Types of Financial Planning
Reading Time: 3 minutes

Types of Financial Planning

आर्थिक नियोजन करताना त्याचे विविध प्रकार (Types of Financial Planning) विचारात घेऊन त्यानुसार नियोजन केल्यास ते यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. आपल्या आयुष्यात अनेक पैलू आहेत – आपले कुटुंब, अर्थार्जन, आपले सामाजिक जीवन, छंद इ. पैशांचा या सर्व बाबींशी संबंध येतो. या साऱ्यांचा ताळमेळ जोडून आर्थिक नियोजन करणे सोपे काम नाही. परंतु आपले आर्थिक नियोजन यशस्वी होण्यासाठी ते  सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. यामध्ये केवळ आपल्या भविष्याचाच नाही तर आपल्या वर्तमानाचाही विचार करणे आवश्यक आहे. आजच्या लेखात आपण आर्थिक नियोजनाचे  ७ महत्वाचे प्रकार कोणते आहेत, याबद्दल माहिती घेऊया. 

हे नक्की वाचा: आर्थिक नियोजन आणि पानिपतचा (अर्थ)बोध……

आर्थिक नियोजनाचे ७ प्रकार 

१. चालू उत्पन्नाचे नियोजन (Cash Flow Planning):

 • सोप्या भाषेत, रोख प्रवाह म्हणजे पैशांचा उत्पन्न आणि खर्च होय. ही आपल्या उत्पन्न आणि खर्चाची नोंद आहे. जरी हे सोपे वाटत असले तरी दरमहा काय उत्पन्न येते आणि आपल्या हातून काय खर्च होतो हे पाहण्यासाठी फारच कमी लोक वेळ देतात. 
 • रोख प्रवाह नियोजन वर्तमान आणि भविष्यातील प्रमुख खर्च (अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्ही) ओळखण्याची आणि नियोजित गुंतवणूक करण्याच्या प्रक्रियेचा संदर्भ देते.
 • याचाच अर्थ, जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आपल्याकडे आवश्यक रक्कम आहे हे सुनिश्चित करणे असा आहे. 
 • चालू उत्पन्नाचे नियोजन गुंतवणूक नियोजनाची पहिली पायरी आहे. याशिवाय आपण आपली आर्थिक स्तिथी कशी असेल आणि आपल्या दैनंदिन आर्थिक गरजांवर ताण न वाढवता गुंतवणूक कशी करायची हे ठरवू शकत नाही. 

२. गुंतवणूक नियोजन:

 • बचत आणि गुंतवणूक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक तुमच्या खर्चाशी संबंधित आहे, तर दुसरा आर्थिक साधनांशी संबंधित आहे. तुम्ही जर संपत्तीत गुंतवणूक केली असेल तरच तुमची संपत्ती कालांतराने वाढेल.  
 • आपल्या संपत्तीतून सर्वोत्तम परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूक नियोजन केले जाते.
 • या नियोजनाचा पहिला भाग तुमच्या जोखीम आणि परताव्याशी संबंधित आहे. तुम्ही जोखीम पत्करण्यास तयार असलात तरी अपेक्षित परतावा मिळविण्यासाठी सुयोग्य गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुमची मर्यादा निश्चित करा. 
 • आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच सुयोग्य गुंतवणूक नियोजन केल्यास तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून जास्तीत जास्त परतावा प्राप्त होण्यास मदत होते.

महत्वाचा लेख: आर्थिक नियोजनाचे महत्व : आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब

३. कर नियोजन:

 • कर चुकवेगिरी बेकायदेशीर आहे, कायदेशीर मार्गाने पण कर वाचवणे चुकीचे नाही. त्यामुळे तुम्ही कर नियोजन करून करदायित्व कमी करू शकता. 
 • योग्य कर नियोजनाच्या मदतीने तुम्ही कराचा बोजा कमी करून उत्पन्नात वाढ करू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे निर्णयही ठरवता येतील.   
 • गुंतवणूक करताना करबचत करणाऱ्या गुंतवणूक पर्यायानं पसंती दिल्यास, गुंतवणूक आणि करबचत ही दोन्ही उद्दिष्ट्ये साध्य करू शकता. 

४. विमा नियोजनः 

 • अनेकदा आयुष्यात आपल्याला आकस्मित  संकटाना सामोरे जावे लागते.  
 • विमा नियोजन आपणास या घटनांपासून वाचवू शकत नसले तरी यासाठी आर्थिक सुरक्षा कवच पुरवण्यास मदत करते. 
 • योग्य विमा नियोजन आपल्याला आर्थिक नियोजनात मदतच करते. आयुष्यात घडणाऱ्या विविध घटनांच्या आर्थिक परिणामांपासून निश्चित करणारी विमा योजना हा आर्थिक नियोजनाचा महत्वाचं भाग आहे. 

५. निवृत्ती नियोजन:

 • जीवन स्वप्रवाही असते आणि त्यातून गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत कोणीही सुटत नाही. आपल्याला म्हातारपण कधीही स्पर्श करणार नाही असं आपण गृहीत धरतो पण रोज नकळत वृद्धत्वाकडे वाटचाल  करत असतो. 
 • निवृत्ती हा तुमच्या आयुष्यातील न टाळता येण्यासारखी घटना आहे. त्यामुळे निवृत्तीचे नियोजन तुमच्या करिअर आणि विवाहाचे नियोजन करण्या एवढेच महत्त्वाचे आहे. 
 • निवृत्ती नियोजन करताना गुंतवणूकीचे निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील आणि त्यामुळे तुमच्या कष्टाने मिळवलेले पैसे भविष्यात तुमच्या कामी येतील. 
 • आज तुम्ही काय निवडता त्यावर आपल भविष्य अवलंबून असते. योग्य वेळी योग्य आर्थिक नियोजनाच्या मदतीने योग्य निर्णय घेतले तर आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखी असेल. 

विशेष लेख: गेल्या वर्षाने दिली आर्थिक नियोजनाची महत्त्वाची शिकवण

६. मुलांचे भविष्य नियोजनः 

 • आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या मुलासाठी किंवा मुलांच्या भविष्यासाठी नियोजन करण्याचा हेतू म्हणजे उच्च शिक्षण आणि लग्न यासारख्या संभाव्य खर्चासाठी निधी तयार करणे.
 • आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी पुरेशा  निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. यासाठी केवळ बचत करून भागणार नाही. नियमितपणे आणि नियमित अंतराने योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे देखील आवश्यक आहे.
 • मुलांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती घेऊन योग्य योजना निवडून त्यामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यासाठी गुंतवणुकीची सुरवात मुलांच्या जन्मापासूनच करणे केव्हाही उत्तम. 

७. मालमत्ता नियोजनः 

 • प्रत्येकजण आपल्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता मिळवितो. 
 • मृत्यूनंतर किंवा जीवन कालावधीत कधीही, ही मालमत्ता एकतर वारस किंवा संस्था आणि धर्मादाय संस्थांना हस्तांतरित केली जाऊ शकते. 
 • या हस्तांतरणाची सर्वात कार्यक्षम पद्धतीने योजना करणे याला मालमत्ता नियोजन असे म्हणतात.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web Search: Types of Financial Planning Marathi, Types of Financial Planning in Marathi, Types of Financial Planning Marathi Mahiti, 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.