल्ली असते.
श्री. प्रभाकर तिवारी
सीएमओ,
एंजल ब्रोकिंग लिमिटेड
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies