Money Management Tips
आजच्या लेखात आपण नोकरी गेल्यानंतर पैशाचे नियोजन कसे करायचे (Money Management Tips), याबद्दल माहिती घेऊया. सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक कोव्हिड-१९ व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर झालं आणि अनेकांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं. नोकरी जाणं म्हणजेच आर्थिक अस्थिरता निर्माण होणे अशा आर्थिक अस्थिरतेच्या संकटातून कशा प्रकारे बाहेर येता येईल याबद्दल काही महत्वाच्या टिप्स या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
हे नक्की वाचा: अर्थसाक्षर कथा: आर्थिक नियोजन – कौटुंबिक का वैयक्तिक?
- आपली नोकरी जाईल यासारखी दुसरी भीती असूच शकत नाही कारण नोकरी जाणार म्हणजे घरात आर्थिक अस्थिरता निर्माण होण होय.
- आपल्या करिअरच्या दृष्टीने देखील ही घटना नक्कीच चांगली नाही. या आर्थिक संकटातून मार्ग काढणं अत्यंत त्रासदायक गोष्ट आहे. आपल्या पगारावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.
- संपूर्ण महिन्याचे अनेक प्रकारची बिल आपण याच पगारातून देतो. त्याशिवाय होम लोनचा हप्ता, कार लोनचा हप्ता अशा अनेक कर्जाच्या खर्चाचे नियोजन देखील कोलमडून जाते.
- या आणि अशा प्रकारच्या सर्व आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी खाली दिलेल्या काही टिप्स तुम्ही नक्कीच अमलात आणायला हव्यात. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या कुठल्याही आर्थिक संकटातून सहिसलामत बाहेर पडू शकाल.
Money Management Tips: नोकरी गेल्यानंतरही पैशाचे नियोजन कसे कराल?
१. सत्य स्वीकारा
- आपल्याकडे समाजजीवनात नोकरी गमावणं हे चांगलं समजलं जात नाही अर्थात ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे आणि ही गोष्ट कोणासोबतही घडू शकते. यात चुकीचं असं काहीच नाही, परंतु तरीही इतर लोक काय विचार करतील याचा विचार करून काही मंडळी या गोष्टी कोणालाच सांगत नाहीत. याचा विपरीत परिणाम आपल्या मानसिक स्वास्थ्यावरती होऊ शकतो.
- तुम्ही नोकरी गमावली आहे हे तुमच्या कुटुंबाला नक्की सांगा कारण या काळात त्यांची मानसिक तसेच आर्थिक मदत तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असते.
२. वास्तव जाणून घ्या
- अनेक वेळा आपण अत्यंत कठीण प्रसंगात अडकलेले असतो अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणी चालू असताना त्यातच आपली नोकरी गमावून बसतो.
- अशाप्रसंगी काही कठीण आर्थिक निर्णय घ्यावे लागतात ज्यामुळे तुमचे आर्थिक परिस्थिती सुधारली जाईल.
- उदा. जर आपल्याकडे दोन चारचाकी गाड्या असतील तर त्यातील एक गाडी खर्च वाचवण्यासाठी आणि अर्थातच आर्थिक चणचण कमी करण्यासाठी नक्की विकावी. अशा वेळेस अनेक जण भावनिक विचार करून अजूनच आर्थिक अडचणीत अडकत जातात.
- जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर जागा बदलून लहानशा जागेत रहायला जाणे तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर असेल कारण यातून तुमचा भाड्या साठी होणारा खर्च कमी होईल.
महत्वाचा लेख: आर्थिक नियोजनाचे महत्व : आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब
३. अवाजवी खर्च शक्यतो टाळा
- अनेक मंडळी तर आपली जीवनशैली तशीच ठेवतात जशी नोकरी गमावण्याच्या आधी सुरू होती आणि यातून अधिकच आर्थिक संकटाच्या गर्तेत अडकत जातात.
- मोबाईल, कॉम्पुटर, गाडी अशा गोष्टींवर या काळात आवश्यकतेनुसार खर्च करावा.
- महिन्याच्या खर्चाचे नियोजन करावे आणि नवीन नोकरी मिळेपर्यंत हे नियोजन तंतोतंत पाळावे.
४. मुलांना परिस्थितीची जाणीव करून द्या
- नोकरी गमावल्यापासून नवीन नोकरी मिळेपर्यंतच्या काळात तुम्हाला परिवाराचा पाठिंबा अत्यंत आवश्यक असेल त्यामुळे परिवारातील लहान मुलांना देखील प्राप्त परिस्थितीची जाणीव करून द्या.
- लक्षात ठेवा आपल्या लहान मुलांपासून कधीच आर्थिक अडचणी लपवून ठेवू नका. अर्थात त्यांना अत्यंत साधेपणाने समजावून सांगा. त्यांना गंभीरपणे समजून सांगायचं भानगडीत पडू नये कारण त्यांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
- मुलांना समजावून सांगितल्यामुळे कदाचित ते देखील त्यांचा खर्च कमी करतील आणि तुम्हाला त्यांच्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करतील.
५. काहीतरी कमावत राहा
- नोकरी गेल्यानंतर नवीन नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच काहीतरी लहान-मोठे काम करत कमावत रहा. यामुळे तुमचा आत्मविश्वास टिकून राहील आणि तणाव देखील येणार नाही.
- अगदी लहान मिळकत देखील या काळामध्ये तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर असू शकते. त्यामुळे या काळात कुठलेही काम करण्यासाठी नकार देऊ नका. ही लहान मिळकत तुमच्या बचतीला हातभार लावेल.
- एखाद्या छंदामधून तुम्ही काही पैसे कमवू शकत असाल तर, हा वेळ तुमच्या छंदासाठी नक्कीच द्या.
६. म्युच्युअल फंड आणि एसआयपी
- या सर्व काळात म्युचअल फंड आणि एसआयपी बद्दल काय करायला हवं, असा प्रश्न देखील अनेकांना पडतो. अनेक मंडळी ही सर्व गुंतवणूक थांबवण्याचा विचार करतात.
- लक्षात घ्या जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली असेल की तो सहा महिने आपल्या सर्व गरजा भागवून एसआयपी मध्ये देखील गुंतवू शकतो, तर त्याने निश्चितच आपली गुंतवणूक सुरू ठेवावी. परंतु जर असं होत नसेल तर सुरुवातीला एसआयपी ची रक्कम कमी करून बघावी.
- जर परिस्थिती नियंत्रणात येत असेल तर गुंतवणूक सुरू ठेवावी अन्यथा ती गुंतवणूक लवकरात लवकर बंद केलेली चांगली.
विशेष लेख: पगारच पुरत नाही…बचत कशी करू?
मित्रांनो लक्षात घ्या जर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असेल, तर काही कठीण आर्थिक निर्णय तुम्हाला घ्यायला लागतील. कदाचित तुम्हाला तुमचा घर विकावं लागेल किंवा कोणाला त्यांची गुंतवणूक बंद करावी लागेल. परंतु, अशा परिस्थितीमध्ये अशाप्रकारचे कठीण आर्थिक निर्णय घेणे आवश्यक असतं. या सर्व गोष्टी तुम्ही या परिस्थितीतून बाहेर आल्यानंतर देखील परत मिळवू शकता.त्यामुळे प्रथम या परिस्थितीतून बाहेर कसे पडता येईल याचा मार्ग शोधा.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Money Management Tips Marathi, Money Management Tips in Marathi, Money Management Tips Marathi Mahiti