काय आहे पॅरेटो सिद्धांत? (८०/ २० चा नियम)

http://bit.ly/2GbiGJ6
1,270

Get real time updates directly on you device, subscribe now.

Print Friendly, PDF & Email

बऱ्याच व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमांत एक हुकुमी सिद्धांत हमखास प्रशिक्षणार्थींच्या मनावर बिंबवला जातो.

तो  म्हणजे “८०% विक्री २०% ग्राहकांकडून येते !”

हा ८०- २० चा  नियम आपल्याला अनेक ठिकाणी अनुभवायला मिळतो. सगळं काही समसमान असतं तर आयुष्याला काही अर्थच राहिला नसता. सर्वसामान्य समजुतीनुसार पूर्वजन्मीचं सुकृत म्हणून या जन्मात चांगले-वाईट फळ भोगायला मिळते. प्रत्येकाच्या उत्पन्नात, राहणीमानात अथवा कौटुंबिक परिस्थितीत फरक का आहे, याचा विचार आपण पूर्वजन्माशी वगैरे जोडून मूळ प्रश्न बाजूला ठेवतो. कदाचित हे जीवनाचे तत्वज्ञान इटलीत १८ व्या शतकाच्या शेवटी कोणाला माहिती नसावे. 

तर, त्याचे झाले असे की आल्फ्रेड पॅरेटो या अर्थतज्ञाला प्रश्न पडला की इटली मध्ये सर्वांचे उत्पन्न समान नाही हे ठीक आहे. पण या उत्पन्न विभागणीचे प्रमाण कसे आहे ते शोधूया. तेव्हा अभ्यासाअंती असे लक्षात आले की संपूर्ण इटलीतील ८०%  जमिनी केवळ २०% लोकांच्या मालकीच्या आहेत. पॅरेटो यांनी इ.स. १८९६ ला युनिव्हर्सिटी ल्युसेन येथे हा सिद्धांत मांडला. पुढे विविध ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात लक्षात आले की साधारणपणे मालमत्ता मालकीचा कल ८०-२० नियमानुसारच आहे.  

  • २०१८ साली अमेरिकेत शीर्ष २०% करदात्यांनी जवळपास ८०% ते ९०% आयकर भरला होता. 
  • तुमच्याकडे ऑफिसला वापरण्यासाठी कपड्याचे ६ जोड असले तरी २ आवडते कपडेच बऱ्याचवेळा वापरले जातात.  
  • तुमच्या मोबाईलमध्ये ५० वेगवेगळे ऍप्स असतील. पण त्यापैकी फोन डायल,  व्हाट्सएप, कॅमेरा, मेसेजेस, वेबब्राऊसर असे ५ ते ८ महत्वाचे ऍप्स नेहेमी वापरले जातात.  

परंतु, फक्त २०% काम केले की ८०% परिणाम नेहेमीच आणि प्रत्येक क्षेत्रात मिळतीलच असे नाही. ह्रदयाचे ऑपरेशन करताना डॉक्टरांनी २०% वेळात ८०% महत्वाचे काम केले आणि उरलेले काम सोडून दिले तर चालेल का? 

पॅरेटोचा सिद्धांत प्रत्येक वेळी खरा ठरेलच असे नाही. पण असे आपण म्हणू शकतो की जीवनातील बहुतेक गोष्टी सर्वाना समप्रमाणात मिळू शकत नाही. 

उदा:

  • २०%  प्रयत्नांमुळे ८०% परिणाम मिळतात. 
  • २०% कर्मचारी ८०% परिणाम देण्याइतकी मेहनत करतात.
  • सॉफ्टवेअर मधले २०% चुकीचे कोड्स ८०% चुकांना कारणीभूत असतात. 

८०/ २०चा नियमाचे महत्व:

पॅरेटोचा सिद्धांतामुळे तुमच्या लक्षात येईल की बहुतेक परिणाम तुलनेने कमी पण महत्वाच्या प्रयत्नांमधून येतात.

  • ८०% विक्री २०% ग्राहकांकडून येते: २०% ग्राहकांना कायम समाधानी ठेवायचा प्रयत्न करा 
  • २०% कर्मचारी ८०% परिणाम देण्याइतकी मेहनत करतात: त्या २०% कर्मचाऱ्यांना प्रमोशन, पगारवाढ द्या, त्यांचे कौतुक करा.  
  • सॉफ्टवेअर मधले २०% चुकीचे कोड्स ८०% चुकांना कारणीभूत असतात: त्या २०% कोड्स च्या दुरुस्तीकडे लक्ष द्या.   

असे अनेक उदाहरणे देता येतील. 

आपण अनेकदा बिनमहत्वाच्या ८०% गोष्टींकडे लक्ष देतो आणि जिथे खऱ्या मेहनतीची आवश्यकता नसते तिथे जास्त मेहनत घेतो. इथे २०% महत्वाच्या गोष्टी दुर्लक्षिल्या जातात आणि अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. 

पुढच्या लेखामध्ये आपण पॅरेटो सिद्धांताचा वापर आपल्या फायद्यासाठी कसा करायचा ते बघूया. 

– सी.ए. अभिजीत कोळपकर

(अभिजीत कोळपकर हे चार्टर्ड अकाउंटंट असून ते अर्थसाक्षरता अभियानात काम करतात. तसेच अर्थसाक्षरता अभियानाच्या कार्यशाळा घेतात). 

गुंतवणूक – कला का शास्त्र

बचत आणि गुंतवणुकीचे काही नियम

काटकसर म्हणजे नक्की काय? 

काय आहे बचतीचा आधुनिक फॉर्म्युला?

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.