उत्सव कर्ज
Reading Time: 4 minutes

उत्सव कर्ज

उत्सव कर्ज ही संकल्पना खऱ्या अर्थाने लोकप्रिय केली ती इ-कॉमर्स वेबसाइट्सनी. ग्रेट इंडिया सेल, फेस्टिव्ह सिझन सेल, नवरात्री विशेष सेल, दसरा – दिवाळी धमाका, इ. कितीतरी आकर्षक नावांनी वर्षभर या वेबसाईट्सवर सेल चालूच असतात. आकर्षक ‘कॅशबॅक ऑफर’ सोबतच ‘इंटरेस्ट फ्री ईएमआय’ सारखे पर्याय देऊन ग्राहकांना आकर्षित केले  जाते. या शर्यतीत शो रूम्स व रिटेल दुकानदार मागे कसे राहतील? त्यांनीही सणावारांना अशा ‘खास ऑफर्स’ द्यायला सुरुवात केली. पण हे उत्सव  कर्ज (festival loan) खरंच फायद्याचं असतं का? यामागची वस्तुस्थिती नेमकी काय आहे?

भारत हा काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत विविध संस्कृतींनी नटलेला देश. इथे प्रत्येक धर्माचे लोक आपापल्या रिवाजाप्रमाणे सणवार साजरे करतात. कोणी मिठाई देऊन तर, कोणी काही भेटवस्तू देऊन सणाचा आनंद लुटतात. जसा ऑगस्ट महिना किंवा श्रावणाची चाहूल लागते, तसे एकामागून एक सणवार चालू होतात. सणवार म्हटलं की खरेदी आली. 

सणासुदीच्या दिवसात नवनवीन कपडे, दागिने, मिठाई, फुले तर मोठ्या खरेदीसाठी कर्जाची मागणी सुद्धा जास्त केली जाते. म्हणूच या उत्सव हंगामात बँकांची रस्सीखेच चालूच असते. गणेशोत्सव, अक्षय तृतीया, दसरा -दिवाळी, पुन्हा येणारा नाताळ अशा महत्त्वाच्या उत्सवादरम्यान ग्राहकांच लक्ष वेधण्यासाठी अधिकाधिक आकर्षक ऑफर्स घेऊन बँका बाजारात उतरतात आणि कर्जाचा “सेल”लावतात.  

उत्सव कर्ज- 

 • उत्सव कर्ज किंवा “फेस्टिवल लोन” म्हणजे विशिष्ट वैयक्तिक कर्ज जे निरनिराळ्या सणासुदीच्या दिवसात विविध आकर्षक ऑफर्स सोबत उपलब्ध असते. हे कर्ज कमी प्रकिया खर्च असूनही जलद गतीने मंजूर केले जाते. मात्र वैयक्तिक कर्ज आणि यामध्ये काही फरक आहेत, या उत्सवाच्या काळात कर्ज म्हणून मर्यादित रक्कमच मिळू शकते. 
 • वैयक्तिक कर्जापेक्षा ही रक्कम खूपच कमी असते. सामान्यतः त्याची रक्कम रु. ५०,०००/- किंवा महिन्याच्या पगारापेक्षा चार पटीने जास्त असते. शिवाय या कर्जाचा परतफेडीचा कार्यकाल ही फार नसतो, बहुतेक एक वर्षापर्यंतची वेळ दिली जाते. 
 • कर्ज वेळेआधीच भरण्याचे ठरविल्यास मात्र कुठलाही दंड आकारला जात नाही. परंतु कुठल्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी काही छुप्या नियम व अटी नाहीत ना, हे व्यवस्थित पाहणे गरजेचे असते. 
 • कधी कधी गॅ़झेट्स किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीवर शून्य व्याजदराची सवलत दिली जाते, अशावेळी परतफेडीच्या वे़ळी जास्तीच्या रकमेचा समावेश आहे का, याची खातरजमा करूनच खरेदीचा निर्णय घ्यावा. 

महत्वपूर्ण लेख: वैयक्तिक कर्जाची गरज आणि प्रक्रिया

उत्सव कर्ज – फायदे 

१. शुन्य प्रक्रिया शुल्क  व शून्य व्याजदर:-

 • जर तुम्ही वैयक्तिक कारणासाठी किंवा कार घेण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, अशा ठिकाणी कर्जप्रकिया पूर्ण होईपर्यंत कागदपत्रांचा व इतर खर्च जास्त होतो, अशा वेळी ही ऑफर किंवा सवलत कामी येते. 
 • व्याज घेतलेच नाही तर सावकारी तरी चालणार कशी? बँकांकडून सुद्धा अशा ऑफर्स दिल्या जात नाहीत, म्हणजे वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज किंवा कारलोन वगैरे कर्जांवर या ऑफर्स लागू होत नाहीत. परंतु याचा फायदा ऑनलाइन खरेदी केलेल्या गोष्टींसाठी लागू होतो. मोठ्या बँकांशी भागीदारी करून काही ई-कॉमर्स कंपन्या ही ऑफर्स देऊ करतात, पण परतफेड करताना मात्र त्यासोबत प्रकिया खर्च, व इतर काही कर ही द्यावे लागतात. 

२. कॅशबॅक:-

 • सध्या प्रत्येकजण खरेदीसाठी ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय निवडतो. कॅशबॅक या शब्दाचा वापर अशा ठिकाणीच जास्त होतो. ई-कॉमर्स कंपन्या, बँका, एनबीएफसी या क्षेत्रांमध्ये कॅशबॅकची सवलत मिळू शकते. 
 • आपल्याला आवडत असलेला स्मार्टफोन खरेदी करताना त्यावर मिळणारी १०℅ कॅशबॅकची ऑफर आकर्षित करते. पण खरोखरच गरजेच्या वस्तूंवर अशी ऑफर असल्यास त्याचा फायदा घेणे योग्य आहे. 

३. ईएमआई किंवा हप्त्यांमध्ये सवलत:- 

 • काही बँका कर्जाची रक्कम मोठी असल्यास ‘ईएमआय’वर सवलत देतात, तर काही ईएमआय माफ केले जातात. 
 • उदाहरणार्थ, २० लाखांच गृहकर्ज असेल तर पहिले १० ईएमआय माफ केले गेले, जेणेकरून ते २० वर्षाच्या काळात परतफेड करता येईल. ५ लाखांची सवलत म्हणजे ऑफर चांगली दिसते, पण २० वर्षात परतावा नाही केला तर त्याचा फायदा मिळणार नाही. 
 • परतफेड करण्याच्या कालावधीनुसार ईएमआय माफ केले जातात, पहिले ४ वर्षांच्या आधी कर्ज पूर्वबंद हो़ऊ शकत नाही. थोडक्यात काय तर फायदा असेल तिथे अनेक अटी लावलेल्या असतात. 

४. क्रेडिट कार्डचा वापर:- 

 • खरेदीसाठी क्रेडिट कार्ड वापरल्याने , शून्य व्याजदर, कॅशबॅक सारख्या सुविधांचा फायदा मिळू शकतो. क्रेडिट कार्ड च्या वापरामुळे ईएमआय मिळणे ही सोपे होते. मात्र याचं बिल भरताना पेमेंट सायकल, मुदत , मर्यादा याचा विचार करायला हवा.
 • उत्सव काळात मिळणारं कर्ज जरी आकर्षक वाटत असलं तरी ते परतफेड करावंच लागणार आहे त्यामुळे काही बाबतीत सावधगिरी बाळगून असणे आवश्यक आहे. 

हे नक्की वाचा: तारणकर्ज – सुरक्षित कर्जाचा एक प्रकार

उत्सव कर्ज:  खरच गरज आहे का? 

 • महिनाभर होणारा घरगुती खर्च यामध्ये पगाराचा बहुतांशी भाग खर्च झालेला असतो, अशावेळी महिना अखेरीस पैशाचा तुटवडा भासणं सहाजिक आहे.  अशातच येणा-या सणवारांमध्ये घरच्यांच्या अपेक्षा, हौस, खरेदी या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, मग समोर उत्सव कर्ज हा एक आकर्षक  पर्याय दिसतो. 
 • भारतात साजरे होणारे सण किंवा उत्सव हे प्रत्यक्षात धर्म आणि चालीरितींशी संबंधित असतात. यामध्ये सोने चांदीची खरेदी,देवाण-घेवाणीसाठी आकर्षक आणि महागड्या भेटवस्तू ,नवीन कपडे या गोष्टींची खरेदी प्रामुख्याने केली जाते. 
 • अर्थातच यासाठी पुरेसा पैसा असणं गरजेचे आहे. याचं महत्त्व लक्षात घेऊन काही पारंपरिक किंवा जुन्या बँका या कर्जाची सोय करतात. या कर्जाची रक्कम ही ५००० ते ५००००/- एवढी असते, सहज आणि सुलभ हे कर्ज मिळू शकते सोबत शून्य प्रकिया खर्च व कमी व्याजदर या सवलती मिळतात. 

महत्वाचे लेख: कर्जमुक्त कसे व्हावे? – भाग ३

उत्सव कर्ज घेताना खालील गोष्टींचा विचार करा –

१. स्वत:ची आर्थिक पत ओळखणे:-

 • सणवाराची खरेदी असो किंवा अन्य कोणतीही खरेदी आपण आपली आर्थिक पत ओळखायला हवी. कोणताही सावकार किंवा बँक कर्ज मंजूर करताना आपला ‘क्रेडिट स्कोअर’ तपासून पाहते. म्हणूनच खरेदीसाठी कर्जाची मागणी करण्यापूर्वी आपली आर्थिक पत लक्षात घ्यावी, नाहीतर क्रेडिट स्कोअर ढासळू शकतो. 
 • क्रेडिट कार्डसाठी सुद्धा काही नाविन्यपूर्ण ऑफर्स सणांच्या वेळी येतात. ईएमआय सवलत आणि कॅशबॅक ऑफर्सनुसार आपण खरेदीची पत वाढवू शकतो. पण आपली आर्थिक पत नाही वाढवू शकत. 

२. सणांच्या खरेदीसाठी कर्ज घेणे योग्य आहे का? 

 • तज्ञांच्या मते, सणासुदीच्या दिवसात कर्जांवर सवलती देणे म्हणजे ग्राहकांना आधिक खर्च करण्यास प्रोत्साहित करणे. 
 • कमी किमतीत येणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फर्निचर, इतर उपकरणे आणि काही जीवनावश्यक गोष्टींची खरेदी करू शकतात. 
 • याच काळात मनाजोगती खरेदी करण्यासाठी पोषक वातावरण असते. अनेक बँका त्याच्या कर्मचाऱ्यांना काही जास्तीचे भत्ते देतात, त्यामुळे हे कर्मचारी ग्राहकांना जास्तीत जास्त प्रमाणात कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहित करतात. 
 • ग्राहकांना कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहित करायला व्याजदरात सूट, कॅशबॅक, हप्त्यांमध्ये सवलत, शुन्य प्रक्रिया खर्च, अशा काही सवलती बँकेकडून दिल्या जातात. 

हे नक्की वाचा: कर्जबाजारीपणाची १४ लक्षणे

जेव्हा एखाद्या गरजेसाठी पैसे पुरत नसतील तेव्हा कर्ज घेतले जाते. कर्ज म्हटले की व्याज आलंच. कोणतीही आर्थिक किंवा कर्जाची सेवा मोफत मिळत नाही, सोबत ठरलेला व्याजदर आणि कागदपत्रासांठी खर्च करावाच लागतो. सणवारात खर्चासाठी मोठ्या रकमेची गरज असते, यामुळेच बँका एकमेकांना मागे टाकण्यासाठी कर्जाच्या आकर्षक ऑफर्स देतात.काही लोकं या वरवरच्या सवलतींच्या आहारी जाऊन लगेच कर्ज घेऊन मोकळे होतात, पण हे खरंच तेवढं फायद्याचं आहे का? आपल्याला खरंच गरज आहे का सवलती मिळतायत म्हणून उगाचच कर्ज घेतलं जातंय? याचा विचार करूनच उत्सव कर्जाचा विचार करा. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…