Reading Time: 2 minutes

“दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे” असे रामदासस्वामी फार पूर्वीपासून सांगून जातात. ज्या माणसाचे आयुष्य अनुभव आणि वाचनाने समृध्द झाले आहे असा माणूस आपल्या क्षेत्रात तर उत्तम कामगिरी करतोच, पण चांगला माणूस म्हणनू देखील तो नावाजला जातो. प्रत्येकाची स्थिती,काळ,परिस्थिती, या नुसार अनुभव तर मिळत असतो, पण वाचनातून ज्ञान आणि समज मिळते.

वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

काय वाचावे?

  • सर्वात मुलभूत प्रश्न पडतो तो म्हणजे वाचन करायचं आहे पण नेमकं काय वाचावं? आम्ही रोज सोशल मिडियावर एकमेकांना पाठवलेल्या गोष्टी वाचतो, तेही वाचन आहे का? ते वाचन पुरेसं आहे का? तर नाही!
  • वाचन म्हणजे तुम्ही एखादे पुस्तक, वर्तमानपत्र, लेख, अभिप्राय अशी एखादी गोष्ट वाचत असाल जिचा लेखक तुम्हाला माहिती आहे. सोशल मीडियावर फिरणारे निनावी मेसेज म्हणजे वाचन नव्हे.
  • सुरवातीला वृत्तपत्र किंवा मासिक यापासून तुम्ही सुरवात करू शकता. तुम्हाला कळतच नसेल की तुम्हाला नक्की काय वाचायला आवडेल, तर वर्तमानपत्रात तुम्हाला सामाजिक, आर्थिक, ललित, निबंध, बातम्या सर्व स्वरूपाचे वाचन साहित्य वाचायला मिळेल. त्यातून तुम्हाला काय आवडते ते वाचणे सुरु ठेवा आणि त्या विषयासंबंधीची पुस्तके, शोधनिबंध अशा अनेक गोष्टी तुम्ही मिळवून तुम्ही वाचू शकता. 

कसे वाचावे?

  • तंत्रज्ञान वेगाने बदलते आहे तशी वाचनाची साधने बदलत आहेत. आता तुम्ही इ-बुक्स,इ-मॅगझिन, इ-वृत्तपत्र असे सर्व साहित्य तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर वाचू शकता. ते मिळवण्यासाठी ग्रंथालय, दुकान कशाचाही शोध घेण्याची गरज नाही. तुमच्या बोटाच्या टोकावर सर्वकाही मिळू शकते. 
  • तुम्हाला जर वाचनाच्या पारंपारिक पद्धतीला चिकटून राहायचे असेल, तर थेट पुस्तके, वृत्तपत्र आणून भौतिकमाध्यमाने तुम्ही वाचू शकता. याशिवाय ‘किंडल’ नावाचे एक नवीन तंत्रज्ञान सध्या प्रचलित आहे. ज्यावर तुम्हाला हवे ते पुस्तक, वर्तमानपत्र तुम्ही मोबाईल प्रमाणे पण अधिक सोयीस्करपणे वाचू शकतो. त्यामुळे तुमच्या डोळ्यावर तानाही येत नाही.

वाचन कशासाठी?

. बुद्धीला चालना:- 

  • मेंदू जितका कार्य करत राहील तितकी त्याची कार्यक्षमता वाढते असे सांगितले जाते. वाचन म्हणजे मेंदूसाठीची कसरत किंवा व्यायाम आहे. वाचनाने मेंदू सतत कार्यरत राहतो आणि अधिक कार्यक्षम होतो. म्हणून लहान मुलांमध्ये वाचनाची सवय लागली, तर पुढे मोठे होऊन ही मुलं हुशार बनतात.

२ ताणापासून सुटका:- 

  • व्यस्त आणि धावपळीच्या जीवनात वाचन हे असे औषध आहे जे तुमचा कंटाळा, ताण झटक्यात दूर करतं. पुस्तक वाचताना तुम्ही तुमचं आयुष्य विसरून एका वेगळ्या जगात असता. हे जग तुम्हाला ताण विसरायला भाग पडते.

३.शब्दसंपत्ती:- 

  • माणसाची श्रीमंती त्याच्या शब्दसंपत्तीवर पहिली जाते. फक्त याचसाठी नाही, तर तुमच्या आयुष्यात तुम्ही आपले म्हणणे किती योग्य शब्दात मांडू शकता, यावर तुमचे यश अवलंबून आहे. वाचनामुळे तुम्ही उत्तम संवाद साधू शकता, तसेच तुमच्या लेखन कौशल्यात भर पडते. त्यामुळे जितका जास्त शब्दसंग्रह, तितके यश तुमच्या जवळ असते.

४. ज्ञान- 

  • ज्ञान मिळवण्यासाठी सर्वात विश्वासार्ह स्त्रोत म्हणजे पुस्तकं आहेत. ते ज्ञान स्वयंपाकातल्या एखाद्या पदार्थाचे असेल किंवा तत्वज्ञानातील एखाद्या संकल्पनेचे असेल, तुम्ही वाचत आहात म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होत आहे. थोडक्यात, वाचन हा ज्ञान मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

५.एकाग्रता-

  • वाचन ही एक साधना आहे, ज्यातून बुद्धी आणि मन यांना एक बैठक मिळते. ध्यान, नामस्मरण, मेडीटेशन या गोष्टी लक्ष एकाग्र करण्यासाठी जित्या उपयुक्त आहेत तितकीच वाचन देखील आहे.

६. मनोरंजन:- 

  • डोळ्यांना, मेंदूला ताण देणाऱ्या मोबाईल गेम्सपेक्षा वाचनाची करमणूक केव्हाही चांगली. शिवाय ब्ल्यू व्हेल आणि पबजी सारख्या मनोरंजनापेक्षा कितीतरी पटीने वाचनाची सवय लाभदायक आहे. 

वाचनाचे शेकडो फायदे आहेत आणि वाचन का करावे, याची अनेक करणं आहेत. वरील काही करणे शास्त्रीय संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आली आहेत. त्यामुळे पुस्तकांना आपला मित्र बनवा आणि आपलं जीवन समृद्ध करा. 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes सहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –

बी.एस.सी. नंतरचे ७ करिअर पर्याय 

Reading Time: 4 minutes बी.एस.सी. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात या लेखमालेच्या…